पुणे शहरात दिवसभरात ४४ तर पिंपरी-चिंचवडमध्ये २३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तर पुण्यात १२०४ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये ८८६ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. एकूणच पुणे जिल्ह्यात करोनाचा संसर्ग अद्याप कमी होताना दिसत नाही.

पुण्यात दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधित रुग्णांमुळे एकूण ८५ हजार ७०० एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर दिवसभरात ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर २ हजार ०७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ११२३ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ६८ हजार ९०० रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी दिवसभरात ८८६ जण करोनाबाधित रुग्ण आढळले असून २३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १ हजार १५८ जण करोनामुक्त झाले असून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४३ हजार ३७४ वर पोहचली असून यांपैकी २९ हजार ७३३ जण बरे झाले आहेत. महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सक्रिय रुग्णांची संख्या ६ हजार १२३ एवढी आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.