सध्या राज्यात हिंदी-मराठी भाषा वाद सुरू आहे. या वादात अभिनेता अक्षय केळकरने सोशल मीडियावर पोस्ट लिहून मत व्यक्त केले आहे. त्याने म्हटले की, ज्या राज्यात आपण राहतो, त्या राज्याची भाषा बोलण्याची अपेक्षा चुकीची नाही. तसेच, भाषा येत नसल्यास सौजन्यपूर्वक मान्य करावे. अक्षयची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, अनेकांनी त्याचे समर्थन केले आहे.