Indias highest Paid Actor: चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे मानधन हा कायमच चर्चेचा विषय असतो. वाढत जाणारे कलाकारांचे मानधन आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉफ ठरणारे चित्रपट, यामुळे निर्मात्यांची वाढलेली चिंता, याचीही चर्चा होताना दिसते.
९० च्या दशकात चिरंजीवी हे पहिले अभिनेते होते, ज्यांनी एक कोटी मानधन घेतले होते. त्यानंतर ज्या कलाकारांना एक कोटी मानधन मिळत होते, त्यांना सुपरस्टार असे म्हटले जाऊ लागले. या यादीत शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, माधुरी दीक्षित, श्रीदेवी, अक्षय कुमार यांचा समावेश झाला. मात्र, काही काळानंतर एक कोटी ही छोटी रक्कम झाली. सहाय्यक कलाकारदेखील तितके मानधन आकारू लागले. मानधनाची किंमत लवकरच १० कोटी झाली आणि त्यानंतर ती १०० कोटीपर्यंत पोहोचली.
आठ मिनिटांच्या कॅमिओसाठी ‘या’ अभिनेत्याने घेतले होते कोट्यवधी रुपये
या सगळ्यात २०१९ मध्ये एका कलाकाराने त्याची भूमिका साकारण्यासाठी प्रत्येक मिनिटासाठी ४.३५ कोटी इतके मानधन आकारले. आता हा अभिनेता कोण हे जाणून घेऊ…
‘बाहुबली २’ला मोठे यश मिळाल्यानंतर एस. एस. राजामौली यांनी २०१७ मध्ये त्यांचा आगामी प्रोजेक्ट ज्युनिअर एनटीआर व राम चरण कऱणार असल्याची घोषणा केली. कालांतराने या चित्रपटाला ‘आरआरआर’ हे नाव दिले, ज्यामध्ये इतर कलाकारांचेदेखील कास्टिंग करण्यात आले. २०१९ च्या सुरुवातीला अभिनेता अजय देवगणेने या चित्रपटासाठी कॅमिओ म्हणून काम करण्यास होकार दिला होता. त्याच्याबरोबर आलिया भट्ट व श्रिया सरनदेखील या चित्रपटात दिसल्या होत्या.
‘आरआरआर’ या चित्रपटात अजय देवगण फक्त आठ मिनिटांसाठी दिसला होता. पण, त्या आठ मिनिटांसाठी अजय देवगणने ३५ कोटी मानधन आकारले होते. भारतीय चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात महागडा हा कॅमिओ ठरला होता. २०१९ पर्यंत कोणत्याही कलाकाराने प्रति मिनिटासाठी ४.३५ कोटी आकारले नव्हते. कोणत्याही कॅमिओसाठी हे मानधन तोपर्यंतचे सर्वांत जास्त मानधन होते.
२०२३ मध्ये शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटासाठी शाहरुख खानने ३०० कोटी मानधन घेतले होते, जे चित्रपटाच्या बजेटपेक्षा जास्त होते. त्या चित्रपटात त्याचा ७० मिनिट स्क्रीन टाइम होता, त्यामुळे किंग खाननेदेखील प्रति मिनिट ४.३५ कोटी मानधन घेतले होते. त्यानंतर रजनीकांत यांनी ‘जेलर’साठी, ‘टायगर ३’साठी सलमान खानने, ‘कल्की २८९८ एडी’साठी ‘प्रभास आणि पुष्पा २’साठी अल्लू अर्जुन या कलाकारांनीदेखील २५०-३०० कोटींपर्यंत मानधन घेतले. हे मानधन त्यांनी आधी घेतलेल्या मानधनापेक्षा जास्त होते. मात्र, ‘आरआरआर’मधील कॅमिओमुळे अजय भारतातील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला.
२०२१ मध्ये अजय देवगणने हॉट स्टारवरील ‘रुद्र : द एज ऑफ डार्कनेस’ या चित्रपटासाठी १२५ कोटीचे मानधन घेतले, त्यामुळे अजय देवगण देशातील सर्वाधिक मानधन घेणारा ओटीटी स्टार ठरला.
दरम्यान, अनेक चित्रपट फ्लॉप ठरत असताना अजय देवगणेचे ‘दृश्यम २’, ‘रेड २’, ‘सिंघम अगने’सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कमाल केल्याचे पाहायला मिळाले.