News Flash

‘संदीप और पिंकी फरार’वर प्रेक्षक फिदा; सोशल मीडियावर परिणीती अर्जूनचं होतंय कौतुक

२० मे रोजी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे दिबाकर बनर्जी यांनी केले आहे.

करोनामुळे लागु करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अनेक चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतं आहेत. त्यात आता बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोपडा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर २० मे रोजी प्रदर्शित झाला.

‘संदीप और पिंकी फरार’ ही दोन वेगवेगळ्या व्यक्तींची कहाणी आहे, जे अचानक एकमेकांना भेटतात आणि त्यांचे आयुष्य हे एकमेकांशी जोडले जाते. पिंकीची भूमिका अर्जुनने साकारली आहे. त्याचे संपूर्ण नाव हे पिंकेश दहिया आहे. पिंकेश हा हरयाणवी पोलिस अधिकारी आहे. कॉर्पोरेट जगात स्वत:चे स्वप्न पूर्ण करणारी संदीप कौरची भूमिका परिणीती साकारत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होताच अनेक नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरलेला आहे. एक नेटकरी म्हणाला, “हा चित्रपट असा आहे ज्याबद्दल तुम्ही ३ वर्षांनंतर ट्विट करुन बोलणार आहात- “अरे यार, किती उत्तम चित्रपट आहे हा.” दुसरा नेटकरी म्हणाला, संदीप और पिंकी फरार हा २०२१ मधील सर्वात उत्तम चित्रपटांपैकी एक आहे. अर्जुन, परिणीती आणि जयदीप अहलावतने उत्तम भूमिका साकारली आहे. वरुण ग्रोव्हर आणि दीपांकर सर यांनी या चित्रपटाची पटकथा उत्तम लिहिली आहे. नक्कीच पाहा.” तर, तिसरा नेटकरी म्हणाला, “संदीप और पींकी फरार हा चित्रपट अॅमेझॉन प्राइमवर पाहता येईल. परिणीतीचा आता पर्यंतच्या सगळ्यात उत्तम अभिनय आहे. अर्जुनने देखील उत्तम भूमिका साकारली आहे.”

आणखी वाचा : त्या दिवसानंतर अनिल कपूरसोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय माधूरीने घेतला होता

संदीप और पींकी फरार हा चित्रपट १९ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. मात्र, करोनाच्या निर्बंधांमुळे अनेकांना हा चित्रपट पाहता आला नाही. मात्र, आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांना घर बसल्या हा चित्रपट पाहता येत आहे. एवढंच नव्हे तर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन हे दिबाकर बनर्जी यांन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2021 9:14 am

Web Title: netizens loved the arjun and parineeti starrer sandeep aur pinky faraar after its ott release dcp 98
Next Stories
1 संगीतकार लक्ष्मण कालवश
2 ‘यशाकडे नेणारा प्रवास महत्त्वाचा’
3 ‘कं डोम’ पाठोपाठ आता ‘हेल्मेट’…
Just Now!
X