News Flash

कार्तिक आर्यनला दुसरा झटका, करण जोहरनंतर शाहरुखच्या चित्रपटातून दाखवण्यात आला बाहेरचा रस्ता

शाहरुखचे रेड चिली प्रोडक्शन हाऊस आता या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी कलाकाराचा शोध करत आहे.

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता कार्तिक आर्यन ओळखला जातो. कार्तिकच्या लुक्सचे लाखो चाहते आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी कार्तिकला दिग्दर्शक करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटात रिप्लेस केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा कार्तितला एक मोठा झटका लागला आहे. बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या रेड चिलीज या प्रोडक्शन हाऊस मधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. रेड चिलीज या प्रोडक्शन हाऊससोबत कार्तिक एक चित्रपट करणार होता.

‘ईटाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, कार्तिकने साइनिंगची रक्कमही घेतली होती, परंतु क्रीएटिव्ह मतभेदांमुळे कार्तिकने ती रक्कम परत केली आहे.

या चित्रपटाची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी यावर्षी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे दिग्दर्शक अजय बहल करणार होते. तर शाहरुखचे रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊस या चित्रपटाची निर्मिती करणार होते. या चित्रपटात कार्तिकसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री कतरिना कैफ दिसणार होती अशा चर्चा सुरु आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

आणखी वाचा : संजय दत्तच्या नावाचं सिंदूर लावतात रेखा?

दरम्यान, कार्तिक ‘भूल भूलै २’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत मुख्य भूमिकेत अभिनेत्री कियारा आडवाणी दिसणार आहे. अनीस बज्मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. याशिवाय दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या एका चित्रपटात कार्तिक दिसणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2021 4:52 pm

Web Title: kartik aaryan opts out of shah rukh khan production venture due to this reason dcp 98
Next Stories
1 समंथाला होणाऱ्या विरोधामुळे सासरे नागार्जुन चिंतेत; ‘द फॅमिली मॅन 2’ला तामिळनाडूत विरोध
2 ‘पार्ट्यांमध्ये भांडण करत जा’, अभिनेता होण्यापूर्वी तुषार कपूरला मिळाला होता अजब सल्ला
3 ‘मसाबाने दुसरे लग्न करावे का?’, नीना गुप्ता म्हणाल्या…
Just Now!
X