भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) (संरक्षण मंत्रालयांतर्गत भारत सरकारचा उपक्रम). BEL च्या सॉफ्टवेअर डिव्हीजनमध्ये पुढील एकूण ४० पदांची तात्पुरत्या स्वरूपात भरती. (१) ज्युनियर सॉफ्टवेअर ट्रेनी – १५ पदे (अजा – २, अbelज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८).

पात्रता – बी.सी.ए./बी.एससी. (कॉम्प्युटर सायन्स/आयटी).

(२) सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनी – १५ पदे (अजा – २, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ८).

पात्रता – एम.सी.ए./एम.एससी. (कॉम्प्युटर सायन्स/आयटी).

(३) सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स-I – १० पदे (अजा – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – १, खुला – ६).

पात्रता – बी.ई./बी.टेक. (कॉम्प्युटर सायन्स/इन्फॉरमेशन सिस्टीम/आयटी/डेटा सायन्स अँड इंजिनीअरिंग/एआय/एआय इंजिनीअरिंग).

अनुभव – पद क्र. १ व २ साठी ०-१ वर्ष. (फ्रेशर्स अर्ज करण्यास पात्र आहेत.)

पद क्र. ३ साठी किमान ५ वर्षांचा अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा – (दि. १ जून २०२५ रोजी) पद क्र. १ – २६ वर्षे, पद क्र. २ – २८ वर्षे, पद क्र. ३ – ४० वर्षे.

पद क्र. १ व २ साठी कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे.

सॉफ्टवेअर ट्रेनीजना सुरुवातीला २ वर्षांकरिता नेमणूक दिली जाईल. जी उमेदवाराची कामगिरी पाहून आणखी १ वर्षाने वाढविली जावू शकते.

सॉफ्टवेअर प्रोफेशनल्सना सुरूवातीला ३ वर्षांसाठी नेमणूक दिली जाईल, जी उमेदवाराची कामगिरी पाहून आणखी १ वर्षाने वाढविली जावू शकते.

कामाचे स्वरूप – सर्व पदांसाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, टेस्टींग अँड आयटी सपोर्ट आणि मेंटेनन्स.

वेतन – ज्यु. सॉफ्टवेअर ट्रेनी-I – दरमहा रु. २५,०००/-; दरवर्षी रु. ३,०००/- ने वाढविले जाईल. मेडिकल इन्श्युरन्सकरिता दरवर्षी रु. १२,०००/- मिळू शकतील.

सिनियर सॉफ्टवेअर ट्रेनी-I – दरमहा रु. ३५,०००/-; दरवर्षी रु. ५,०००/- ने वाढविले जाईल. मेडिकल इन्श्युरन्सकरिता दरवर्षी रु. १२,०००/- मिळू शकतील.

सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स-I – दरमहा रु. ६०,०००/-; दरवर्षी रु. ५,०००/- ने वाढविले जाईल.

उमेदवारांनी संबंधित युनिव्हर्सिटीचे निकषाप्रमाणे CGPA चे गुणांच्या टक्केवारीमध्ये रूपांतरित करण्याचा पुरावा देणे आवश्यक. सर्व पदांसाठी पात्रता परीक्षेत फक्त उत्तीर्ण होणे आवश्यक, गुणांची अट नाही.

निवड पद्धती – सॉफ्टवेअर ट्रेनीजसाठी लेखी परीक्षा १०० गुणांसाठी आणि सॉफ्टवेअर प्रोफेशनल्ससाठी लेखी परीक्षा – ८५ गुणांसाठी आणि इंटरव्ह्यू. पात्र उमेदवारांना ई-मेलद्वारे लेखी परीक्षेबाबत सूचित केले जाईल.

अर्जाचे शुल्क – ज्यु. सॉफ्टवेअर ट्रेनी पदांसाठी रु. १००/-; सि. सॉफ्टवेअर ट्रेनी – रु. १५०/-; सॉफ्टवेअर प्रोफेशनल्स – रु. ४५०/-. (अजा/अज/दिव्यांग यांना फी माफ आहे.)

अर्जाचे शुल्क ऑनलाइन मोडने SBI Collect मार्फत भरावयाचे आहे.

ऑनलाइन अर्जासोबत वेबसाईटवरील जाहिरातीमधील Para-X मध्ये नमूद केलेली कागदपत्रं अपलोड करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज www.bel-india.in या संकेतस्थळावर ३० जून २०२५ पर्यंत करावेत.

प्रसार भारतीत संधी

प्रसार भारती इंडियन ब्रॉडकास्टींग कॉर्पोरेशन मुख्यालय, नवी दिल्ली (भारताचे सरकारी मालकीचे सार्वजनिक प्रसारक) देशभरातील दूरदर्शन टेलीव्हिजन नेटवर्क आणि ऑल इंडिया रेडिओ स्टेशन्समध्ये टेक्निकल इंटर्न्स पदांची करार पद्धतीने १ वर्षाच्या कालावधीकरिता भरती. विभागनिहाय रिक्त पदे – दक्षिण विभाग – ६३, पूर्व विभाग – ६५, पश्चिम विभाग – ६६, उत्तर विभाग – ५२, उत्तर पूर्व विभाग – ६३, नवी दिल्ली – १०१, एकूण रिक्त पदे – ४१०.

पश्चिम विभागातील दूरदर्शन केंद्रांतील रिक्त पदे – मुंबई – ६, भोपाळ – २, अहमदाबाद – ४, पणजी – ५, रायपूर – ४, एकूण – २१.

पश्चिम विभागातील आकाशवाणी केंद्रे – मुंबई – ७, ओरस – १, रत्नागिरी – २, सांगली – २, परभणी – २, पुणे – २, एचपीटी मालाड – ३, एचपीटी पणजी – ३, अहमदाबाद – २, भोपाळ – ३, पणजी – ४, रायपूर – २, अंबिकापूर – २, जगदलपूर – २, भुज – २, एकूण ३९ पदे.

पश्चिम विभागातील सीसीडब्ल्यू केंद्र – मुंबई – एकूण ३ पदे (सिव्हील – २, इलेक्ट्रिकल – १), पुणे – एकूण ३ पदे (सिव्हील – २, इलेक्ट्रिकल – १).

पात्रता – इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकम्युनिकेशन/सिव्हील/आयटी/कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग पदवी किंवा पदव्युत्तर पदवी २०२४२५ मध्ये किमान ६५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. अंतिम निकालाच्या प्रतिक्षेत असलेले उमेदवार संस्थेच्या प्रमुखांकडून प्रमाणपत्र घेवून अर्ज करू शकतात.

वयोमर्यादा – (दि. ३ जुलै २०२५ रोजी) ३० वर्षे पूर्ण नसावीत.

एकत्रित स्टायपेंड – रु. २५,०००/- दरमहा.

शंकासमाधानासाठी avedanhelpdesk@gmail.com या ई-मेलवर screenshot of error सह मेल करावा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ऑनलाइन अर्ज http://avedan.prasarbharati.org/ या संकेतस्थळावर आवश्यक त्या कागदपत्रांच्या स्वयंसाक्षांकीत प्रतींसह दि. ३ जुलै २०२५ पर्यंत करावेत.