News Flash

सुनिल शेट्टीने मुलगी अथिया आणि क्रिकेटर केएल राहुलच्या नात्यावर सोडलं मौन; दिले हे संकेत

सुनिल शेट्टीने मुलगी अथिया शेट्टी आणि केएल राहुल या दोघांच्या नात्याचा स्विकार स्विकार तर केला नाही, पण त्यांच्या नात्यावर एक प्रतिक्रिया दिलीय.

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर केएल राहुल आणि त्याची कथित गर्लफ्रेंड अथिया शेट्टी यांच्यामधील रिलेशनशीपच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगु लागल्या होत्या. या दोघांच्या सोशल मीडियावरील पोस्ट पाहून त्यांच्यातील नात्याचा अंदाज येऊ लागला होता.

सध्या टीम इंडियाचे क्रिकेटर इंग्लंडच्या दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी स्टार क्रिकेटर केएल राहुल याच्यासोबत असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. एका मुलाखतीमध्ये सुनील शेट्टीला या दोघांच्या नात्यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता अथिया खरंच राहुलला कंपनी द्यायला इंग्लडला गेली आहे का? असा प्रश्न जेव्हा सुनिल शेट्टीला विचारण्यात आला होता, तेव्हा सुनिल शेट्टीने हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला होता. पण आता त्याने मुलीच्या रिलेशनशीपवरचं हे मौन सोडलंय. अभिनेता सुनिल शेट्टीने मुलगी अथिया शेट्टी आणि केएल राहुल या दोघांच्या नात्याचा स्विकार स्विकार तर केला नाही, पण त्यांच्या नात्यावर एक प्रतिक्रिया दिलीय. अथिया आणि केएल राहुल या दोघांच्या एका कंपनीच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर होण्याबाबत प्रश्न केला असता “हे त्या दोघांनाच विचारा” असं उत्तर अभिनेता सुनिल शेट्टीने दिलंय.

यापुढे बोलताना अभिनेता सुनिल शेट्टी म्हणाला, “जर जाहिरातीच्या बाबतीत बोलायचं झालं तर एका नॅशनल इंटरनॅशनल ब्रॅंडने अथिया आणि केएल राहुल या दोघांची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडरसाठी निवड केली आहे. ते एक गुड लुकिंग कपल आहेत…आणि ब्रॅण्डच्या दृष्टीकोणातून पाहिलं गेलं तर ते उपयोगाचं आहे. ” त्यानंतर हसत हसत सुनिल शेट्टी म्हणाला, “जाहिरातीत ते एकत्र खूप छान दिसतात.”

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul (@rahulkl)

केएल राहुलसोबत इंग्लंडमध्ये आहे अथिया ?

अथिया शेट्टीने काही दिवसांपूर्वीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये अथियाने एक जॅकेट परिधान केलं होतं. हे जॅकेट केएल राहुलचं आहे. काही दिवसांआधीच राहुलने या जॅकेटवर काही फोटोज शेअर केले होते. इतकंच नव्हे तर अथियाने जे फोटो शेअर केलेत ते एका हॉटेल रूममधले आहेत. तसंच दोघांनी एकत्र असलेला एक फोटो देखील शेअर केलाय. यात ते दोघे इंग्लंडमधील शहरांमध्ये फिरताना दिसून आले.

 

View this post on Instagram

 

A post shared by KL Rahul (@rahulkl)

 

खूप काळापासून आहेत दोघे रिलेशनशीपमध्ये

अभिनेता सुनिल शेट्टीची मुलगी अथिया आणि स्टार क्रिकेटर केएल राहुल या दोघांच्या रिलेशनशीप बाबत खूप काळापासून चर्चा सुरूयेत. गेल्या अनेक दिवसांपासून ते दोघेही एकमेकांना डेट करत आहे. पण पण आतापर्यंत अथिया आणि राहुल दोघांनीही या नात्यावर अधिकृत घोषणा केलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 6:37 pm

Web Title: suniel shetty reveals about athiya shetty and kl rahul relationship ind vs eng prp 93
Next Stories
1 मनोज वाजपेयी आणि नीना गुप्ताच्या ‘DIAL 100’चं मोशन पोस्टर रिलीज
2 शेफाली शाहचे दिग्दर्शन असलेल्या ‘हॅप्पी बर्थडे मम्मीजी’चं पहिलं पोस्टर रिलीज
3 फरहान अख्तरच्या ‘तूफान’ सिनेमावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा रिव्ह्यू , सिनेमा पाहून म्हणाला…
Just Now!
X