scorecardresearch

आलिया भट्टच्या प्रेग्नेंसीची बातमी ऐकली आणि करण जोहर रडू लागला, कारण…

एका मुलाखतीत करण जोहरने त्याच्या भावना व्यक्त केल्या.

karan-johar-alia-bhatt-

बॉलिवूडमधील क्यूट कपल असलेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट्टने नुकतीच चाहत्यांना आनंदाची बातमी दिलीय. आलिया भट्टने एक खास फोटो शेअर करत ती आई होणार असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. ही बातमी ऐकून आलिया आणि रणबीरच्या कुटुंबासह चाहते देखील आनंदी झाले आहेत. तर ही बातमी ऐकल्यानंतर आलियाचा जवळचा मित्र असलेल्या करण जोहरच्या डोळ्यात तर आनंदाश्रूच आले होते.

करण जोहरच्या ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’ या सिनेमातून आलिया भट्टने बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. २०१२ साली आलियाने करियरला सुरुवात केली होती. त्यानंतर आता १० वर्षांनी आलियाच्या आयुष्यात नवं वळण आलंय. ती आई होणार आहे. जेव्हा आलियाने ही बातमी करण जोहरला सांगितली तेव्हा त्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं. करणला खूपच आनंद झाला होता.

करण जोहरने नुकतीच ईटी टाईम्सला मुलाखत दिली होती. यावेळी आलियाच्या गरोदर असल्याच्या बातमीवर पहिली प्रतिक्रिया काय होती? असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. यावर कऱण म्हणाला. “मी रडू लागलो होतो. मला आठवतंय ती माझ्या ऑफिसमध्ये आली होती. तिने मला ही बातमी दिली आणि माझ्या डोळ्यातून पाणीच आलं, मी रडू लागलो. हीच माझी पहिली प्रतिक्रिया होती. तिने मला मिठी मारली. मला विश्वासच बसत नव्हता की आता माझ्या एका बाळालाच बाळ होणार आहे. माझ्यासाठी तो क्षण खूपच भावूक होता आणि अजूनही आहे.”

आलियाला मुलीप्रमाणे सांभाळलं असल्याचं यावेळी करण म्हणाला. “स्टुडन्ट ऑफ द इयर सिनेमाच्या वेळी ती केवळ १७ वर्षांची होती. या १२ वर्षात आमच्यातलं नातं घट्ट झालंय. आलियाचं बाळ हातात घेण्यासाठी मी उत्सुक आहे. तो क्षण खूपच खास असणार आहे. मी पहिल्यांदा जेव्हा माझ्या दोन्ही बाळांना कुशीत घेतलं तेव्हा जो आनंद मला झाला तोच आनंद मला आलियाचं बाळ घेताना होणार आहे.” असं म्हणत करण त्याचा आनंद व्यक्त केला.

आलिया लवकरच करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमातून रणवीर सिंहसोबत झळकणार आहे. तर करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोच्या सातव्या सिझनच्या पहिल्या भागात आलिया आणि रणवीर खास पाहूणे म्हणून हजेरी लावणार आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Karan johar first reaction on alia bhatt pregnancy news kpw

ताज्या बातम्या