Nagpur News Updates, 11 August 2025 : मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरात बेकायदेशीर वन्यजीव व्यापार करणाऱ्यांवर वन विभागाने गुरुवारी संयुक्त धाड टाकली. तसेच,राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर ओसरला असला तरीही बुधवारपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे.दरम्यान, पुणे परिसरातील झपाट्याने झालेले नागरीकरण लक्षात घेता तीन नवीन महानगरपालिका वा हद्दवाढ ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करावी असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
तेव्हा अशा घडामोडींसह मुंबई शहर, मुंबई महानगर, पुणे आणि नागपूर शहर परिसरातील विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल.
Live Updates
Mumbai Pune Nagpur Latest News Updates in Marathi
महावितरण कर्मचाऱ्यांकडून जीवाची बाजी… दुथडी भरून वाहणारी वेणा नदी ओलांडून वीज यंत्रणेची दुरूस्ती
नागपूर जिल्ह्यात रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ३३ केव्ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा केंद्रास वीजपुरवठा करणाऱ्या वाहिनीत अचानक बिघाड झाला. ...सविस्तर वाचा
हास्य कलाकार कपिल शर्माला मुंबई पोलिसांकडून सुरक्षा; कॅनडामधील हॉटेलवर दुसऱ्यांदा गोळीबार
या कॅफेवर १० जुलै रोजी प्रथम गोळीबार झाला होता. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी दुसऱ्यांदा अशाच प्रकारचा हल्ला झाला. ...सविस्तर बातमी
महापालिकेची परवानगी न घेता बसथांब्यांची उभारणी; ठेकेदारवर कारवाईची ‘मनसे’ची आयुक्तांकडे मागणी
बसथांब्यांची उभारणी करण्यासाठीचे काम मिळालेल्या ठेकेदाराने महापालिकेच्या पथ विभाग आणि आकाशचिन्ह विभागाची परवानगी न घेता आणि शुल्क न भरता बसथांबे उभारल्याचे उघडकीस आले आहे. ...सविस्तर बातमी
वंदे भारतच्या कौतुकात इतर रेल्वेगाड्या उपेक्षित; राज्यांतर्गत धावणाऱ्या रेल्वेगाड्या एलएचबी डब्यापासून वंचित
राज्यातंर्गत धावणाऱ्या रेल्वेगाड्या लिंके हाॅफमॅन बुश (एलएचबी) डब्यापासून वंचित आहेत. सरकारचे वंदे भारत वाढवण्याकडे फक्त लक्ष असून इतर रेल्वेगाड्यांना दुर्लक्षित केल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. ...सविस्तर बातमी
मुंबईत आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल खगोलभौतिकी ऑलिम्पियाड; ६३ देशांमधील २८८ विद्यार्थ्यांचा सहभाग
उद्या मंगळवार, १२ ऑगस्ट रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. ...सविस्तर वाचा
मुंबई : बेस्टचे प्रवासी घटले; २५ लाखापर्यंत घसरण
मे महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या ३० ते ३२ लाखांवरून २५ लाखापर्यंत घसरली आहे. तब्बल ५ ते ७ लाख प्रवासी घटले आहेत. ...सविस्तर बातमी
लातूर रेल्वे डबेनिर्मिती कारखान्यातून दहा हजार स्थानिकांना रोजगार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
लातूर जिल्हा परिषदेच्या परिसरात गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले. ...सविस्तर वाचा
विकासावरील चर्चा भावकी आणि नात्या-गोत्यावर! खासदार काळे आणि दानवे यांच्यातील जुगलबंदी
रावसाहेब दानवे यांचे पुत्र भोकरदन आणि जाफराबाद भागातील विधानसभा सदस्य आहेत. ...सविस्तर वाचा
संपूर्ण राज्यात १ जून ते ११ ऑगस्टपर्यंत पावसाची तूट; मुंबईसह ठाणे भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
कोकण, विदर्भ भागातही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तर, संपूर्ण राज्यात सरासरी ९ टक्के पावसाची तूट आहे. दरम्यान, मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, रायगड भागात मंगळवारी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ...सविस्तर बातमी
फिर्यादी पक्षाचा दावा पटण्यासारखा नाही; नऊ वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपांतून आरोपी निर्दोष
वृद्ध आरोपीवर शेजारी राहणाऱ्या नऊ वर्षांच्या मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपांतर्गत २०१८ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...वाचा सविस्तर
पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत; विरार, वांद्रे येथे तांत्रिक बिघाड
विरार येथे सोमवारी सकाळी १०.४५ वाजता पॉईंटमध्ये बिघाड झाल्याने लोकल सेवा खोळंबली. या घटनेची माहिती मिळताच, घटनास्थळी संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी पोहचून त्यांनी दुरुस्तीची कामे हाती घेतली. ...सविस्तर वाचा
कबुतरखान्यावर पुन्हा छत न्यायालयीन सुनावणीकडे साऱ्यांचे लक्ष
कबुतरखाने बंद करण्याचे आदेश कायम ठेवल्याचे ८ ऑगस्टच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. पुढील सुनावणी १३ ऑगस्टला होणार असून या सुनावणीकडे महापालिका प्रशासनासह जैन धर्मियांचेही लक्ष लागले आहे. ...सविस्तर वाचा
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय; विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम वजा करून उर्वरित शुल्काचीच आकारणी…
शुल्क नियामक प्राधिकरणाने मंजूर केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रकमेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, रोख किंवा वस्तूच्या स्वरूपात मागणी केल्यास त्याचा अर्थ नफेखोरी असा होतो. ...वाचा सविस्तर
मुंबई सेंट्रलच्या बेलासिस उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीला वेग; वर्षाअखेरीस पूलाचे बांधकाम पूर्ण होणार
मुंबई सेंट्रल स्थानकानजीक रेल्वे मार्गावर केबल आधारित पूल उभारण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांनी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट (महारेल) यांच्याशी करार केला आहे. ...सविस्तर वाचा
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील धार्मिक कार्यक्रमांबाबत तक्रार दाखल; पर्यावरणप्रेमींचा संताप
गेल्या महिन्यात २८ जुलै रोजी तसेच आता ९ ऑगस्ट रोजी उद्यानात झालेल्या कार्यक्रमांचा उल्लेख करत पर्यावरणप्रेमींनी हे कार्यक्रम वनाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच झाल्याचा आरोप केला आहे. ...सविस्तर बातमी
‘टेट’चा निकाल का रखडला? परीक्षा परिषदेने दिली माहिती…
परीक्षा होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला, तरी निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे राज्यभरातील उमेदवारांमध्ये अस्वस्थता आहे. ...अधिक वाचा
हिंजवडीत तरुणाच्या डोक्यात मारली बिअरची बाटली, नेपाळी तरुण…
शेजाऱ्यांनी 'तुम्ही आमच्याबद्दल बोलत होता का' असे विचारून शिवीगाळ करत एकास लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना निगडी येथील अजिंठानगरमध्ये घडली. ...सविस्तर वाचा
अनधिकृत फलक लावल्यास फौजदारी गुन्हे; पिंपरी महापालिकेचा निर्णय; चार महिन्यांत ४७ हजार फलकांवर कारवाई
शहरात कोणतीही व्यक्ती, संस्था, व्यापारी, उद्योजक, राजकीय कार्यकर्ते यांनी महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता जाहिरात फलक, किऑक्स लावल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
मालमत्ता कर थकबाकी नसल्याचा दाखला घरबसल्या; पिंपरीतील ६४ हजार नागरिकांना सुविधेचा लाभ
शहरातील नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळवण्यासाठी महापालिकेच्या कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागत होता. कार्यालयात जावे लागत असल्यामुळे नागरिकांना वेळ आणि श्रमाचा अपव्यय होत होता. ...सविस्तर बातमी
वारजे येथे पोलीस असल्याची बतावणी करून महिलेकडील दागिने लंपास
महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी पिशवीतून एक लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने लांबविले. ...सविस्तर बातमी
कलंकित मंत्र्यांच्या विरोधात कोल्हापुरात ठाकरे शिवसेनेचे आंदोलन
सत्तेसाठी हतबल असलेल्या नेतृत्वाने ही कारवाई न केल्याने या महाराष्ट्राचा स्वाभिमान टिकवण्यासाठी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने येथील तावडे हॉटेल जवळ जोरदार निदर्शने केली. ...सविस्तर वाचा
पंचगंगा नदी प्रदूषण मुक्तीसाठी ३९५ कोटीची निविदा मंजूर - धैर्यशील माने
जुलै २०२२ मध्ये खासदार माने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या मांडल्या होत्या. ...सविस्तर वाचा
राहुल गांधींसह इंडिया आघाडीतील नेत्यांना अटक; केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन
या आंदोलनामुळे संविधान चौकात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्ह्यात इतरही ठिकाणी काँग्रेसने आंदोलन करून निषेध नोंदविला. ...सविस्तर बातमी
बीडीडी चाळ पुनर्विकास नायगाववासियांची दिवाळी नव्या घरात; वरळीपाठोपाठ नायगावमधील ८६४ रहिवाशीही सप्टेंबरअखेरीस ताबा
म्हाडाच्या मुंबई मंडळाने नायगावमधील पाच पुनर्वसित इमारतींच्या कामाला वेग दिला असून या इमारतींचे ८० टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. ...सविस्तर बातमी
Jitendra Awhad : “आधी पक्षचोरांना आपल्या पंखाखाली घेतले, नंतर मतांची…”, जितेंद्र आव्हाड यांची निवडणूक आयोगावर टीका
लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांनी मत चोरी केली होती, हे सप्रमाण लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी दाखवून दिले. ...अधिक वाचा
Ghodbunder Traffic : “गायमुख घाटात खड्डे भरणी नव्हे तर खिसे भरणी”, राजन विचारेंनी केले सरकारवर गंभीर आरोप
घोडबंदर रस्ता हा वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो. या रस्त्यावरून अवजड वाहनासह परिसरातील वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. ...अधिक वाचा
ठाणे: तलावात बुडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू
वाघबीळ येथील झुम्मा नगर परिसरात पियुष सोनवणे राहत होता. सोमवारी दुपारी तो कासारवडवली येथील राम मंदिर तलावात पोहण्यासाठी गेला होता. ...वाचा सविस्तर
कापूस पिंजण्याच्या मशीनमध्ये हात अडकला; क्षणभरात डोक्याचा चेंदामेंदा होऊन रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या…
कल्पना रुपचंद कामडी या गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे कापूस पिंजण्याचे काम करतात. रविवारी दुपारी २.३० च्या सुमारास कल्पना या नेहमी प्रमाणे कापूस पिंजत होत्या. ...सविस्तर बातमी
लेडीज बारवाले मंत्री, रमीबाज मंत्री, अघोरी पूजा व कर्मचाऱ्यास मारहाण करणारे…जिवंत देखावे चर्चेचा विषय; ठाकरे सेनेचा अभिनव 'जन आक्रोश'
आज सोमवारी, ११ ऑगस्ट रोजी स्थानिय जिजामाता क्रीडा व व्यापार संकुल परिसरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे करण्यात आलेले जन आक्रोश आंदोलन या पठडीतील ठरले. ...वाचा सविस्तर
भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या हाती महत्वाची पदे? 'एसीबी'च्या कारवाईत अटक, घरातून ४६ लाख जप्त, आता ‘या’ पदाचा प्रभार; डाव्या पक्षांचा इशारा…
८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार (आस्था.) सचिन जैस्वाल, यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबत आदेश केलेले आहेत. ...सविस्तर वाचा
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह ११ ऑगस्ट २०२५