अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे मनोरंजन विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि कायम चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक आहेत. या दोघांच्या पहिल्या भेटीचा किस्सासुद्धा तितकाच मजेशीर आहे. अनुष्काने एका मुलाखतीमध्ये याचा खुलासा केला आहे. सुरुवातीला अनुष्काला विराट ‘अहंकारी’ वाटला होता असं तिने मान्य केलं होतं. आज विराट आणि अनुष्का हे त्यांच्या लग्नाचा ५ वाढदिवस साजरा करत आहेत.

२०१३ मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरातीसाठी एकत्र चित्रीकरण करताना अनुष्का आणि विराट पहिल्यांदा भेटले होते. यानंतर ते एकमेकांना डेट करत असल्याच्या अफवांनी जोर धरला. डिसेंबर २०१७ मध्ये इटलीच्या लेक कोमो येथे एका खाजगी समारंभात ते विवाहबंधनात अडकले. शिवाय गेल्याचवर्षी ते आई-वडीलही झाले, ‘वामिका’ हे त्यांच्या कन्यारत्नाचं नाव.

आणखी वाचा : ‘अवतार २’चं तूफान ॲडव्हान्स बुकिंग, ४ लाखांहून अधिक तिकीटं विकली; पहिल्या दिवशी कमावणार इतके कोटी

फिल्मफेअर मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनुष्काने तिच्या आणि विराटच्या पहिल्या भेटीबद्दल खुलासा केला होता. अनुष्का म्हणाली, “आम्ही जेव्हा एकत्र जाहिरातीसाठी काम करणार होतो तेव्हा विराट फार गर्विष्ठ आहे असं माझ्या कानावर आलं होतं, यामुळे मी स्वतःला विराटपेक्षा गर्विष्ठ असल्याचं दाखवायचा प्रयत्न केला. पण जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा तो तसा नसल्याचं पाहून मी गोंधळात पडले. तो खरंच खूप मनमिळावू आणि मजेशीर आहे. तेव्हा माझ्या नवीन घराचं सेलिब्रेशनसाठी मी माझ्या मित्र मैत्रिणींना बोलावलं तेव्हा मी त्यालाही आमंत्रण दिलं होतं. तेव्हा या आमच्या नात्याला खरी सुरुवात झाली होती, आणि इतरांनीही ती गोष्ट नोटिस केली.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुष्का आता चार वर्षांनंतर चित्रपटांमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहे. ती आगामी ‘चकदा एक्सप्रेस’साठी सध्या चित्रीकरण करत आहे. प्रोसित रॉय दिग्दर्शित, चकडा एक्सप्रेस हा माजी भारतीय क्रिकेटपटू झुलन गोस्वामी यांच्या जीवनावर आधारित बायोपिक आहे. अनुष्का शेवटी निर्माता आनंद एल राय दिग्दर्शित शाहरुख खान आणि कतरिना कैफबरोबर ‘झिरो’मध्ये दिसली होती. तिने अलीकडेच नेटफ्लिक्सच्या च्या ‘कला’मध्ये छोटी भूमिका साकारली होती.