28 January 2020

News Flash

संगीतप्रसाराची साधना!

निनाद मुळावकर, यशस्वी साठे-सरपोतदार यांच्यासारख्या कलावंतांची प्रतिभा ओळखून त्यांना ‘स्वरांकित’ने संधी दिली.

(संग्रहित छायाचित्र)

संगीतावरील प्रेमापोटी एकत्र येऊन स्वरानंदाची अनुभूती इतरांनाही देण्यासाठी नालासोपारात आकाराला आलेली ‘स्वरांकित’ संस्था आता नावारूपाला आली आहे. संस्थेच्या उभारणीसाठी संस्थाचालकांनी विविध प्रयोगशील उपक्रम राबवताना प्रत्येक वेळी पदरमोड करून संस्थेला आर्थिक आधारही दिला आहे. संगीताचा प्रसार हीदेखील संगीत साधना असू शकते या धारणेने आपली सेवा रुजू करणाऱ्या नालासोपाऱ्यातील या ‘स्वरांकितां’ना आर्थिक स्थैर्य आणि संगीतप्रेमींची साथ हवी आहे..

चीन काळी नालासोपाऱ्याचा लौकिक मोठा. सातवाहन राजवटीचे हे महत्त्वाचे बंदर होते. कालौघात नालासोपाऱ्याचा हा लौकिक धुळीस मिळाला आणि हे शहर गुन्हेगारीसाठी ओळखले जाऊ लागले. गुन्हेगारीने या शहराची प्रतिमा बिघडवली. अशा स्थितीत आपला व्यवसाय सांभाळून स्वरांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या काही संगीतप्रेमींनी एकत्र येऊन ‘स्वरांकित’ नावाची सांस्कृतिक चळवळ उभी केली आणि संगीतशारदेच्या प्रांगणात नालासोपाऱ्याचे नाव उज्ज्वल केले. नालासोपाऱ्यातील या सांस्कृतिक चळवळीतून पहिल्यांदा संधी मिळालेले अनेक कलाकार आज भारतात आणि भारताबाहेरही आपले संगीतकौशल्य सादर करत आहेत.

संगीत श्रवणानंद वसई, नालासोपाऱ्यातील रसिकांना मिळावा आणि त्याद्वारे भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार व्हावा, उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या हेतूने नालासोपाऱ्यातील आठ संगीतप्रेमींनी ६ जानेवारी १९९५ रोजी ‘स्वरांकित चॅरिटेबल ट्रस्ट’ ही संस्था स्थापन केली. सुरुवातीला नालासोपारा पश्चिमेकडे स्थानकालगत मधुसूदन आपटे यांच्या घरामध्ये सुरू झालेली ही संस्था आता नव्या जागेत कार्यरत आहे. कमलाकर नेने, डॉ. रोहित दंडवते, डॉ. वर्षां दंडवते, मधुसूदन आपटे, मनीषा आपटे, दत्तात्रय देशमुख, सुरेश पवार, रमेश काणे या संगीतप्रेमींनी सेवाभावी वृत्तीने नालासोपाऱ्याला एक सांस्कृतिक ओळख देण्याच्या ईष्रेने ‘स्वरांकित’च्या उभारणीसाठी परिश्रम घेतले. संस्थेची निर्मिती आणि त्यानंतर तिच्या प्रगतीसाठी आठही जणांनी तन, मनाने काम करतानाच कुवतीनुसार स्वतकडील धनही ओतले.. आजही ओतत आहेत. संस्थानिर्मितीच्या वेळी भेडसावलेल्या आर्थिक अडचणी आणि मनुष्यबळाचा अभाव याचा सामना संस्थेचे निर्माणकत्रे करत आहेत. आज ‘स्वरांकित’ रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत आहे.

शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी वाहून घेतलेल्या ‘स्वरांकित’ने वसईकरांना गायनाच्या आणि वाद्यसंगीताच्या रसास्वादाची अनुभूती दिली. तोडी महोत्सव, मल्हार महोत्सव, कल्याण महोत्सव, रंगभरवी अशा कार्यक्रमांचे आयोजन करून संगीतातील एका वेगळ्या विश्वाचा अनुभव  संगीतप्रेमींना दिला. पंडित उल्हास कशाळकर, पद्माताई तळवळकर, वीणा सहस्रबुद्धे, मंजिरी असनारे, डॉ. राम देशपांडे अशा अनेक गायकांचे कार्यक्रम वसई, नालासोपाऱ्यातील रसिकांसाठी आयोजित केले. पंडित मनोहरपंत चिमोटे, तालयोगी पंडित सुरेश तळवलकर, सुभाष वनगे, अनुराधा पाल, रवींद्र चारी, जितेंद्र गोरे यांच्या वादनाचे कार्यक्रमही ‘स्वरांकित’ने आयोजित केले. सुगम संगीतातील पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, पंडित यशवंत देव, अरुण दाते, उत्तरा केळकर, रवींद्र साठे, पद्मजा फेणाणी, बेला शेंडे, स्वप्निल बांदोडकर यांचेही कार्यक्रम नालासोपाऱ्यात घेतले. याशिवाय पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या बासरीवादनाच्या माध्यमातून ‘स्वरांकित’ने वसईकर संगीतप्रेमींना ‘हरि-प्रसादा’ची अनुभूती दिली.

निनाद मुळावकर, यशस्वी साठे-सरपोतदार यांच्यासारख्या कलावंतांची प्रतिभा ओळखून त्यांना ‘स्वरांकित’ने संधी दिली. गुरू संकल्पनेवर आधारित ‘ऋणानुबंध’, जीवनाच्या सहा अवस्थांवर आधारित ‘माझे जीवनगाणे’, तुलसीदास आणि कबीरांच्या रचनांवर ‘रामकृष्ण जपू’, गोंदवलेकर महाराजांवर आधारित ‘जय जय रामकृष्ण हरी’ असे कार्यक्रमही सादर केले.

‘स्वरांकित’चा आणखी महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणजे युवा संमेलन. हा उपक्रम संगीतक्षेत्रात पदार्पण करू इच्छिणाऱ्या नवोदितांना संधी देणारा आणि त्यांना नावारूपाला आणणारा ठरला आहे. या युवासंमेलनाच्या माध्यमातून ‘स्वरांकित’ने आतापर्यंत २५० नवोदित गुणी कलाकारांना कला सादर करण्याची संधी दिली. त्यापैकी यशस्वी सरपोतदार (गायन), निनाद मुळावकर (बासरीवादक), दीपिका भिडे, गौरी दामले (गायन), आदित्य आपटे (सरोदवादक) आदी संगीतकलेच्या क्षितिजावर तेजाने तळपत आहेत.

कवींची आणि त्यांच्या कवितांची ओळख रसिकांना व्हावी, यासाठी संस्था कवितांवर आधारित अनेक कार्यक्रम घेते. या कवींच्या निवडक कविता रसिकांपर्यंत पोहोचण्यासाठी या कार्यक्रमात सादर होणाऱ्या कवितांची पुस्तिका श्रोत्यांना मोफत दिली जाते. चार ते १२ वष्रे वयोगटातील मुलांवर संगीतसंस्कार व्हावेत, यासाठी ‘स्वरांकित’ दर वर्षी बालगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करते.

विशिष्ट संकल्पनेवर आधारित कार्यक्रम आणि याच संकल्पनेवर स्मरणिका काढणे ही ‘स्वरांकित’ची खासियतच. तोडी महोत्सव, मल्हार महोत्सव, कल्याण महोत्सव, रंगभरवी, तराना महोत्सव अशा विविध कार्यक्रमांच्या वेळी ‘सूर तेच छेडिता’, ‘भारतीय वाद्य परंपरा’, ‘अंतर्यामी सूर गवसला’ अशा किती तरी संकल्पनांवर आधारित वैविध्यपूर्ण स्मरणिका विनामूल्य प्रसिद्ध करून संगीताबरोबरच साहित्यनिर्मितीतही ‘स्वरांकित’ने मोलाची कामगिरी केली आहे.

संस्थेचा ‘राग-कालचक्र महोत्सव’ हा आगळावेगळा कार्यक्रम आहे. शास्त्रीय संगीतात राग विशिष्ट वेळेला गाण्याचा संकेत आहे. त्या विशिष्ट वेळेला राग ऐकायला मिळावेत म्हणून चार महिने प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी व रविवारी सकाळपासून  पहाटेपर्यंतचे राग ऐकवणारा ‘राग-कालचक्र महोत्सव’ भरवला जातो. आतापर्यंत पद्मजा तळवलकर, आशा खाडिलकर, डॉ. राम देशपांडे, पंडित प्रदीप बारोट (सरोदवादक), पंडित उल्हास कशाळकर आदी नामांकितांनी यात सहभाग घेतला आहे. शास्त्रीय संगीताचे आकलन विद्यार्थी आणि रसिकांना व्हावे, यासाठी सुप्रसिद्ध संवादिनीवादक पंडित मनोहर चिमोटे यांची गायन व संवादिनीवादनाबद्दल माहिती देणारी पूर्ण दिवसाची कार्यशाळाही ‘स्वरांकित’ने आयोजित केली होती.

सन २०१५ पासून ‘स्वरांकित’ने ‘कृतज्ञता पुरस्कारां’ची सुरुवात केली. शास्त्रीय संगीतातील ज्यांच्या साथसंगतीमुळे गायन, वादन रंगते ते कलाकार दुर्लक्षित राहतात. तसेच संगीताचा निष्ठेने प्रसार करणाऱ्या संस्थाही उपेक्षित राहतात. त्यासाठी तबला व हार्मोनियमची संगत करणारे कलाकार यांना ‘स्वरांकित’तर्फे सन्मानित केले जाते. संगीत संस्थाचालकांचाही ‘कृतज्ञता पुरस्कार’ देऊन सन्मान केला जातो. २०१६ मध्ये महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने ‘स्वरांकित’च्या कार्याची दखल घेऊन संस्थेला अनुदान दिले. हा एकमेव अपवाद वगळता भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी वाहून घेतलेली ही संस्था दुर्लक्षितच आहे.

संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेचे आठ संस्थापक वार्षकि वर्गणी जमा करून ही संस्था चालवतात. कार्यक्रम असल्यास त्यातील सहभागी कलाकारांचे मानधन, कार्यक्रमाची तयारी आणि इतर खर्चासाठी संस्था जाहिरातदार व प्रायोजक यांच्यावर अवलंबून असते. अशा प्रकारे गेली २४ वष्रे ‘स्वरांकित’ची वाटचाल सुरू आहे. संस्थापकांची मुलेही आता संस्थेचा डोलारा सांभाळण्यासाठी सज्ज झाली आहेत. सरोदवादक आदित्य आपटे, डॉ. अजिंक्य दंडवते, पंकज देशमुख हे नव्या पिढीतील शिलेदार आता ‘स्वरांकित’च्या जडणघडणीत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र, त्यांच्यापुढे आव्हान आहे ते आर्थिक अडचणींचे. नालासोपाऱ्यातील नाना पाटील यांनी ‘स्वरांकित’ला मोठा आधार दिला होता. मात्र, त्यांच्या निधनानंतर हा आधार निखळला. आज डॉ. रोहित दंडवते हे ‘स्वरांकित’चे अध्यक्ष आहेत, तर उपाध्यक्षपदाची धुरा डॉ. वर्षां दंडवते आणि रमेश काणे यांच्याकडे आहे. खजिनदारपद मधुसूदन आणि मनीषा हे आपटे दाम्पत्य सांभाळत आहेत. मात्र, संस्थेच्या खजिन्यात सध्या तरी खणखणाटच आहे. त्यामुळे आर्थिक पाठबळ मिळाले तर या स्वरसाधनेची जोपासना करणे ‘स्वरांकित’ला शक्य होणार आहे.

*    मिल्टन सौदिया

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

एम. डी. आपटे (कोषाध्यक्ष), स्वरांकित चॅरिटेबल ट्रस्ट

एफ/२०३, छेडा कॉम्लेक्स, एस.टी. स्टँडजवळ, नालासोपारा (पश्चिम), ता. वसई, जि. पालघर

‘स्वरांकित चॅरिटेबल ट्रस्ट’

(Swarankit Charitable Trust)

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्यासोबत देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील. संस्था ‘८०-जी’ करसवलतप्राप्त आहे.

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय

संपादकीय विभाग, प्लॉट

नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय

संपादकीय विभाग,

एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट

नं. १२०५/२/६, शिरोळे

रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय

संपादकीय विभाग,

प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

औरंगाबाद कार्यालय

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी,  औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

नगर कार्यालय

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

दिल्ली कार्यालय

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१.

०११-२०६६५१५००

First Published on September 8, 2019 1:01 am

Web Title: sarva karyeshu sarvada 2019 swarankit music academy abn 97
Next Stories
1 दिल्लीवाला : चाँदनी चौकातून
2 बँक विलीनीकरणाने काय साधणार?
3 आर्थिक गर्तेतून बाहेर पडण्यासाठी..
Just Now!
X