scorecardresearch

Premium

“स्त्रियांचे डोळे वाचता आले पाहिजेत”, ‘झिम्मा २’च्या भूमिकेबद्दल सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, “एक पुरुष म्हणून…”

‘झिम्मा २’च्या भूमिकेबद्दल सिद्धार्थ चांदेकरने दिलं दिलखुलास उत्तर, कबीरच्या भूमिकेविषयी म्हणाला…

jhimma 2 fame siddharth chandekar talks about his kabir character
'झिम्मा २' फेम अभिनेता सिद्धार्थ चांदेकर

‘झिम्मा २’ चित्रपटामुळे सध्या अभिनेता सिद्धार्थ चांदेकर चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने कबीर हे पात्र साकारलं आहे. या कबीरने चित्रपटात सात बायकांचं रियुनियन घडवून आणलंय. चित्रपटातील इतर सात अभिनेत्रीप्रमाणे सध्या सिद्धार्थ चांदेकरचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. ‘झिम्मा २’ला मिळणाऱ्या भरघोस प्रतिसादानंतर अलीकडेच या सगळ्या कलाकारांनी राजश्री मराठीच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. या संवादात अभिनेत्याने आईचं दुसरं लग्न, त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर असणारा स्त्रियांचा प्रभाव या सगळ्या गोष्टींवर आपलं दिलखुलास मत मांडलं.

सिद्धार्थ चांदेकर म्हणाला, “कबीर या पात्राचं सध्या प्रचंड कौतुक होतंय. त्यामुळे एकंदर मला खरंच खूप भारी वाटतंय. पण, हे पात्र मी एवढ्या उत्तमरित्या साकारु शकलो याचं संपूर्ण श्रेय मी तुम्हा स्त्रियांना देईन. कारण, माझं आणि हेमंतचं सांगायचं झालं, तर आमच्या आयुष्यातील स्त्रियांनी आम्हाला वाढवलंय.”

Sameer Wankhede on aryan Khan arrest
आर्यन खानच्या अटकेनंतर जातीवरून केलं लक्ष्य, भ्रष्टाचाराचे झालेले आरोप; समीर वानखेडे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा संबंध…”
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
renowned litterateur and padma shri awardee usha kiran khan
व्यक्तिवेध : उषाकिरण खान
Madhavi Mahajani balasaheb thackeray memory
नोकरी करताना झाला त्रास, बाळासाहेब ठाकरेंना कळालं अन्…; गश्मीर महाजनीच्या आईने सांगितला प्रसंग, म्हणाल्या, “मीनाताईही…”

हेही वाचा : ठरलं तर मग : “कॉन्ट्रॅक्ट संपल्यावर लग्न…”, सायली अर्जुनला देणार ‘हा’ महत्त्वाचा सल्ला, मालिकेत पुढे काय घडणार?

सिद्धार्थ पुढे म्हणाला, “माझ्या आयुष्यात आतापर्यंत एकाही पुरुषाचा प्रभाव नव्हता. लहानपणी मला माझ्या आईने गोष्टी शिकवल्या, मग बहीण होती, माझ्या दोन्ही कडच्या आज्या, त्यानंतर माझी बायको माझ्या आयुष्यात आली अर्थात या सगळ्या स्त्रियांनी माझं आयुष्य भरलेलं आहे. त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या. या सगळ्या जणींबरोबर राहून मला एक गोष्ट उत्तम जमते ती म्हणजे, मला स्त्रियांचे डोळे खूप चांगले ओळखता येतात. स्त्रियांचे डोळे क्षणोक्षणी बदलत राहतात. ते डोळे योग्यवेळी वाचता आले पाहिजेत. जर त्यांचे डोळे तुम्ही वाचलेत, तर एक पुरुष म्हणून तुम्हाला अगदी पटकन कळेल की, केव्हा एखाद्या स्त्रीला आपली गरज आहे आणि केव्हा नाहीये.”

हेही वाचा : “बायको Happy Anniversary”, शशांक केतकरच्या लग्नाला ६ वर्षे पूर्ण! पत्नीला म्हणाला, “चिडक्या, भावुक…”

“माझ्या आयुष्यात एवढ्या स्त्रियांचा प्रभाव असल्यानेच मी कबीर हे पात्र अगदी उत्तमरित्या आणि अगदी सहज साकारु शकलो. अर्थात हेमंतने सुद्धा कबीर हे पात्र अगदी तसंच छान लिहिलंय. कारण, त्याच्या आयुष्यात सुद्धा स्त्रियांचा प्रभाव सर्वाधिक आहे.” असं सिद्धार्थने सांगितलं. दरम्यान, ‘झिम्मा २’ चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून, राज्यभरात या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Jhimma 2 fame siddharth chandekar talks about his kabir character in the movie sva 00

First published on: 04-12-2023 at 15:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×