लोकसत्ता प्रतिनिधी

अंबरनाथ : बदलापूर, अंबरनाथ या शहरातून मुंबई, ठाणे आणि कल्याणच्या दिशेचा प्रवास जसा दिवसेंदिवस कोंडीचा होत चाललेला आहे. त्याचप्रमाणे आता या दोन शहरांमधला प्रवासही कोंडीयुक्त होत असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांत संतापाचे वातावरण आहे. कल्याण बदलापूर राज्यमार्ग आणि काटई बदलापूर राज्यमार्गावरील विविध चौक कोंडीत अडकत आहेत. रस्तेकाम, चौकांमध्ये उभ्या केल्या जाणाऱ्या गाड्या, दुकाने आणि बेशिस्त वाहनचालकांमुळे कोंडी वाढते आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळही वाढतो असून इंधन आणि श्रमही खर्च होत आहेत.

पिंपरी: कुदळवाडीतील पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकानांवर सलग दुसऱ्यादिवशी कारवाई; ६०७ बांधकामे भुईसपाट
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
boricha marg Encroachment free news
मुंबई : चिंचपोकळी परिसरातील बोरीचा मार्ग अतिक्रमण मुक्त, पालिकेच्या जी दक्षिण विभागाची कारवाई
Hinjewadi it park traffic jam news
पिंपरी : शहरातील एनएच-४८ महामार्ग सेवा रस्त्यांचा होणार विस्तार, आयटी पार्क हिंजवडीतील कोंडी सुटणार…
Despite complaints and protests no action taken on unauthorized slums and parking at Turbhe Sector 19F
अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी ‘तारीख पे तारीख’ तुर्भे येथील भूखंडावरील कारवाईसाठी पालिकेची चालढकल
Kulgaon Badlapur municipal news in marathi
वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होणार नाही; बदलापूर मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन, प्रेस क्लब ऑफ बदलापुरच्या मागणीला यश
rasta roko kudalwadi marathi news
पिंपरी : अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवरील कारवाईला विरोध; कुदळवाडीतील व्यावसायिकांकडून रस्ता बंद
Solapur Rural Police arrested gang who stole tractor of sugarcane and other goods
वाटमारी करणारी टोळी जेरबंद; दहा ट्रॅक्टरसह तीन ट्रेलर हस्तगत

गेल्या काही वर्षात नोकरदार वर्गासह सर्वसामान्यांच्या पसंतीस उतरलेली अंबरनाथ आणि बदलापूर ही शहरे झपाट्याने विकसीत होत आहेत. परिणामी येथे वाहन आणि प्रवासी संख्याही वाढते आहे. त्यामुळे दोन्ही शहरांना जोडणाऱ्या महत्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडीही वाढू लागली आहे. वाहतूक नियमन करण्यासाठी काही महिन्यांपूर्वी अंबरनाथ शहराच्या विविध भागात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मात्र त्यामुळे कोंडीचे प्रमाण अधिक झाले. सिग्नल शिस्त पाळण्यात अनेकदा वाहनचालक कसूर करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढते. त्यातच गेल्या काही दिवसात कल्याण बदलापूर राज्यमार्ग आणि काटई बदलापूर राज्यमार्ग अशा दोन्ही मार्गांवरच्या महत्वाच्या चौकांमध्ये कोंडी वाढू लागली आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दुकाने, ढाबे, टपऱ्याही वाढू लागल्या आहेत. त्यामुळे या चौकातून वाहने काढताना अनेकदा सिग्नलची वेळ निघून जाते. त्यामुळे मार्गिकेवर मागे वाहनांची संख्या वाढते.

आणखी वाचा-ठाण्यात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी रस्त्यांची खोदाई?

परिणामी वाहनचालक बेशिस्तपणे दुसऱ्या मार्गिकेतून उलटा प्रवास करण्याचा प्रवास करतात. त्यामुळे त्या मार्गिकेवरही कोंडी होते. कल्याण बदलापूर राज्यमार्गावर विमको नाका, लादी नाका आणि थेट फॉरेस्ट नाक्यापर्यंत अनेक हातगाड्या, भाजीविक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने लागतात. सायंकाळनंतर ही गर्दी वाढते. त्यामुळे अनेक ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करून खरेदी करतात. परिणामी या रस्त्यावरही कोंडी होते. या फेरिवाले आणि हातगाड्यांवर पालिका प्रशासन कारवाई करत नाही. त्यामुळे सिग्नलच्या कोंडीतून बाहेर आल्यानंतर पुन्हा या कोंडीत अडकावे लागते आहे. गेल्या काही महिन्यात बदलापूर ते अंबरनाथ या अवघ्या सात किलोमीटरच्या अंतराला कापण्यासाठी अर्ध्या तासापेक्षा अधिकचा काळ लागतो आहे. त्याचा फटका रिक्षाचालक, नोकरदार आणि प्रवाशांना बसतो आहे.

वेशीवरच्या डीमार्टजवळ मोठी कोंडी

बदलापूर शहराच्या वेशीवर असलेल्या डी मार्ट या बाजाराबाहेर रस्त्याचे काम काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आले. वाहतूक नियोजनाअभावी येथे वाहनचालकांची मोठी कोंडी होते आहे. रविवारी याच भागात कोंडीतून बाहेर पडण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत होता. त्यामुळे वाहनचालक संताप व्यक्त करत होते.

आणखी वाचा-खालापूरच्या उच्चशिक्षित तरुणाला एक्सप्रेसमध्ये गांजाची तस्करी करताना अटक, कल्याण रेल्वे सुरक्षा बळाची कामगिरी

भविष्यात कोंडी वाढणार

कल्याण बदलापूर राज्यमार्गावर आताच मोठी कोंडी होते आहे. सध्या येथे अनेक नवे वाणिज्य संकुले, गृहनिर्माण संकुले उभी राहत आहेत. त्यामुळे येथे वाहनांची संख्याही वाढणार आहे. रस्त्याला आता फेरिवाले आणि बेकायदा पार्कींगचा विळखा आहे. रस्त्याच्या मधोमध असलेले खांबही जसैथे आहेत. त्यामुळे भविष्यात कोंडी वाढण्याची भीती आहे.

रस्ते अडवणाऱ्यांवर नियमीतपणे कारवाई सुरू हे. वाहने हटवण्यासाठी आवश्यक क्रेन वाहन सध्या उपलब्ध नाही. उचललेली वाहने ठेवण्यासाठी जागाही उपलब्ध नाही. त्यामुळे कारवाईवर मर्यादा येत आहेत. -विजय पुराणीक, पोलिस निरिक्षक, वाहतूक विभाग.

Story img Loader