News Flash

करीना कपूरचा मुलगा जेहचा फोटो आला समोर; ईद निमित्ताने सारा अली खानने शेअर केली झलक; पण हे काय….?

साराने शेअर केलेल्या फॅमिली फोटोमध्ये छोटा नवाब बराच लाइमलाइटमध्ये आलाय. पण याही वेळेला फॅन्सची निराशाच झालीय.

(Photo: Kareena Kapoor Khan/Instagram)

सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने आजच्या ईद निमित्ताने एक फॅमिली फोटो शेअर केलाय. या फॅमिली फोटोमध्ये सारा आपले वडील सैफ अली खान, भाऊ इब्राहिम अली खान आणि तैमूरसोबत दिसून येत आहे. पण या फोटोमध्ये साराने आपल्या कुशीत घेतलेला छोटा नवाब मात्र बराच लाइमलाइटमध्ये आलाय. सारा अली खानने शेअर केलेल्या या फॅमिली फोटोमध्ये तिच्या कुशीत बसलेला छोटा नवाब हा करिना आणि सैफचा छोटा मुलगा जेह दिसून येतोय. पण या फोटोमध्ये सुद्धा छोटा नवाब जेहचा चेहरा एका इमोजीने लपवण्यात आलाय.

सारा अली खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फॅमिली फोटो शेअर करत यंदाची ईद खूपच खास बनवली आहे. हा फोटो शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिलीय. “ईद मुबारक, अल्लाह सर्वांना शांती, आनंद आणि सकारात्मकता देवो…आपल्या सर्वांसाठी चांगले दिवस येवोत अशी आशा ठेवते.” असं तिने या कॅप्शनमध्ये लिहिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

करिना आणि सैफचा लहान मुलगा जेहचा फोटो समोर तर आला पण त्याचा चेहरा पाहता आला नसल्याची ही काही पहिली वेळ नाही. यापूर्वी सुद्धा अनेकदा छोटा नवाब जेहचा फोटो समोर आला. पण त्याच्या चेहरा कोणत्या ना कोणत्या माध्यमाने लपवण्यात येतो. प्रत्येक वेळी फॅन्सची निराशा होत असते. याही वेळेला असंच काहीसं झालंय. करीनाने पुन्हा एकदा तिच्या फॅन्सना निराश केलं. करिना आणि सैफचा मुलगा जेहचं नाव तर जाहीर केलं, पण जेहचा फोटो मात्र आतापर्यंत समोर आणलेला नाही.

करीना कपूर खानने 21 फेब्रुवारी 2021 रोजी दुसर्‍या मुलाला जन्म दिला. करिनाने आतापर्यंत जेहचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. पण फॅन्स मात्र जेहची पहिली झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होते. करीनाने बर्‍याचदा आपल्या मुलाची झलक दाखविली आहे. पण अद्याप जेहचे स्पष्ट असे फोटो समोर आले नव्हते. आता समोर आलेल्या फोटोमध्ये देखील जेहचा चेहरा लपवण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2021 8:59 pm

Web Title: sara ali khan share family photo on eid kareena kapoor younger son jeh was seen in her lap see photos prp 93
Next Stories
1 Pornographic content case: राज कुंद्राच्या ऑफिसमधून मिळालं सर्व्हर, पॉर्न कंटेंट अपलोड केलं जात होतं?
2 शिल्पा शेट्टी राज कुंद्राला कधी आणि कशी भेटली?
3 सलमान म्हणतो तो मी नव्हेच! दुबईत पत्नी व १७ वर्षांची मुलगी? काहीही…
Just Now!
X