नुकताच गणेशोत्सवत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी दरवर्षी मोठ्या भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करत असतात. अभिनेता शाहरुख खानने देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याच्या घरी गणेश पूजन केलं. मात्र शाहरुखने विसर्जनाच्या दिवशी शेअर केलेल्या पोस्टमुळे त्याला काही कट्टरपंथीयांनी ट्रोल केलं आहे.

शाहरुख खानने त्याच्या घरातील गणशे विसर्जनाचा एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. “पुढच्या वर्षी गणपती बाप्पाचं आगमन होईपर्यंत त्याचे आशिर्वाद आपल्यावर राहो…गणपती बाप्पा मोरया” असं कॅप्शन देत शाहरुखने चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र काही कट्टरपंथीयांनी शाहरुखला या पोस्टवरून ट्रोल केलं आहे.

काही मुस्लिम कट्टरपंथीयांनी शाहरुखला धर्मावरून ट्रोल केलंय. एक युजर म्हणाला, ” रोल मॉडल असून तू असं का करतोस” तर दुसरा युजर म्हणाला, “आधीच आपला धर्म बदलला आहे” तर आणखी एक युजर म्हणाला, “देवाने तुला योग्य योग्य मार्ग दाखवावा हीच प्रार्थना. फक्त काही लोकांचं मन जिंकण्यासाठी सर्व सीमा ओलांडून तू मुस्लिम असल्याचं विसरून गेला आहेस”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही कट्टरपंथीयांनी शाहरुख खानला ट्रोल केलं असलं तरी अनेकांनी शाहरुख खान धर्मनिरपेक्ष असल्याचं म्हणत त्याचं कौतुक केलंय.