Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही गाडी चालवताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालवण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत असेल तर अपघात हे होतातच. अशावेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही असंच काहीसं घडलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून आता तुम्हीच सांगा यामध्ये चूक नेमकी कुणाची आहे.

सोमवारी हरियाणातील जिंद येथे एक दुःखद घटना घडली. सकाळी १०:३० वाजता गोहाना रोडवर रोडवेज बसने धडक दिल्याने एक तरुण दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. अपघातानंतर, तो तरुण रस्त्यावर बेशुद्ध पडला. रोडवेज बस चालक सतनारायण स्वतः खाली उतरला, जखमींना उचलले आणि ऑटोमधून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सतनारायण म्हणाले की, चालक जुन्या बस स्टँडच्या वर्कशॉपमधून बस धुवून परतत होता. अचानक तो तरुण सरकारी महिला महाविद्यालयासमोर त्याची दुचाकी घेऊन क्रॉस करू लागला. चालकाने बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला पण दुचाकीचा वेग जास्त असल्याने टक्कर झाली आणि तो तरुण जखमी झाला. सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरणाचा तपास सुरू केला.

संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेजमध्ये रजत दुचाकीवरून रस्ता ओलांडताना दिसत आहे. टक्कर झाल्यानंतर तो रस्त्यावर पडताना दिसत आहे आणि त्याने हेल्मेट घातले नव्हते. अपघातानंतर काही सेकंदातच घटनास्थळी गर्दी जमू लागली.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात, ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @Deadlykaleshनावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.