Police Fines Biker For Bike Stickers : वाहन चालवण्याबाबत आपल्या देशात अनेक नियम आणि कायदे आहेत. परंतु, बहुतांश चालक हे वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत वाहन चालवताना दिसतात. विशेषत: बाईकचालक हेल्मेट घालून आणि सर्व कागदपत्रे स्वत:जवळ बाळगत रस्त्यावर उतरतात; यावर त्यांना वाटते की, ते सर्व नियमांचे पालन करत आहेत. पण, वाहतूक नियमानुसार तुम्हाला बाईकला विविध फॅन्सी रंग, स्टिकर्स, सायलेंसर इत्यादी गोष्टी लावता येत नाहीत. सध्या सोशल मीडियावर अशाच एका बाईकचालकाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक वाहतूक पोलिस अधिकारी बाईकचालकाला स्टिकरवरून भररस्त्यात चांगलेच फटकारताना दिसत आहे. तसेच बाईकवर स्टिकर्स चिटकवल्याने पोलिस कर्मचारी त्याला दंड भरण्यास सांगत आहे.

बाईकचे साइड मिरर खालच्या दिशेने केल्यामुळे वाहतूक पोलिसांनी तरुणाला थांबवले, यावेळी बाईकवर चिटकवलेले स्टिकर्स पाहून त्याला ते ओरडताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, वाहतूक पोलिसांनी तरुणाला सर्वात आधी विचारले की, साईड मिरर खाली करून ठेवलेस, तुला आजूबाजूने जाणारे वाहन कसे दिसणार? चल चलान काढ. यावर तो तरुण, सर मिरर तर आहेत ना, मी लोकल आहे, इथेच जात होतो म्हणून मिरर असेच ठेवले असे म्हणतो.

VIDEO : मॅक्सवेलने हात आपटला, तर विराट फोन घेऊन…; RCB च्या ड्रेसिंग रुममध्ये पराभवानंतर घडलं तरी काय?

यानंतर पोलिस कर्मचाऱ्याची नजर बाईकवरील लावलेल्या स्टिकरवर पडते. याबाबत पोलिस कर्मचारी ‘हे सर्व काय आहे’ असा प्रश्न विचारतो. ज्यावर चालक सांगतो की, “हे सामान्य स्टिकर आहे.” चालकाच्या उत्तरावर पोलिस कर्मचारी म्हणतो की, ‘तुम्ही बाईकवर कोणत्याही गोष्टी कराल का, बाईकवरून खाली उतर आणि चलान काढ. बाईक म्हणजे नवरी आहे का सजवायला? ती बाईक आहे, ज्यावर तुम्ही असे कोणतेही स्टिकर्स लावू शकत नाही, आता खाली उतर.’ अशाप्रकारे पोलिस कर्मचारी बाईकचालकाला नियमाचा दाखला देत चलान भरण्यास सांगतो. दरम्यान, दोघांमधील हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर अनेक सोशल मीडिया युजर्स कमेंट करत आहेत.

यावर एका युजरने लिहिले की, ‘जबरदस्तीने चलान घेण्याची निन्जा टेक्निक.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘योग्य तर केले, मिरर खाली होते. तिसऱ्या एका युजरने लिहिले की, ‘पोलिस अधिकाऱ्याशी कधीही वाद घालू नका आणि तुमच्या सुरक्षिततेसाठी आणि रस्त्यावर इतरांच्या हितासाठी नियमांचे पालन करा.’ यावर काही सोशल मीडिया युजर्स बाईकचालकाचे बरोबर असल्याचं सांगत आहेत, तर काही जण पोलिसाचं बरोबर असल्याचं सांगत आहेत.