News Flash

करीनाच्या दुसऱ्या मुलाला सोशल मीडियावर गरजेपेक्षा जास्त महत्व दिले जाते- आदर्श गौरव

एका मुलाखतीत आदर्शने हे वक्तव्य केलं आहे.

(Photo Credit : Kareena Kapoor Khan Instagram and Adarsh Gourav Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री संजना सांघी आणि अभिनेता आदर्श गौरव यांनी गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आता एका मुलाखतती त्यांनी त्याच्या रिलेशनशिपबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. एवढंच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीवर देखील त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी आदर्शने बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खानच्या दुसऱ्या मुलावर वक्तव्य केलं आहे.

आदर्श आणि संजनाने नुकतीच ‘बाय इंव्हाईट ओनली’ सीजन २ ला भेट दिली. या वेळी रेनिल अब्राहमने त्या दोघांना अनेक प्रश्न विचारले. ‘आता पर्यंत भेटलेली सर्वात कंटाळवाणी सेलिब्रिटी कोण आहे?’ असा प्रश्न संजनाला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत संजना म्हणली, “असे लोक जे भेटल्यावर आपल्याविषयी प्रश्न विचारत नाही तर, त्यांच्या विषयी सांगतात. आणि मला वाटतं की ही एक भयानक गोष्ट आहे.” त्यावर रेनिल म्हणाला की ‘मग तर ९० टक्के इंडस्ट्री तशी आहे.’ त्यावर हसत संजना बोलते की ‘ते कंटाळवाणे आहेत मग.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjana Sanghi (@sanjanasanghi96)

त्यानंतर, कोणत्या सेलिब्रिटीला सोशल मीडियावर जास्त महत्व दिले जाते? असा प्रश्न विचारता आदर्श म्हणाला. “मला असं वाटतं की करीना कपूर खानचा दुसरा मुलगा.”

“तुला कोणत्या अभिनेत्रीला पोल डान्स करताना बघायला आवडले?” यावर आदर्शने उत्तर दिले की, “जॅकलिन फर्नांडिस कारण ती एक उत्तम डान्सर आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Adarsh Gourav (@gouravadarsh)

आणखी वाचा : ‘यांचा रुपयाही घेऊ नका’, अमिताभ यांना २ कोटी परत देण्याची परमिंदर सिंग यांची मागणी

आदर्शने ‘द व्हाईट टायगर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत प्रियांका चोप्रा आणि राजकुमार राव होते. तर, संजनाने सुशांत सिंग राजपुतच्या ‘दिल बेचारा’ या चित्रपटात काम केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 12:07 pm

Web Title: the white tiger fame adarsh gaurav kareena kapoor khans second born is one celebrity that gets more attention than needed dcp 98
Next Stories
1 ७४ वर्षीय रणधीर कपूर यांनी केली करोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
2 सुरेश वाडकरांनी माधुरीला दिला होता लग्नासाठी नकार, जाणून घ्या कारण
3 अबब..! अजगरसोबतचा फोटो शेअर करत उर्वशीने दिल्या ईदच्या शुभेच्छा
Just Now!
X