scorecardresearch

Video : “दारुच्या नशेत…” वाढदिवसाच्या पार्टीत मुलांबरोबर अडखळत चालल्यामुळे सोहेल खान ट्रोल

त्यामुळे अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे.

Video : “दारुच्या नशेत…” वाढदिवसाच्या पार्टीत मुलांबरोबर अडखळत चालल्यामुळे सोहेल खान ट्रोल

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खानला बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखले जाते. नुकतच सलमानने त्याचा ५७ वा वाढदिवस दणक्यात साजरा केला. याच पार्टीतील अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला शाहरुख खान, कार्तिक आर्यन, पूजा हेगडे, रितेश जिनिलिया, तब्बू यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार सहभागी झाले होते. यावेळी सलमान खानचा भाऊ अभिनेता सोहेल खान याचा एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. यावरुन त्याला ट्रोल केलं जात आहे.

सलमान खानचा ५७ वा वाढदिवस दणक्यात साजरा करण्यात आला. यावेळी त्याचा भाऊ सोहेल खानचा एक व्हिडीओ नुकतंच पापाराझींनी शेअर केला आहे. या व्हिडीओत अरबाज खान हा फोटोग्राफर्सना पोझ देताना दिसत आहे. त्यावेळी सोहेल खान हा हळूहळू चालत येताना दिसत आहे. यावेळी सोहेल हा त्याचा भाऊ अरबाज खानची मस्करी करताना दिसत आहे. त्या दोघांनी एकत्र फोटोग्राफर्सला फोटोंसाठी पोज दिली आहे.
आणखी वाचा : सलमान खान आणि संगीता बिजलानीचे लग्न का मोडलं? खरं कारण आलं समोर

तर दुसऱ्या एका व्हिडीओ सोहेल खान हा त्याच्या मुलांबरोबर दिसत आहे. यावेळी तो त्याचा लहान मुलगा योहानच्या खांद्यावर हात ठेवताना दिसत आहे. यावेळी तो त्याच्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून चालताना दिसत आहे. यावेळी तो अडखळत आणि विचित्र पद्धतीने चालत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेकांनी त्याला ट्रोल केले आहे.

आणखी वाचा : ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाल्यानंतर उर्वशी रौतेलाची पोस्ट, म्हणाली…

यावेळी एका नेटकऱ्याने कमेंट करताना म्हटले की, “हा किती प्यायला आहे. त्याचा हा अवतार पाहून त्याच्या मोठा मुलालाही लाज वाटत आहे.” तर एकाने “दोघांचीही बायको पळून गेली” असे म्हटले आहे. ‘नशेडी’ असे एकाने म्हटले आहे. “सीमा सजदेहने याच कारणाने सोडलं असावं, तो कायमच दारुच्या नशेत असतो”, असेही एका नेटकऱ्याने म्हटले आहे.

दरम्यान सोहेल खान आणि सीमा खान १९९८ मध्ये लग्नबंधनात अडकले होते. त्यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत. सीमा आणि सोहेल यांची पहिली भेट अभिनेता चंकी पांडे याच्या साखरपुड्या दरम्यान झाली होती. सोहेल आणि सीमा या दोघांचाही धर्म वेगळा असल्याने त्यांच्या लग्नावेळी बऱ्याच अडचणी आल्या होत्या. मात्र आता लग्नाच्या २४ वर्षानंतर त्या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-12-2022 at 15:38 IST

संबंधित बातम्या