News Flash

“जगाला ज्ञान शिकवणाऱ्या…’, मास्क न घातलेल्या कंगनाला सुयश रायने केलं ट्रोल

सुयश सोबत अनेक नेटकऱ्यांनी ही कंगनाला ट्रोल केले...

बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कंगना बिनधास्तपणे तिचं मत मांडताना दिसते. यामुळे बऱ्याचवेळा कंगना ट्रोल देखील झाली आहे. करोनाच्या काळात सुरक्षित राहा सांगणारी कंगना आता मास्क न घालता बाहेर जाताना दिसत आहे. यामुळे कंगना पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे.

कंगनाचा व्हिडीओ बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. या व्हिडीओत मुंबईतील डबिंग स्टुडिओत कंगना मास्क न घालता जाताना दिसत आहे. कंगनाने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. पहिल्यांदा कंगनाने फोटोग्राफर्ससाठी पोज देण्यास नकार दिला होता. मात्र, स्टुडिओमध्ये प्रवेश करण्याआधी तिने फोटोग्राफर्ससाठी पोज दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. त्याच सेलिब्रिटी पासून सामान्य जनतेने ही ट्रोल केलं आहे. अभिनेता सुयश राय म्हणाला, “जगाला ज्ञान द्यायचं असतं तर सगळ्या पुढे असतात, मुर्ख लोक अशी असतात”, अशी कमेंट करत त्याने कंगनाला ट्रोल केलं आहे. तर त्याची पत्नी आणि अभिनेत्री किश्वर मर्चंटने देखील कंगनाला ट्रोल केलं आहे. ती म्हणाली, “ती कधीच मास्क परिधान करत नाही, एवढंच काय तर तिच्या हातात सुद्धा मास्क नाही. हे कसं शक्य आहे?” अनेक नेटकऱ्यांनी असेच प्रश्न विचारत कंगनाला ट्रोल केलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड कलाकारांना करोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे. काल विकी कौशल, भूमी पेडनेकरला करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. तर, त्या आधी अक्षय कुमार, गोविंदा, आलिया भट्ट, रणबीर कपूर अशा अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती.

कंगनाचा ‘थलायवी’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या नंतर कंगना ‘तेजस’ आणि ‘धाकड’ या चित्रपटात दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 11:38 am

Web Title: kangana ranaut spotted at a dubbing studio in mumbai without a mask got trolled by suyyash rai dcp
Next Stories
1 रिचा चड्ढाच्या पायाला दुखापत; फोटो शेअर करत म्हणाली…
2 अजय देवगणसोबत अफेअर होते का? महिमाने त्यावेळी रंगलेल्या चर्चांवर केला खुलासा
3 Video: अमिताभ बच्चन यांचा फोटो पाहाताच अशी होती रेखा यांची प्रतिक्रिया
Just Now!
X