Mumbai Breaking News Updates: पुण्यातील वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अद्यापही राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे याला अटक झालेले नाही. पोलिसांची सहा पथक दोघांचा शोध घेत आहेत. दरम्यान, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळवून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून गेल्या अडीच तासांपासून सुनील चांदिरे नावाच्या व्यक्तीची कसून पोलीस चौकशी सुरू आहे. 

तसेच राज्यात सध्या पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर पूर्व-मध्य अरबी समुद्रात उत्तर कर्नाटक आणि गोव्याच्या किनारी भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. यावेळी काही भागांत १०० ते १५० मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राज्यात मान्सूनपूर्व खबरदारी घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी महापालिकांना आराखडा तयार करण्याचे आदेश दिले आहेत, तेव्हा मुंबई, पुणे आणि नागपूर सह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून मिळेल…

Live Updates

Pune Mumbai Nagpur Breaking News Updates, 22 may 2025

22:23 (IST) 22 May 2025

शीना बोरा हत्याकांड : पीटर मुखर्जीच्या विभक्त पत्नीला साक्षीदारांच्या यादीतून वगळले, विधी मुखर्जीची साक्ष नोंदवण्यात येणार

साक्षीदारांच्या यादीतून वगळण्यात आलेल्या ६५ साक्षीदारांच्या नावांची यादी सीबीआयने गुरूवारी विशेष न्यायालयात सादर केली. ...सविस्तर बातमी
22:13 (IST) 22 May 2025

मुंबई : मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेचे तिकीट वाढणार? दर निर्धारण समिती नेमण्यात येणार, एमएमआरडीएचा केंद्र सरकारला प्रस्ताव

मेट्रो २ अ आणि ७ मार्गिका मागील दोन वर्षांपासून वाहतूक सेवेत दाखल आहेत. या दोन्ही मार्गिकांचे संचलन महामुंबई मेट्रो संचलन मंडळाकडून (एमएमएमओसीएल) केले जाते. ...सविस्तर बातमी
22:04 (IST) 22 May 2025

Mumbai Rain Updates : मुंबई, ठाण्यात उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्ये शुक्रवारी अतिमुसळधार (ऑरेंज अलर्ट) पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ...सविस्तर बातमी
21:52 (IST) 22 May 2025

विमानतळ करार रद्द करण्याविरोधात तुर्कस्थानस्थित कंपनी उच्च न्यायालयात

मुंबई विमानतळावर कार्यरत असलेल्या सेलेबी नास एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडियाने केंद्र सरकारच्या निर्णयाला तीन याचिकाद्वारे आव्हान दिले आहे. ...अधिक वाचा
21:34 (IST) 22 May 2025

अमृत भारत स्थानकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण, मुंबई उपनगरीय मार्गावरील पाच स्थानके

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, देशातील १,३०० पेक्षा अधिक स्थानकांना आधुनिक बनविण्याचे काम सुरू आहे. ...सविस्तर वाचा
21:24 (IST) 22 May 2025

ठाणे : तीन हात नाका चौकात वीजेच्या धक्क्यामुळे दहा वर्षीय मुलाचा मृत्यू

ठाणे येथील तीन हात नाका चौकात सतत वाहनांची वर्दळ सुरू असते. या चौकातील वाहतूकीचे नियंत्रण करण्यासाठी पालिकेमार्फत सिग्नल यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. ...सविस्तर वाचा
20:27 (IST) 22 May 2025

दार बंद करण्यावरून झालेल्या वादातून इस्त्रीचे चटके, कायद्याच्या विद्यार्थिनीला अटकपूर्व जामीन मंजूर

खोलीचा दरवाजा उघडा ठेवल्यावरून झालेल्या भांडणात सोबत राहणाऱ्या मुलीला इस्त्रीचे चटके दिल्याचा आरोप असलेल्या कायद्याच्या विद्यार्थिनीला उच्च न्यायालयाने नुकताच अटकपूर्व जामीन मंजूर केला. ...सविस्तर वाचा
20:26 (IST) 22 May 2025

साताऱ्यात मुसळधार पावसाने रस्ते तुंबले, घरांचे नुकसान; जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

शहरातील सखल भागात पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...वाचा सविस्तर
20:21 (IST) 22 May 2025

नक्षल चळवळीचे नेतृत्व कुणाकडे? बसवराजू ठार झाल्याने हादरा, दोन वरिष्ठ नेत्यांची नावे…

सद्यस्थितीत ‘पॉलिटब्युरो’ सदस्य भूपती आणि देवजी या दोघांची नावे चर्चेत आहेत. ...अधिक वाचा
20:18 (IST) 22 May 2025

महाराष्ट्राची बदललेली भाषा आणि वाणी क्लेशदायक, माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी

ज्येष्ठ निवृत्त नाट्य व्यवस्थापक, रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेले 'अध्यक्ष नसलेले 'माझे' असेही एक पत्रकार संमेलन' दादर माटुंगा कल्चरल सेंटर येथे भरवण्यात आले होते. ...सविस्तर बातमी
20:17 (IST) 22 May 2025

जिंदाल पाॅलीफिल्म्स ’ एक किलोमीटर परिसर रिक्त; मुंबई, ठाणे, पिंपरी चिंचवडहूनही अग्निशमन बंब- एनडीआरएफचे पथकही दाखल

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म्स कारखान्यात लागलेली आग दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सायंकाळपर्यंत धुमसत होती. ...सविस्तर बातमी
20:08 (IST) 22 May 2025

सोलापुरात १३ महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीचा फटका

सोलापूर शहरात एकाच दिवशी तब्बल ११० मिलीमीटर इतका प्रचंड पाऊस पडला आहे. ...सविस्तर बातमी
20:06 (IST) 22 May 2025

‘कांजूरमार्ग - बदलापूर मेट्रो १४’ मार्गिकेसाठी लवकरच स्वारस्य निविदा

कांजूरमार्ग - बदलापूर ही मार्गिका ३९ किमी लांबीची असून यात १५ मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. ...वाचा सविस्तर
19:59 (IST) 22 May 2025

आरेच्या जंगलात शाही ससाण्याचे दर्शन

शाही ससाणा हा जगातील सर्वात वेगवान पक्षी मानला जातो. त्याचे मुळ खाद्य लहान पक्षी असते. ...वाचा सविस्तर
19:32 (IST) 22 May 2025

ताडदेव-तुळशीवाडीतील मासळी बाजाराविरोधात स्थानिक उच्च न्यायालयात, महापालिकेला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

ताडदेवस्थित तुळशीवाडी येथील मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीतील मासळी बाजाराविरोधात स्थानिक रहिवाशांनी नुकतीच उच्च न्यायालयात धाव घेतली. ...सविस्तर बातमी
19:22 (IST) 22 May 2025

मुंबई : म्हाडाची शिरढोण, खोणीमधील घरे स्वस्त; २०२४ मधील प्रथम प्राधान्य सोडतीतील विजेत्यांना दिलासा

म्हाडाचे कोकण मंडळ मुंबई महानगर प्रदेशात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (शहरी) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठ्या संख्येने घरे बांधत आहे. ...सविस्तर बातमी
19:05 (IST) 22 May 2025

झुडपी जंगलाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय, मुख्यमंत्री म्हणाले…

नागपूर विमानतळावर पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांनी बोलताना दिली. ...सविस्तर वाचा
18:55 (IST) 22 May 2025

मुंबई : पांजरापूर उदंचन केंद्रातील कामामुळे शहर, पूर्व उपनगरांमध्ये बुधवारी १५ टक्के पाणीकपात

नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. ...वाचा सविस्तर
18:39 (IST) 22 May 2025

मुंबई : गांजाची तस्करी करणाऱ्या तरुणाला अटक

गेल्या काही दिवसांपासून अमली पदार्थांची तस्करीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात गस्त घालत आहेत. ...वाचा सविस्तर
18:26 (IST) 22 May 2025

नीट पीजी परीक्षेचे कच्चे गुण, उत्तरतालिका आणि सामान्यीकरण सूत्र प्रकाशित करा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

वैद्यकीय पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून नीट-पीजी परीक्षा घेण्यात येते. ...सविस्तर बातमी
18:23 (IST) 22 May 2025

ऊर्जामंत्र्यांच्या शहरात अनेक भाग अंधारात…. वादळी पावसामुळे वीज खांबावर….

या आपत्कालीन परिस्थितीत महावितरणने तातडीने युद्धपातळीवर दुरूस्तीचे काम हाती घेतले. सुरुवातीला ११ केव्ही गावंडे लेआउट वाहिनीचा वीजपुरवठा सुरू केला गेला. ...सविस्तर बातमी
18:17 (IST) 22 May 2025

दरड कोसळण्याची, भूस्खलनाची शक्यता; डोंगरावरील रहिवाशांनी स्थलांतर करावे, मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

खबरदारी म्हणून संबंधित भागातील स्थानिक रहिवाशांनी स्वतःहून सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
18:15 (IST) 22 May 2025

रस्ते झाले मोकळे… पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मेट्रो मार्गिकांवरील रस्ता रोधक हटवले

मेट्रोच्या कामामुळे पावसाळ्यात प्रवाशांची, नागरिकांची गैरसोय होणार नाही याची योग्य ती खबरदारी घेण्यात आल्याचे सांगत एमएमआरडीएने मोठ्या संख्येने मेट्रो मार्गिकांच्या कामासाठी रस्त्यांवर उभारलेले रस्ता रोधक (बॅरिगेटस) हटविले आहेत. ...अधिक वाचा
18:10 (IST) 22 May 2025

श्रीनिवास यांच्या दालनात वर्षा गायकवाड यांचा ठिय्या, सेक्टर-५ मधील तयार घरांचा ताबा दिला जात नसल्याने आंदोलन

धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे (डीआरपी) मुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही.आर. श्रीनिवास यांच्या वांद्रे येथील म्हाडा भवनातील दालनात गुरुवारी खासदार वर्षा गायकवाड यांनी ठिय्या दिला. ...सविस्तर बातमी
18:10 (IST) 22 May 2025

बुलढाणाच्या पोलीस अधीक्षकांची आठ महिन्यातच उचलबांगडी…आमदार संजय गायकवाडांच्या लक्षवेधीनंतर….

१३ ऑगस्ट २०२४ रोजी विश्व पानसरे यांची बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र अवघ्या ८ महिन्यांच्या कार्यकाळानंतर त्यांची बदली करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
17:57 (IST) 22 May 2025

चांदाफोर्टची ऐतिहासिक स्थापत्यशैली, गोंड संस्कृतीचे दर्शन…नवीन रेल्वे स्थानकावर आता…

या लोकार्पण कार्यक्रमात देशातील १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील १०३ स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा फोर्ट रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. ...सविस्तर बातमी
17:56 (IST) 22 May 2025

"यंदा घोडबंदर पाण्याखाली जाणार", उबाठाचे माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केली भीती

यंदा घोडबंदर पाण्याखाली जाणार असल्याची भीती उबाठाचे माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केली आहे. ...सविस्तर वाचा
17:38 (IST) 22 May 2025

ठाणे शहरात आढळले तीन करोना रुग्ण, पालिकेचा आरोग्य विभाग झाला सतर्क

रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात पुरेशा खाटा उपलब्ध होत नव्हत्या. करोनामुळे अनेक रुग्णांचा मृत्यु झाला होता. ...सविस्तर बातमी
17:24 (IST) 22 May 2025

शिधावाटप दुकानांवर कारवाई नको म्हणून घेतली लाच, शिधावाटप निरिक्षकाला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक

दोन हजार रुपये प्रमाणे चार दुकानांचे सहा महिन्यांचा हप्ता म्हणून ४८ हजार रुपये देण्याची मागणी सागरने केली होती. ...अधिक वाचा
17:20 (IST) 22 May 2025

राज्य मंडळाकडून दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; यंदा परीक्षा लवकर

बारावीची लेखी परीक्षा २४ जून ते १६ जुलै या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा २४ जून ते ८ जुलै या कालावधीत घेतली जाणार आहे. ...अधिक वाचा

nagpur mumbai pune latest marathi news today in marathi

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे