scorecardresearch

Premium

“त्याच्यासारखी एनर्जी कुठल्याही दुसऱ्या कलाकाराकडे नाही…” ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सिद्धार्थ जाधवचं केलं कौतुक, म्हणाले, “बारा-चौदा तास…”

अभिनेते मिलिंद गवळी सिद्धार्थ जाधवविषयी काय म्हणाले? जाणून घ्या…

aai kuthe kay karte milind gawali Appreciated Siddharth Jadhav
अभिनेते मिलिंद गवळी सिद्धार्थ जाधवविषयी काय म्हणाले? जाणून घ्या…

‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेते मिलिंद गवळी हे नेहमी चर्चेत असतात. मिलिंद गवळी सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. दैनंदिन जीवनातील येणारे प्रत्येक अनुभव चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता सिद्धार्थ जाधवचं कौतुक केलं आहे. याचं निमित्त होतं, ‘होऊ दे धिंगाणा २’

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सिद्धार्थ जाधव सूत्रसंचालन करत असलेल्या ‘होऊ दे धिंगाणा २’च्या आजच्या आणि उद्याच्या भागात ‘आई कुठे काय करते’ आणि ‘अबोली’ मालिकेची टीम हजेरी लावणार आहेत. त्याच निमित्ताने अभिनेते मिलिंद गवळी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी अभिनेता सिद्धार्थ जाधवचं कौतुक केलं आहे.

Marathi Kirtankar Bharti Tai Adsul
इन्फ्लुअन्सर नव्हे, किर्तनकार! तरुणांना अध्यात्माची गोडी लावणाऱ्या २४ वर्षीय भारतीताई आडसूळ कोण?
renowned litterateur and padma shri awardee usha kiran khan
व्यक्तिवेध : उषाकिरण खान
ulta chashma
उलटा चष्मा: ही घराणेशाही नाहीच!
Nitin Gadkari
“चांगलं काम करणाऱ्याला सन्मान मिळत नाही, अन् वाईट…”, नितीन गडकरींचा रोख कोणाकडे?

हेही वाचा – आर्यन खान ड्रग्ज प्रकरण ते KKR ची जबाबदारी! शाहरुख खानचा सगळा कारभार सांभाळणारी पडद्यामागची हिरो पूजा ददलानी आहे तरी कोण?

अभिनेते मिलिंद गवळी यांची पोस्ट वाचा…

“आता होऊ दे धिंगाणा २”

स्टार प्रवाहचा एक धमाल कार्यक्रम, ज्यामध्ये आपला सिद्धार्थ जाधव सूत्रसंचालन करतो. सिद्धार्थ जाधवच्या या कार्यक्रमांमध्ये मी पाचव्यांदा येतो आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा कलाकार म्हणून मला बोलवलं जातं. मालिकेचे एकूण सात कलाकार असतात. एखाद्या नवीन येणाऱ्या सिनेमाचं प्रमोशन सुद्धा या कार्यक्रमात केलं जातं. एकदा रितेश देशमुख आणि जिनिलीयाचा ‘वेड’ नावाच्या चित्रपटाचं प्रमोशन होतं. दुसऱ्यांदा ‘सनी’ नावाच्या चित्रपटाचे प्रमोशन होतं आणि आता या वेळेला ‘झिम्मा २’ हेमंत ढोमे यांच्याच चित्रपटाचे प्रमोशन होतं. त्या त्या चित्रपटाचे कलाकार आणि काही तंत्रज्ञ आमच्याबरोबर या कार्यक्रमात भाग घेतात. यावेळेला सुहास जोशी, हेमंत ठोमे, क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, रिंकू राजगुरू आणि संगीतकार अमित राज हे सगळे आमच्याबरोबर उपस्थित होते आणि त्यांनी सुद्धा खूप धमाल केली.

आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये एक असा कलाकार आहे ज्याच्यामध्ये इतकी भरभरून एनर्जी आहे की त्याच्यासारखी एनर्जी कुठल्याही दुसऱ्या कलाकाराकडे नाहीये. त्याचबरोबर तू उत्तम कलाकार आणि अतिशय नम्र असा व्यक्ती पण आहे. तू म्हणजे आमचा लाडका सिद्धार्थ जाधव. आता मी या कार्यक्रमांमध्ये पाचव्यांदा जातोय आणि पाचव्यांदा मी सिद्धार्थला बारा-चौदा तास सतत एनर्जेटीकली परफॉर्म करताना पाहिलाय, त्यात सेन्स ऑफ ह्युमर (sense of humour), विनोदाची वेळ (Comedy timing) याला सुद्धा तोड नाही. माझ्यासाठी हा कार्यक्रम म्हणजे एक स्ट्रेस बस्टर (stress buster) असतो. बारा-चौदा तास फक्त हसत राहायचं आणि प्रसन्न राहायचं. वेड्यासारखी धमाल मस्ती बालिशपणा जो तुम्ही आयुष्यात कधीही केलेली नसतो, तो तिकडे जाऊन करायचा , हा नियम आहे या कार्यक्रमाचा. शनिवार, रविवार म्हणजेच २५/२६ नोव्हेंबरला स्टार प्रवाहवर तुम्हाला सगळ्यांना ही मजा मस्ती बघायला मिळणार आहे. आमच्याबरोबर तुम्ही पण हसा आणि प्रसन्न व्हा.

हेही वाचा – छोट्या पडद्याची लाडकी सून पुन्हा नंबर १! TRPच्या शर्यतीत ‘ठरलं तर मग’चं वर्चस्व कायम, ‘या’ आहेत टॉप १० मालिका

दरम्यान, मिलिंद गवळी यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी बऱ्याच मराठीसह हिंदी चित्रपटात काम केलं आहे. शिवाय ते अनेक हिंदी मालिकेही झळकले आहेत. सध्या त्यांची ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतील अनिरुद्ध ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Aai kuthe kay karte milind gawali appreciated siddharth jadhav pps

First published on: 25-11-2023 at 08:00 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×