कल्याण-खेतेवाडीतील आदिवासी विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे कल्याण येथे नुकताच परिचय मेळावा व महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ घेण्यात आला. नोकरीनिमित्त विविध ठिकाणी स्थायिक झालेल्या खेतेवाडीकरांच्या ओळखी वाढून त्यांचा गावाच्या विकासाला हातभार लागावा या उद्देशाने आयोजित केलेला हा मेळावा आदिवासींच्या परंपरा आणि प्रथेनुसार पार पडला.
राघोजी भांगरे यांच्या प्रतिमेला हार घालून अध्यक्ष श्रीचंदू मुठे यांच्या हस्ते कार्यक्रमास प्रारंभ झाला. सर्वश्री अरुण पारधी, शशिकांत करवंदे, विलास गवारी, नामदेव गभाले, अरुण रावते, एकनाथ ढेंगळे, अनिता दाभाडे आदींची या वेळी भाषणे झाली. आदिवासी तारपा या वाद्य वादनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2015 रोजी प्रकाशित
महादेव कोळी समाजाचा परिचय मेळावा
कल्याण-खेतेवाडीतील आदिवासी विकास बहुद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे कल्याण येथे नुकताच परिचय मेळावा व महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ घेण्यात आला.
First published on: 20-01-2015 at 07:10 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahadev koli socialintroduction gathering