बंगळुरुच्या शेषाद्रिपुरममधील नम्मा कॉफी सेंटरमध्ये एका कर्मचाऱ्याला एक्स्ट्रा कप न दिल्यामुळे बेदम मारहाण करण्यात आली. संध्याकाळी ६:५० वाजता चार ग्राहकांनी एक्स्ट्रा कप मागितला, न मिळाल्याने त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून कर्मचाऱ्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत.