scorecardresearch

उपवासाला काही वेगळं ट्राय करायचंय ? मग वरई आणि साबुदाण्यापासून बनवा हलका-फुलका डोसा

खिचडीचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी उपवासाला खास रेसिपी घेऊन आलो आहोत

fasting dosa
उपवासाचा हलका-फुलका डोसा( Photo – Twitter)

शरीराला आराम देण्यासाठी उपवासांचे नियोजन असते असे म्हटले जाते. उपवासाचे शरीराला फायदे होतात पण त्याबरोबरच कडक उपवास किंवा उपवासाच्या पदार्थांचे जास्त सेवन झाल्यास त्याचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे मनोभावे उपवास करणाऱ्यांनी हे उपवास करताना आपल्या आरोग्याला कोणता त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. दरम्यान उपवास असला की आपला ठरलेला एकच पदार्थ असतो ते म्हणजे साबुदाण्याची खिचडी, याच खिचडीचा तुम्हाला कंटाळा आला असेल तर आम्ही तुमच्यासाठी उपवासाला खास रेसिपी घेऊन आलो आहोत. या उपवासाला आमच्या लोकसत्ता पूर्णब्रम्ह अंकातील वरई आणि साबुदाण्यापासून बनवलेला हलका-फुलका डोसा रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर जाणून घेऊयात कसा बनवायचा उपवासाचा डोसा.

वरई आणि साबुदाण्याचे डोसे साहित्य –

  • दोन वाटी वरई
  • अर्धी वाटी साबूदाणा
  • हिरव्या मिरच्या
  • शेंगदाणे,
  • मीठ, जिरे

वरई आणि साबुदाण्याचे डोसे कृती –

प्रथम वरई आणि साबूदाणा वेगवेगळे भिजत ठेवावे. भिजवल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. हिरव्या मिरच्या, मीठ, जिरे व शेंगदाणे एकत्र करुन बारीक वाटावे. सर्व एकत्र करुन त्याचे मिश्रण तयार करा. त्यानंतर तवा गरम करुन मिश्रण डोश्यासारखं पसरवा आणि कडेने तूप सोडावे. दोन्ही बाजूंनी डोसा खुसखुशीत भाजून घ्या.

हेही वाचा – आंबट-गोड, तिखट चवीची चटपटीत कैरीची चटणी; वाढवेल जेवणाची लज्जत, ही घ्या सोपी चविष्ट रेसिपी

अशा प्रकारे उपवासाला खाण्यासाठी डोसा तयार आहे. हा डोसा तुम्ही उपवासाच्या बटाटयाच्या भाजीबरोबर खाऊ शकता.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 13:34 IST

संबंधित बातम्या