हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अर्जुन बिजलानी. त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्य घडणारा घडामोडी जाणून घेण्यासाठी तसेच चाहते उत्सुक असतात. सोशल मीडियावर सक्रिय राहून तो देखील आपल्या आयुष्यातील महत्वाच्या गोष्टी चाहत्यांची शेअर करत असतो. आता त्याने त्याच्या मुलासाठी स्वतःची एक वाईट सवय सोडण्याचा एक निर्णय घेतला आहे.
नवीन वर्षानिमित्त त्यांनी आपल्या मुलासाठी एक खास संकल्प केला आहे तो म्हणजे अर्जुनला असलेली धूम्रपान करण्याची सवय सोडण्याचा. अर्जुनाने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितलं की मी पंधरा वर्षे धूम्रपान करत होता. आता त्याने त्याची ही सवय सोडली आहे. या सोबतच त्याने दारू पिणंही बंद केलं आहे. आता तो फक्त काही खास कारण असेल तरच दारूला हात लावतो.
आणखी वाचा : अभिषेक बच्चनलाही रितेश-जिनिलीयाने लावलं ‘वेड’, म्हणाला, “तुम्ही दोघांनी…”
मुलाखतीत अर्जुन म्हणाला, “मी हा निर्णय माझ्या मुलासाठी घेतला आहे. त्याच्यासमोर मी एक चांगलं उदाहरण बनू इच्छितो. मी माझ्या वर्षाची सुरुवात या सकारात्मकतेने केली आहे. आता मला खूप फ्रेश आणि छान वाटतंय.”
हेही वाचा : अर्जुन बिजलानी आणि विशाल आदित्यसोबत श्वेता तिवारीचा डान्स व्हिडीओ व्हायरल
त्याच्या या निर्णयामुळे त्याचे कुटुंबीय आणि त्याचे चाहतेही खुश झाले आहेत. सोशल मीडियावरील फोटोवर कमेंट करून ते त्याच्या या निर्णयाचे कौतुक करत आहेत. त्याचप्रमाणे “तू फक्त तुझ्या मुलासाठीच नाही तर अनेकांसाठी एक आदर्श आहेस,” असंही अनेकांनी लिहिलं.