बॉलिवूड अभिनेता सलमान खानला अलीकडेच तुरुंगातून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने जीवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर सलमानच्या ऑफिसला धमकीचा ईमेलही पाठवण्यात आला होता. या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सलमानच्या सुरक्षिततेत वाढ केली होती. पोलीस धमकीच्या ईमेल प्रकरणाचाही तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आता नवा खुलासा केला आहे.
हेही वाचा- कंगना रणौतने वाढदिवसालाच व्हिडीओ शेअर करत मागितली माफी, कारण…; म्हणाली, “माझ्या शत्रूंचे…”
सलमानच्या धमकीच्या ईमेलचे ब्रिटनमध्ये कनेक्शन
पोलिसांना यूकेमधून सलमान खानला पाठवलेल्या धमकीच्या ईमेलची लिंक मिळाली आहे. मात्र, सलमानला हा मेल कोणत्या ईमेलद्वारे पाठवण्यात आला, याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. धमकी देणारा मेल यूकेमधील एका मोबाईल क्रमांकाशी जोडलेला असल्याचे पोलिसांना समजले आहे. त्याचवेळी, या घडामोडीनंतर पोलीस त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत ज्याच्या नावावर फोन नंबर नोंदवला आहे.
हेही वाचा- ‘झूमे जो पठान’ गाण्यावर इरफान पठाणच्या मुलाने केला डान्स; VIDEO पाहून शाहरुख म्हणाला “तुझा मुलगा…”
सलमानच्या घराबाहेर जमण्यास चाहत्यांना बंदी
सलमानला ई-मेलद्वारे धमकी दिल्याप्रकरणी गोल्डी ब्रार आणि रोहित ब्रारसह गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम ५०६ (२), १२० (बी) आणि ३४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला. सलमानच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर सलमानच्या मुंबईतील घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर चाहत्यांना सलमानच्या घरासमोर गर्दी करण्यासही बंदी घालण्यात आला आहे.
धमकीच्या ई-मेलमध्ये काय म्हटलं होतं?
सलमान खानच्या टीमने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी रोहित गर्गने ई-मेलमध्ये लिहिलं की, कुख्यात गुंड गोल्डी ब्रारला सलमान खानशी बोलायचं आहे. यामध्ये नुकत्याच झालेल्या लॉरेन्स बिश्नोईच्या मुलाखतीचाही संदर्भ देण्यात आला आहे. ज्यामध्ये लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला मारणं हे त्याच्या आयुष्याचं ध्येय असल्याचं म्हटलं होतं.
गोल्डी ब्रारला तुमच्या बॉसशी (सलमान खान) बोलायचे आहे. त्याने गँगस्टर बिष्णोईची मुलाखत नक्कीच पाहिली असेल. जर सलमानने ती मुलाखत पाहिली नसेल तर त्याला ती पाहायला सांगा. जर हे प्रकरण कायमचं बंद करायचं असेल तर सलमान खानला गोल्डी ब्रारशी बोलू द्या. त्यांना समोरासमोर बोलायचं असेल तर तसं कळवा. यावेळी आम्ही तुम्हाला वेळेवर कळवलं आहे. पुढच्या वेळी थेट धक्का देऊ” असा मजकूर पत्रात लिहिला आहे. याबाबतचं वृत्त ‘इंडिया टुडे’नं दिलं होतं