scorecardresearch

Video: हातावर उभं राहून गरबा करायला गेली अन.. काळजाचा ठोका चुकवणारा ‘हा’ क्षण पाहून व्हाल हैराण

Viral Video लोकांपर्यंत पोहचावा म्हणून अनेकजण हटके मार्ग निवडतात असाच मार्ग या डान्सर तरुणींनी अवलंबला आहे.

Video: हातावर उभं राहून गरबा करायला गेली अन.. काळजाचा ठोका चुकवणारा ‘हा’ क्षण पाहून व्हाल हैराण
Video: हातावर उभं राहून गरबा करायला गेली अन (फोटो: इंस्टाग्राम)

Viral Video: कोणताही सण म्हंटला की डान्स हा हवाच आणि त्यातही नवरात्र म्हणजे देशभरात गरबा- दांडियाची धूम पाहायला मिळते. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होत असतात मात्र आज चर्चेत असणारा व्हिडीओ हा काळजाचं पाणी पाणी करणारा आहे. आपला व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा म्हणून अनेकजण हटके मार्ग निवडतात असाच एक मार्ग या व्हायरल व्हिडीओमधील डान्सर तरुणींनी अवलंबला आहे. चुकूनही हा प्रयत्न तुम्ही घरी करून पाहायला जाऊ नका. पण असं नेमकं या व्हिडिओमध्ये घडतं काय चला तर जाणून घेऊयात..

शालू किरर व विश्वजीत चौधरी या अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यापैकी शालू या इंडियाज गॉट टॅलेंटच्या शो मधील उपविजेत्या व नृत्यांगना आहेत तर विश्वजीत हे भोजपुरी गाण्याचे संगीतकार आहेत. विश्वजीत यासिनच्या नव्या मटक मटक गाण्यावर या तरुणी रील बनवत आहेत.

आपण व्हिडीओमध्ये पाहू शकता की पारंपारिक परिधानात दोन तरुणी नाचताना दिसत आहेत. नवरात्रीचा माहोल असल्याने पद्धतशीर घागरा चोळी घालून त्या नाचत आहेत. यात लाल रंगाचा घागरा घालून या तरुणी दोन मुलांच्या हातावर उभ्या राहतात मग हे दोन तरुण त्यांना हाताच्या तळव्यावर उचलतात, इथेच खरंतर काळजाची धडधड वाढू लागते इतक्यात या तरुणी उडी मारतात आणि मग जे घडतं ते तुम्ही स्वतः पाहा..

पहा व्हायरल व्हिडीओ

Video: लग्नात बेभान नाचत होती ‘ही’ महिला; इतक्यात एक चिमुकला आला अन..पाहा थरकाप उडवणारा क्षण

दरम्यान, अशा प्रकारचे व्हिडीओ हे अत्यंत काळजीपूर्वक व सरावानंतर केले जातात त्यामुळे आपण किंवा आपली मुलं हे प्रयोग करून बघायला जाणार नाहीत याची काळजी घ्या. व्हिडीओ कसा वाटला नक्की कळवा

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या