अभिनेत्री शिवानी सुर्वे व अभिनेता अजिंक्य ननावरे लवकरच लग्नबंधनात अडकून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत. नुकताच दोघांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला. अभिनेत्रीने साखरपुड्याचे काल फोटो शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. “अखेर बंधनात अडकलो,” असं कॅप्शन देत तिने साखरपुड्यातील खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले. तेव्हापासून शिवानी-अजिंक्यवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच शिवानीच्या हळदीचा व्हिडीओ समोर आला आहे.

अभिनेत्री शिवानी सुर्वेच्या हळदीचा व्हिडीओ अभिनेता माधव देवचकेने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये ‘बिग बॉस’ मराठीत झळकलेले कलाकार धमाल करताना पाहायला मिळत आहे. माधवसह ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे, नेहा शितोळे, सई रानडे डान्स करताना दिसत आहे. यांच्याबरोबर शिवानी देखील थिरकताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Video: साखरपुड्यात शिवानी सुर्वेला अंगठीला घालताना अजिंक्यचा झाला गोंधळ, पाहा व्हिडीओ

माधवने शेअर केलेल्या शिवानीच्या हळदीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. ‘बिग बॉस’ मराठीतील कलाकारांना एकत्र पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे.

हेही वाचा – चोप्रा कुटुंबात पुन्हा वाजणार सनई-चौघडे, परिणीतीनंतर प्रियांकाची ‘ही’ बहीण चढणार बोहल्यावर, स्वतः खुलासा करत म्हणाली…

दरम्यान, शिवानी-अजिंक्यच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, शिवानी नुकतीच ‘झिम्मा २’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिने साकारलेली मनाली प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. आता लवकरच शिवानी ‘जिलबी’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तिच्या जोडीला स्वप्नील जोशी, प्रसाद ओक असणार आहेत. तसंच शिवानीचा होणारा नवरा अजिंक्य सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.