गोंदिया : मुंबईतील इंदूमिलची जागा डा. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्यास्मारकासाठी मिळवून घेण्याचे एक चांगले काम राजकुमार बडोले यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात झाले असून लंडन येथे डा.बाबासाहेब ज्या ठिकाणी राहिले ते घर विकत घेण्याचे स्वप्नपुर्ण करण्यासारखे चांगले काम त्यांनी केले आहे. भाजपचा कर्मठ कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. बडोलेंना राष्ट्रवादीत पाठवण्याचा निर्णय बडोलेंचा नव्हता तर देवेंद्र फडणवीस व माझा होता, त्यामुळे भाजप कार्यकर्त्यानो आपल्या मनातील गैरसमज दूर करावा,असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.

अर्जुनी मोरगावविधानसभा मतदारसंघाचे महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार राजकुमार बडोले यांच्या प्रचारसभेत सडक अर्जुनी येथे बोलत होते. गडकरी म्हणाले, ८० टक्के खनिज संपती ही विदर्भातील जिल्ह्यात आहे. या भागात रस्ते व सिंचनाचे प्रकल्पांचे काम करतांना अनेक अडचणी येतात, त्या दूर करुन कामे केली जात आहेत.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
Dhananjay Munde statement that resign if ordered by the party leader
पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास पदत्याग! धनंजय मुंडे यांची स्पष्टोक्ती
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…

हेही वाचा…काँग्रेसने १९९२ च्या दंगल प्रकरणात कारवाई केली नाही – प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

शेतीच्या व्यवसायासोबत मत्स्य व दुग्धव्यवसाय शेतकरी वर्गाला पोषक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपल्या भागात गोड्यापाण्यातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्याचे काम राज्यसरकार करणार आहे. जगाच्या कानाकोपर्यात येथील मासे, झिंगे पोचविण्याचे काम होणार आहे. या जिल्ह्यात दुध व्यवसाय असून दुधाला चांगले भाव देण्याचा प्रयत्न मदर डेयरीच्या माध्यमातून केला आहे. सध्या ५ लाख लिटर दूध घेत असून पुढच्या काही वर्षात ५० लाख लिटर दूध खरेदीची योजना आहे. दुग्धक्रांती नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून होणार असून दहा पटीने या व्यवसायात वाढ होणार आहे.

हेही वाचा…सोन्याचे दर निच्चांकीवर असतांनाच पुन्हा बदल… हे आहेत आजचे दर…

सभेला मध्यप्रदेशचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल, भाजप जिल्हाध्यक्ष ऍड. येशुलाल उपराडे, माजी आमदार राजेंद्र जैन, खोमेश रहागंडाले, हेमंत पटले, जि.प. अध्यक्ष पकंज रहागंडाले, रचना गहाणे, लायकराम भेंडारकर, लक्ष्मण भगत, अशोक लंजे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

Story img Loader