News Flash

‘या’ कारणासाठी माधुरी दीक्षित आणि जूही चावलाने कोणत्याही सुपरस्टारसोबत लग्न केलं नाही!

"सारखं आरश्यात पाहणाऱ्या व्यक्तीशी लग्न करायचं नव्हतं"

(photo-YouTube)

बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि अभिनत्री जूहू चावला या दोघींनी आजवर अनेक सुपरहीट सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलंय. एकेकाळी आपल्या सौदर्याच्या आणि अभिनयाच्या जादूने या दोघींनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. बॉलिवूडमधील आमिर, शाहरूख आणि सलमान खान या तिनही अभिनेत्यासोबत माधुरी आणि जूहूची जोडी कायम गाजली. मोठी लोकप्रियता आणि आरस्पानी सौदर्य असतानाही या दोघींनी मात्र आपला जोडीदार निवडताना बॉलिवूडकडे पाठ फिरवली. माधुरी आणि जूहीने कोणत्याही बॉलिवूड स्टारशीलग्न करण्याला पसंती दिली नाही.

माधुरी आणि जूहीने बॉलिवूडमधील एखाद्या अभिनेत्याशी का लग्न केलं नाही? याचं उत्तर कॉफी विथ करणच्या शोमध्ये दिलं होतं. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २०१४ सालामध्ये कॉफी विथ करण या शोमध्ये माधुरी दीक्षित आणि जूही चावलाने हजेरी लावली होती. यावेळी करण जोहरने दोघींना एक हटके प्रश्न विचारला होता. “तुम्ही दोघींनी बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार सोबत काम केलंय. मग एखाद्या अभिनेत्याशी लग्न का नाही केलं? मला जाणून घ्यायचं तुम्ही असं का केल?” असा प्रश्न करण जोहरने विचारला होता.

आणखई वाचा: अजय देवगणने खरेदी केला आलिशान बंगला ; बिग बींच्या नव्या घराहून दुप्पट किंमत!

करण जोहरच्या या प्रश्नावर उत्तर देताना माधुरी म्हणाली, “मी शाहरुख आणि सलमानसोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. आमिर सोबत फक्त दोन सिनेमा केले. मात्र मला कुणीही इतकं आवडलं नाही की मी त्याच्यासोबत लग्न करेन, माझा नवराच माझा खरा हिरो आहे.” असं माधुरी म्हणाली तर जूहीने देखील तिच्या हटके अंदाजात उत्तर दिलं.

आणखी वाचा: “मला स्पर्धकांचं कौतुक करण्यास सांगितलं गेलं”, इंडियन आयडल शोबद्दल सुनिधी चौहानचा मोठा खुलासा

सारखं आरश्यात पाहणाऱ्या व्यक्तीशी लग्न करायचं नव्हतं

जूही म्हणाली, ” जय माझ्यासाठी फूलं, कार्डस् आणि गिफ्ट पाठवायचे त्यामुळे मी त्यांच्याशी आकर्षित होते. आणि असंही मला माझ्याकडे कमी लक्ष देते सारखं सारखं आरश्यात पाहणाऱ्या व्यक्तीशी लग्न करायचं नव्हतं. मला कोणत्याही अभिनेत्याशी लग्न करायचं नाही हे माझ्या डोक्यात स्पष्ट होतं.” असं मजेशीर उत्तर जूहीने दिलं. यावेळी माधुरी आणि करण दोघांनाही हसू फुटलं.

१९९५ मध्ये जूही चावलाने बिझनेसमन जय मेहता यांच्याशी विवाह केला. तर १९९९ सालात माधुरीने अमेरिकास्थित डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्नगाठ बांधली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2021 12:26 pm

Web Title: madhuri dixit and juhi chawala revealed why both of they did not marry any super star or actor in cofee with karan show kpw 89
Next Stories
1 कंगनाचा बॉडीगार्ड कुमार हेगडेला कर्नाटकात अटक; लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप
2 अजय देवगणने खरेदी केला आलिशान बंगला ; बिग बींच्या नव्या घराहून दुप्पट किंमत!
3 टार्झनची भूमिका साकारणाऱ्या जो लारा यांचा विमान अपघातात मृत्यू
Just Now!
X