लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: वेगवेगळ्या कारणांमुळे गच्छंती झालेले नाशिक विभागाचे तत्कालीन उपसंचालक तसेच जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांची जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बच्छाव हे नाशिक येथे प्रशासनाधिकारी, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांच्या कामाची दखल घेत शिक्षण विभागाच्या वतीने त्यांची नाशिक विभाग उपसंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यावेळी धुळे, जळगावमधील शाळांचे शालार्थ सांकेतांक, अनियमित मान्यता याप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले होते. जळगाव येथील आमदारांनी या विषयासंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित केले होते.

हेही वाचा… समृध्दी महामार्गाच्या कामात घाई नाही – दादा भुसे यांचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर त्यांची या पदावरून गच्छंती करण्यात आली. याबाबत झालेले चौकशी सत्र पूर्ण झाल्यानंतर त्यांची अहमदनगर येथे बदली झाली. जळगाव येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. आता जळगावनंतर नाशिक जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.