सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांचे बुधवार १६ फेब्रुवारी निधन झाले. वयाच्या ६९व्या वर्षी त्यांनी मुंबईमधील क्रिटीकेअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच महिन्यांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. नुकतंच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचेदेखील वयाच्या ९२व्या वर्षी निधन झाले. बप्पी लहरी यांच्या मृत्यूनंतर लगेचच, प्रसिद्ध व्यक्ती आणि राजकीय नेते तसेच अनेक ट्विटर वापरकर्त्यांनी ‘डिस्को किंग’ बप्पी लहरी यांच्याप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई पोलिसांनी देखील बप्पी लहरी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यासाठी त्यांनी ट्विटरची मदत घेतली आहे. त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये बप्पी लहरी यांच्या प्रसिद्ध गाणे ‘यार बिना चैन कहां रे’ चे बोल लिहले आहेत. सोबतच त्यांनी #KingOfHearts #MusicOfGold या हॅशटॅगचाही वापर केला आहे. या पोस्टमधील लक्षणीय बाब म्हणजे ‘यार बिना चैन कहां रे’ या ओळीमध्ये येणाऱ्या ‘चैन’ या शब्दासाठी त्यांनी चैनचे चित्र वापरले आहे. यातून बप्पी लहरी यांचे सोन्याच्या दागिन्यांविषयी असलेले प्रेम दर्शवण्यात आले आहे. या पोस्टमध्ये एक कॅप्शनही देण्यात आले आहे. ‘बप्पी दा, प्यार कभी कम नाही होगा’ असे या कॅप्शनमध्ये म्हटले आहे. मुंबई पोलीस आपल्या अनोख्या अंदाजातील ट्रेंडिंग पोस्टसाठी ओळखले जातात. जेव्हाही काही ट्रेंड सुरु असतो तेव्हा मुंबई पोलीस आवर्जून पोस्ट करतात.

Obstructive Sleep Apnea या आजारामुळे झाले बप्पी लहरी यांचे निधन; तुम्हालाही दिसत असतील ‘ही’ लक्षणे तर सावध व्हा

Bappi Lahiri : सोनं लकी असल्याचं सांगायचे बप्पीदा; पण नक्की कोणत्या राशीच्या लोकांना होतो सोनं परिधान करण्याचा फायदा?

२७ नोव्हेंबर १९५२ रोजी आलोकेश लाहिरी या नावाने जन्मलेल्या बप्पी लहरी यांना त्यांचे चाहते प्रेमाने ‘बप्पी दा’ म्हणतात. बप्पी लहरी यांनी ‘दाडू’ या बंगाली चित्रपटासाठी सर्वप्रथम संगीत दिले, तर ‘निन्हा शिकारी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

८०च्या दशकात त्यांनी भारतीय सिनेमामध्ये डिस्को संगीताला लोकप्रिय केलं आणि डिस्को डान्सरसाठी त्यांच्या चार्टबस्टर संगीत आणि ‘जिमी, जिमी, आजा, आजा…’ या गाण्याने जागतिक कीर्ती मिळवली. त्यांनी हिंदी आणि बंगाली चित्रपट, जसे की ‘चलते चलते’, ‘डिस्को डान्सर’ , ‘अमर संगीत’ , ‘आशा ओ भालोबाशा’ , ‘अमर तुमी’ , ‘अमर प्रेम’ , ‘मंदिरा’ , ‘बदनाम’ , ‘रक्तलेखा’ , ‘प्रिया’ इत्यादींनी बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police pays tribute to bappi lahiri in a unique way pvp
First published on: 16-02-2022 at 18:23 IST