‘तुझ्या दिसण्यामुळं तुझं अभिनेत्री होणं कठीण’, नीना गुप्तांनी मुलीला दिला होता सल्ला

नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीमध्ये हा खुलासा केला आहे.

neena gupta, masaba gupta, neena gupta,
मसाबा एक सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता या चर्चेत आहेत. या चर्चा त्यांच्या जीवनावर आधारित ‘सच कहूं तो’ हे पुस्तक प्रकाशीत झाल्यामुळे सुरु झाल्या होत्या. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या प्रोफोशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफबाबतही अनेक खुलासे केले आहेत. नीना गुप्ता यांच्या मुलीचे नाव मसाबा गुप्ता आहे. पण मसाबाने कधीही अभिनेत्री होऊ नये असे नीना यांना वाटत असे.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नीना यांनी याबाबत खुलासा केला आहे. मसाबा जशी दिसते त्यामुळे तिला आपल्या देशात काम मिळणे कठीण झाले असते असे नीना म्हणाल्या आहेत. ‘मी मसाबाला सांगितले होते की जर तुला अभिनेत्री व्हायचे असेल तर परदेशात जा. तुझ्या दिसण्यामुळे तुझे अभिनेत्री होणे कठीण आहे. तुला भारतात काम मिळणार नाही. तू कधी अभिनेत्री होऊ शकत नाहीस. तू कधी हेमा मालिनी बनू शकत नाहीस. तू कधी आलिया भट्ट बनू शकत नाहीस’ असे नीना म्हणाल्या होत्या.

आणखी वाचा : ‘चोली के पीछे…’ गाण्याच्या वेळी सुभाष घई यांची मागणी ऐकून नीना गुप्ता यांना वाटली होती लाज

एकदा फ्लाइटमध्ये नीना गुप्ता यांची भेट अभिनेता शाहरुख खान आणि करण जोहरशी झाली होती. ‘त्यावेळी त्यांनी मला त्यांचा नंबर दिला होता. पण मी जेव्हा त्यांना फोन केला तेव्हा त्यांनी उचलला नाही. खूप मतलबी लोकं आहेत ते’ असे नीना म्हणाल्या.

मसाबा एक सेलिब्रिटी फॅशन डिझायनर आहे. काही दिवसांपूर्वी मसाबाने वेब सीरिजमध्ये काम करत अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. तिने ‘मसाबा मसाबा’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. ही सीरिज प्रदर्शित होताच चर्चेत होती.

नीना गुप्ता या एकेकाळी वेस्ट इंडिजचा क्रिकेटर विवियन रिचर्ड्ससोबत रिलेशनशीपमध्ये होत्या. मसाबा ही विवियन आणि नीना यांची मुलगी आहे. पण मुलगी झाल्यानंतर विवियन रिचर्ड्स यांनी नीनी गुप्ता यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता. तो काळ नीना यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण होता. नीना यांना चित्रपट मिळणे देखील बंद झाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Neena gupta told masaba gupta why she cant become actor avb