मुंबईतील व्यावसायिक सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान दिल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. न्यूज १८ लोकमत वाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत केडियांनी राज ठाकरेंच्या धोरणांची तुलना दहशतवादाशी केली. केडियांनी मराठी शिकण्यास नकार देत, मराठी भाषेच्या आग्रहावर टीका केली. त्यांनी म्हटलं की, “मी ३० वर्षांपासून मुंबईत राहतो, पण मराठी शिकणार नाही.”