Influencer Jaw Struck Video : जांभई येणं ही फार सामान्य गोष्ट आहे. दिवसभरात आपण अनेकदा जांभई देतो. खूप थकल्यावर किंवा झोप आल्यावर तर हमखास जांभई येते. पण तुम्ही कधी ऐकलं आहे का की, जांभई दिल्यानंतर एखाद्याचं तोंड तसंच उघडं राहिलयं? हे थोडं विचित्र वाटेल; पण एका इन्फ्लुएन्सर तरुणीबरोबर प्रत्यक्षात असा प्रकार घडला आहे. त्यात जांभई दिल्यानंतर तिच्या तोंडाची अवस्था अशी काही झाली की, ते पाहून डॉक्टरदेखील शॉक झाले. या तरुणीचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

२१ वर्षीय अमेरिकन सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जेना सिनात्राबरोबर हा प्रकार घडला. तिनं इतक्या जोरात जांभई दिली की, तिचा जबड्याचं हाड लॉक झालं, ज्यामुळे तिचं तोंड तसंच उघडं राहिलं.

जेनानं या घटनेचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म शेअर केला आहे, ज्यात तिनं तिच्या वेदनादायक अनुभवाबद्दल सांगितलं आहे. ती म्हणाली की, तिला विश्वास बसत नाही की, तिच्यासोबत असं काही घडलं आहे.

जेना पुढे म्हणाली की, ती जांभई देत होती. त्यावेळी तिनं इतक्या जोरात जांभई दिली की, ज्यामुळे तिचं तोंड उघडं राहिलं. अनेक प्रयत्न करूनही तिला तोंड बंद करता येत नव्हतं, ज्यामुळे ती घाबरली आणि तिनं थेट रुग्णालय गाठलं. यावेळी डॉक्टरांनी तिच्या तोंडाचा एक्स-रे काढला आणि त्यानंतर उपचार करून तिचं तोंड पूर्ववत केलं.

तिच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी सांगितलं की, जोरात जांभई दिल्यानं तिच्या जबड्याचं हाड निखळलं आणि तिथेच लॉक झालं. प्लास्टिक सर्जन डॉ. अँथनी यून म्हणाले की, हे एक अतिशय दुर्मीळ प्रकरण आहे, जेव्हा कोणी खूप जोरात जांभई देतं तेव्हा असे घडतं. दरम्यान, डॉक्टरांनी औषधं आणि हातांद्वारे तिचा जबडा व्यवस्थित केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जेनानं याबाबत इन्स्टाग्रामवर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचं तोंड बँडेजद्वारे गुंडाळल्याचं दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिचं तोंड आता पहिल्यासारखं पूर्ण बंद करू शकली आणि ती हसत व बोलतही होती, असं दिसतंय.