Mumbai News Updates, 17 July 2025: महाराष्ट्रात त्रिभाषा सूत्र लागू करणारच अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “एक गोष्ट निश्चित सांगतो की, तीन भाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच. पहिलीपासून की कधी ते कमिटी त्याबाबत ठरवेल. १०० टक्के आम्ही हे भाषा सूत्र लागू करणारच. इंग्रजीला पायघड्या भारतीय भाषांचा विरोध करायचा हे मी सहन करणार नाही.”

दरम्यान, दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या विमानाचं इंजिन बुधवारी रात्री बिघडलं. त्यामुळे हे विमान तातडीने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आलं. इंडिगो विमानाने दिल्लीहून उड्डाण केल्यानंतर रात्री ९ वाजून २५ मिनिटांनी या विमानात बिघाड झाल्याची माहिती ATC ला दिली होती. या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर जिल्ह्यातील ताज्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या.

Live Updates

Pune Mumbai Nagpur   News Updates in Marathi

23:17 (IST) 17 Jul 2025

मुंबईतील अतिधोकादायक इमारतींबाबत सरकारचा मोठा निर्णय!

अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यास कोणीच तयार नसेल तर म्हाडा संबंधित इमारत ताब्यात घेऊन पुनर्विकास करेल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत केली. ...सविस्तर वाचा
22:12 (IST) 17 Jul 2025

आले संशोधन केंद्र नेमकं कुठे होणार; वित्त विभाग, कृषिमंत्र्यांची भूमिका काय?

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे सध्या अस्तित्वात असलेल्या संशोधन केंद्राचे विस्तारीकरण करण्यात येईल, अशी घोषणा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत केली. ...वाचा सविस्तर
22:02 (IST) 17 Jul 2025

मिठी नदीचा मुद्दा अधिवेशनात का गाजतोय? शिंदे सेना - ठाकरे सेना आमनेसामने का? भाजपची भूमिका काय?

विरोधकांचे प्रश्न, लक्षवेधी प्रलंबित ठेवली जाते आणि सत्ताधाऱ्यांना एकाच विषयावर तीन - तीन चर्चा करण्याची मुभा का दिली जाते, असा प्रश्न अनिल परब यांनी विचारून सभापती प्रा. राम शिंदे यांची कोंडी केली. ...सविस्तर वाचा
21:53 (IST) 17 Jul 2025

माण परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा

हिंजवडी, माण, मारुंजी भागातील वाहतूककोंडी सोडवण्याच्या दृष्टीने पीएमआरडीएसह इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. ...सविस्तर वाचा
21:44 (IST) 17 Jul 2025

हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘पीएमआरडीए’चे मोठे पाऊल

हिंजवडी परिसरात सातत्याने वाहतूककोंडी होत असून, हिंजवडी येथील राजीव गांधी आयटी पार्कमध्ये काम करणारे आयटीयन मोठ्या त्रासाला सामोरे जात आहेत. ...सविस्तर वाचा
20:57 (IST) 17 Jul 2025

उद्धव ठाकरेंना शह देण्यासाठी फडणवीसांची नवीन शक्कल; ८० टक्के मतदान केंद्रांवर...

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांची प्रचंड मोठे यश संपादन केले. मात्र, असे असले तरी मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्षांनी आगामी निवडणुकीसाठी पदाधिकाऱ्यांना नवीन लक्ष्य दिले आहे. ...सविस्तर वाचा
20:02 (IST) 17 Jul 2025

बनावट तोतया पत्रकार बनून खंडणीची मागणी; आपचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार व अर्जुन धुन्ना विरुद्ध गुन्हा

यामध्ये आरोपी बादल दुर्गाप्रसाद दुबे (३६), संगिता बादल दुबे (२७ ) दोन्ही रा. रेंगेपार ता. साकोली जि. भंडारा व अजय विजय उईके (३१) रा. गजानन मंदीर रोड शितला माता मंदीरच्या मागे, चंद्रपूर या तीन आरोपींचा समावेश होता. ...अधिक वाचा
19:53 (IST) 17 Jul 2025

महिला आणि बालविकास विभागाचा मोठा निर्णय ! विद्यार्थ्यांसाठी ठरणार फायदेशीर

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या अनाथ मुला-मुलींना शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्कात १०० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
19:33 (IST) 17 Jul 2025

अकरावीच्या दुसऱ्या फेरीच्या निवड यादीत २ लाख ५१ हजार ८०४ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर

आता विद्यार्थ्यांना १८ ते २१ जुलै या कालावधीत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे. ...सविस्तर बातमी
19:21 (IST) 17 Jul 2025

खड्डे बुजविण्यासाठी कर्ज द्या! खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अनोखे आंदोलन

भोसरीतील चौकात उभे राहून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी कर्ज हवे, असा फलक हातामध्ये घेऊन खड्डे कायमस्वरुपी बुजविण्याची मागणी केली. ...सविस्तर बातमी
18:59 (IST) 17 Jul 2025

सात वर्षांपासून वडिलांकडून मुलीवर लैंगिक अत्याचार… नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनांमध्ये वाढ

१९ वर्षीय तरुणीने बुधवारी तिच्या वडिलांविरोधात पोलिसांकडे बलात्काराची तक्रार केली. मागील सात वर्षांपासून ते तिच्यावर लैंगिक अत्याचार करीत होते. पोलिसांनी तिच्या वडिलांना अटक केली. ...सविस्तर वाचा
18:50 (IST) 17 Jul 2025

भाजपा कार्यालयाची पाटी गुजरातीत…मनसेने दिला सत्ताधारी भाजपला इशारा

नवी मुंबईत मनसेने थेट सत्ताधारी भाजपला इशारा देत सीवूड्समधील भाजप जनसंपर्क कार्यालयाची गुजराती भाषेत असलेली पाटी मराठी भाषेत करण्यास सांगितले आहे. ...सविस्तर वाचा
18:49 (IST) 17 Jul 2025

धक्कादायक! शेतकऱ्यांच्या घरी जाऊन विनापरवाना सुरू होती खत विक्री…

तुमसर तालुक्यातील मांढळ येथे गोदावरी फर्टिलायझर कंपनीकडून विनापरवाना सेंद्रिय खत विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाने संयुक्त कारवाई करत संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे. ...अधिक वाचा
18:43 (IST) 17 Jul 2025

राज्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हनी ट्रॅप…. केंद्रबिंदू ठाण्यात

गेल्याकाही दिवसांपासून विधीमंडळात एक- दोन नव्हे तर तब्बल ७२ अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याच्या चर्चांवरून अधिवेशनात आरोप प्रत्यारोपांच्या फैऱया झटत असताना हा हनीट्रॅपचा केंद्रबिंदूच ठाण्यात असल्याचे समोर आले आहे. ...वाचा सविस्तर
18:34 (IST) 17 Jul 2025

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी आनंदाची बातमी….शासकीय नोकरीत आता थेट पाच टक्के…..

जिल्ह्याचे पालकमंत्री संजय सावकारे यांच्या पुढाकाराने आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांच्याशी मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीनंतर हा निर्णय झाला आहे. ...वाचा सविस्तर
18:28 (IST) 17 Jul 2025

भुयारी मार्ग की तलाव? बुडाल्याने एकाचा बळी

या भुयारी मार्गामुळे एकाचा बळी गेल्याने त्याला जबाबदार कोण? हा भुयारी मार्ग की तलाव? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. ...वाचा सविस्तर
18:20 (IST) 17 Jul 2025

आरोपीकडून पोलिसांची पैशाने ओवाळणी….आता तेच पोलीस मागावर…कारण, एम.डी. ड्रग्स घेऊन….

‘एम.डी. ड्रग्स’ प्रकरणात खदान पोलिसांनी दोघांना अटक केली. तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणातील आरोपी गब्बर जमादारचे शिवसेनेचे माजी मंत्री, माजी आमदार यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचे समाेर आले आहे. ...अधिक वाचा
18:17 (IST) 17 Jul 2025

Video : २० वर्षांआधी रागाने घर सोडले, फुटपाथवर झोपले; आता त्याच गावात बँड बाजाने...

अर्थात ते कुठे यात्रेत, कुंभमेळ्यात हरवले नव्हते. घरगुती वादापायी अन रागाच्या भरात त्यांनी तब्बल वीस वर्षांपूर्वी आपले घर सोडले. ...वाचा सविस्तर
17:56 (IST) 17 Jul 2025

उंच इमारतीवरून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले… तीन महिन्यांत नऊ जणांची आत्महत्या

वांद्रे परिसरात ४० वर्षीय दिव्यांग महिलेने राहत्या इमारतीच्या १६ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.गेल्या काही महिन्यांमध्ये उंच उमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढले असून मागील तीन महिन्यांतील ही नववी घटना आहे. ...सविस्तर वाचा
17:41 (IST) 17 Jul 2025

वाघांचे मृत्यू थांबवण्याचे वनखात्यासमोर आव्हान… २० दिवसात तब्बल १४…

महाराष्ट्रात सर्वाधिक आठ वाघांचा मृत्यू झाला. यापैकी बहुतेक मृत्यू संरक्षित क्षेत्राबाहेर झाले आहेत, ज्याचे कारण शिकार, अपघात आणि संसर्गजन्य रोग आहेत. ...सविस्तर बातमी
17:29 (IST) 17 Jul 2025

पावसाळ्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण… तीनच दिवसात…

सोन्याचे दर एक लाखावर पोहचल्यावर प्रथमच घसरून मंगळवारी (२४ जून २०२५) निच्चांकीवर आले आहे. ...सविस्तर बातमी
17:18 (IST) 17 Jul 2025

गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टखाली वाहतुकीचे दुःस्वप्न! वर्ल्ड रेकॉर्ड ब्रिजखाली साचलं पाणी…

पहिल्या स्तरावर राष्ट्रीय महामार्ग, दुसऱ्या स्तरावर भारतीय रेल्वे ट्रॅक आणि तिस-या स्तरावर उड्डाणपूल तर चौथ्या स्तरावर रेल्वे मेट्रो मार्ग आहे. ...वाचा सविस्तर
17:11 (IST) 17 Jul 2025

१९ हजाराच्या नोटा, एक हजार रुपयांची नाणी; बेस्टच्या कामगारांना अर्धा पगार रोखीने कामगार त्रस्त

बेस्टच्या कर्मचाऱ्यांना रोखीने पगार देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जुलै महिन्याच्या पगारापैकी २० हजार रुपये सुट्ट्या नोटा व नाण्यांच्या स्वरुपात देण्यात आले आहेत. ...सविस्तर बातमी
16:51 (IST) 17 Jul 2025

जनसुरक्षा कायद्यावरून वडेट्टीवार अडचणीत; विधेयकाला विरोध का केला नाही? काँग्रेसकडून विचारणा

विधानसभेत हे विधेयक मांडल्या गेले, तेव्हा वडेट्टीवार यांनी त्याला विरोध केला नाही. त्यामुळे त्यांना पक्षाने नोटीस बजावल्याचे सांगण्यात येत आहे. ...सविस्तर बातमी
16:30 (IST) 17 Jul 2025

वाघांनी रिकामी केली वनखात्याची तिजोरी! तब्बल २२० कोटी…

राज्याच्या वनखात्याच्या तिजोरीत ज्या वाघांच्या भरवश्यावर कोट्यावधीचा महसूल गोळा होत आहे, त्याच तिजोरीतून आता खात्याला कोट्यावधी रुपये केवळ नुकसान भरपाईसाठी खर्च करावे लागत आहे. ...सविस्तर बातमी
16:08 (IST) 17 Jul 2025

उड्डाणपुलाखालील नवजीवन; क्रीडा, सौंदर्य आणि हिरवळ!

विशेषतः दिघोरी उड्डाणपुलाखाली बॉस्केटबॉल कोर्ट, स्केटिंग रिंग तयार करण्यात आले असून, नरेंद्रनगर उड्डाणपूला खाली देखील युवकांसाठी असे क्रीडांगण तयार केले जात आहे. ...अधिक वाचा
15:59 (IST) 17 Jul 2025

उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात स्थापन करण्याची मागणी; ॲड. एस. के. जैन यांच्या नेतृत्वाखाली ‘खंडपीठ कृती समिती’ची स्थापना

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्यात स्थापन करण्याच्या मागणीसाठी वकिलांनी आक्रमक भूमिका घेतली असून, दहा दिवसांत निर्णय न झाल्यास १ ऑगस्टपासून न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. ...अधिक वाचा
15:49 (IST) 17 Jul 2025

विदर्भाची व्यक्ती सरन्यायाधीशपदी पोहोचताच कृषी न्यायालयाच्या मागणीला जोर

आजही देशातील सर्वात मोठे रोजगार देणारे क्षेत्र म्हणून शेती व्यवसायाकडे पाहिल्या जाते. मात्र, दुसरीकडे रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेती कसणारा शेतकरी मात्र आज हवालदिल झाला आहे. ...सविस्तर वाचा
15:39 (IST) 17 Jul 2025

जनसुरक्षा कायद्याच्‍या विरोधात काँग्रेसची निदर्शने ‍

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार हे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. ...सविस्तर वाचा
15:15 (IST) 17 Jul 2025

नागपूरकरांना पावसाची पुन्हा धास्ती, अर्ध्या तासात शहर तुंबले

पावसाने उघडीप दिल्याने विदर्भात कमाल तापमानाचा पारा पस्तीशी पार गेला. उकाड्यात देखील वाढ झाली. त्याचवेळी राज्यात अनेक ठिकाणी उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. ...सविस्तर वाचा

Today’s Pune Mumbai Nagpur News Live Updates in Marathi

मुंबई पुणे नागपूर न्यूज  १७ जुलै २०२५