Maharashtra Vidhan Sabha Election Results Highlights: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. बुधवारी (दि. २० नोव्हेंबर) राज्यात २८८ जागांसाठी सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतांचा टक्का वाढला. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा असणे गरजेचे आहे. मात्र महायुतीने बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. भाजपाने १३२, शिवेसना (शिंदे) ५७, राष्ट्रवादी (४१) जागा जिंकल्या आहेत. तर मविआमधील काँग्रेसने १६, राष्ट्रवादी (शरद पवार) १०, शिवसेना (ठाकरे) २० ठिकाणी विजय मिळविला. महायुती २३५, मविआ ४९ आणि इतरांनी ४ जागा जिंकल्या आहेत.

महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव केला.

Live Updates

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal Highlights | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाईव्ह

10:59 (IST) 25 Nov 2024

MNS Candidates Result: मनसेच्या उमेदवारांना कुठे किती मतं मिळाली? वाचा संपूर्ण १२८ उमेदवारांची यादी; अनेक उमेदवारांना तिसऱ्या क्रमांकाची मतं!

128 MNS Candidate Result Updates: विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही आमदार जिंकून आला नसला, तरी अनेक ठिकाणी राज ठाकरेंचे शिलेदार तिसऱ्या क्रमांकावर असल्याचं पाहायला मिळत आहे.

इथे वाचा संपूर्ण यादी!

07:44 (IST) 25 Nov 2024
Sharad Pawar: इव्हीएमबाबत शरद पवारांचं वेगळं मत...

विधानसभा निवडणूक निकालांनंतर विरोधकांकडून इव्हीएमवर शंका उपस्थित केली जात आहे. पण शरद पवारांनी याबाबत वेगळं मत व्यक्त केलं आहे. “लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची राज्यातील जनतेची भावना होती. त्यामुळे आम्हाला थोड्याफार प्रमाणात विश्वास होता. त्या विश्वासामुळे आम्ही ज्या प्रकारे प्रचार केला. मात्र, त्याही पेक्षा जास्त प्रचार करण्याची गरज होती असं आता वाटतं. आमच्या काही सहकाऱ्यांनी ईव्हीएमवर शंका घेतली. मात्र, याबाबत जोपर्यंत अधिकृत माहिती हातात येत नाही तोपर्यंत मी याबाबत काहीही भाष्य करणार नाही”, असं ते म्हणाले.

वाचा सविस्तर

07:41 (IST) 25 Nov 2024

MNS Party : मनसेची मान्यता रद्द होणार का?

मनसेची मान्यता रद्द करण्यासंदर्भात निवडणूक आयोग त्यांना नोटीस पाठवू शकेल. मान्यता रद्द झाल्यास त्यांना निश्चित इंजिन हे चिन्ह मिळणार नाही. त्यांना निवडणूक आयोग इतर कोणतंही चिन्ह देऊ शकतो - अनंत कळसे, विधीमंडळाचे माजी प्रधान सचिव

23:38 (IST) 24 Nov 2024

"ज्यांनी-ज्यांनी त्रास दिला ते सगळे साफ झाले", अशोक चव्हाणांचं विधान

"लातूरला एक पडला आणि दुसरा निसटता निसटता निघाला निघाला आहे आणि हे महाराष्ट्राचं नेतृ्त्व करणार? काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे माझ्यावर टीका करून गेले. भोकर, नांदेडकडे लई लक्ष देत होते. आता निवडणुकीत फक्त १५० मतांनी निवडून आले आणि हे नेते महाराष्ट्राचं नेतृत्व करणार? त्या पक्षात काय राहिलंय? पृथ्वीराज चव्हाण हे माजी मुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात हे माजी महसूलमंत्री. हे सगळे काल साफ झाले. सर्वजण निवडणुकीत पडले. ज्यांनी-ज्यांनी मला त्रास दिला ते सर्व साफ झाले. त्यामुळे मला त्रास देऊ नका", असं अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं आहे.

22:50 (IST) 24 Nov 2024

विधानसभेतील पराभवानंतर मविआ आगामी महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार का? शरद पवार म्हणाले...

विधानसभेत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार का? असं शरद पवारांना विचारण्यात आलं असता ते म्हणाले, “यासंदर्भात अद्याप आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. आता आमची दोन दिवसांत बैठक होणार आहे, मग ठरवू”, असं शरद पवारांनी सांगितलं.

21:12 (IST) 24 Nov 2024

"असा निकाल लागल्यानंतर एखादा घरी बसला असता, पण मी...", शरद पवारांचं सूचक विधान

विधानसभा निकालानंतर आता तुमचे पुढचे नियोजन काय? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले, असा निकाल लागल्यानंतर एखादा घरी बसला असता, पण मी मात्र घरी बसणार नाही. मी यापुढेही दौरा करत राहणार नाही. नव्या दमाच्या लोकांबरोबर काम करत पुढे जाणार आहे", असे शरद पवार म्हणाले.

20:22 (IST) 24 Nov 2024

'अजित पवारांसमोर युगेंद्र पवारांचा टीकाव लागणार नव्हता, याची कल्पना...', शरद पवारांचं विधान

"अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार यांना मैदानात उतरवण्यात घाई झाली का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले, "अजित पवारांच्या विरोधात कुणाला तरी उभे करावे लागणारच होते. जर आम्ही उमेदवारच दिला नसता तर महाराष्ट्रात चुकीचा संदेश गेला असता. त्यामुळे आम्ही उमेदवार दिला. अजित पवार अनेक वर्ष सत्तेत आहेत. त्यांच्याकडे अनुभव आहे. त्यांच्या तुलनेत आमचा उमेदवार नवखा होता, हे आम्हाला सुरुवातीपासून माहीत होतेच", असं शरद पवार म्हणाले.

20:02 (IST) 24 Nov 2024

Maharashtra Live Updates : “मी घरी बसणार नाही”, विधानसभेच्या पराभवानंतर शरद पवारांनी सांगितली पुढची रणनीती!

Sharad Pawar On Original NCP : पक्षात फूट पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र दौऱ्याला निघालेल्या शरद पवारांची भूमिका विधानसभेच्या निकालानंतर काय असेल असा प्रश्न अवघ्या राज्याला पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने ८६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले होते. तसंच, बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी अजित पवारांविरोधात त्यांचाच सख्खा पुतण्या युगेंद्र पवारांना उभं केलं. प्रत्येक उमेदवारासाठी शरद पवारांनी सभा घेतल्या. परंतु, कालच्या निकालानंतर राष्ट्रवादीने केवळ दहाच जागा जिंकल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे शरद पवारांची पुढची रणनीती काय यावर त्यांनी आज भाष्य केलं. कराड येथे त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी संवाद साधला. हा पराभव स्वीकारला असून जनतेचा कौल आम्ही मान्य केला आहे, असं शरद पवार म्हणाले.

सविस्तर वृत्त वाचा

19:20 (IST) 24 Nov 2024

विरोधी पक्षनेतेपदासाठी लागणारे संख्याबळ आमच्याकडे नाही, शरद पवारांचं विधान

"महायुतीचा मोठा विजय झाला आहे. विरोधी पक्षनेते करण्यासाठी जेवढे संख्याबळ आवश्यक असते, तेवढे आता नाही, त्यामुळे विरोधी पक्षनेते होणे कठीण आहे. पण हे सरकारवर अवलंबून आहे की, ते विरोधी पक्षनेता करण्यासाठी परवानगी देणार का? पण सभागृहाला विरोधी पक्षनेता असावा, हे माझे मत आहे", असं शरद पवार यांनी म्हटलं.

19:10 (IST) 24 Nov 2024

Sharad Pawar : विधानसभेत ‘मविआ’ला अपयश का आलं? शरद पवारांनी सांगितली तीन मोठी कारणं; म्हणाले, “बटेंगे तो कटेंगे…”

Sharad Pawar : विधानसभेचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. या विधानसभेच्या निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024 Result) महायुतीला मोठं यश मिळालं. मात्र, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. खरं तर ही विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी अटीतटीची होईल असं बोललं जात होतं. पण महायुतीने मोठं घवघवीत यश मिळवलं. दुसरीकडे महाविकास आघाडीला फारसं यश मिळवता आलं नाही, उलट आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत.

सविस्तर वृत्त वाचा

19:10 (IST) 24 Nov 2024

Sharad Pawar : विधानसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी कोणाची? शरद पवार म्हणाले, “अजित पवारांच्या जास्त जागा…”

राज्याच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. अवघ्या १० जागांवर समाधान मानावे लागले. तर, दुसरीकडे अजित पवारांच्या ४१ जागा जिंकून आल्या. त्यामुळे खरा राष्ट्रवादी पक्ष आमचाच अन् अजित पवार याचे अध्यक्ष असा दावा आता सुरू झाला आहे. दरम्यान, शरद पवारांनी यांनी कालच्या निकालावर विवेचन करण्याकरता आज पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी खरी राष्ट्रवादी कोण अन् त्याचा अध्यक्ष कोण यावर भाष्य केलं आहे.

सविस्तर वृत्त वाचा

18:09 (IST) 24 Nov 2024

Sharad Pawar on Assembly Election Result: पुढचा हप्ता कधी मिळणार, याकडे लाभार्थ्यांचे लक्ष असणार - शरद पवार

आता पुढचा हप्ता कधी मिळणार, विज बील कधी माफ होणार, युवकांना पैसे कधी मिळणार, याकडे महिला आणि जनतेचे लक्ष लागणार आहे. त्यामुळे सरकार काय करते? याकडे जनतेचे लक्ष असणार आहे.

17:59 (IST) 24 Nov 2024

Sharad Pawar on Assembly Election Result: ईव्हीएमवर संशय घेणार नाही - शरद पवार

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अनेकांनी ईव्हीएमवर संशय घेतला आहे. या मशीन बाहेरच्या राज्यातील असल्याचा आरोप केला गेला. या विषयावर बोलताना शरद पवार म्हणाले की, मला या विषयाबाबत फारशी माहिती नाही. त्यामुळे मी या विषयावर बोलणार नाही.

17:51 (IST) 24 Nov 2024

Sharad Pawar on Assembly Election Result: अजित पवार यांच्या जास्त जागा आल्यात, ही गोष्ट मान्य - शरद पवार

विधानसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादी कुणाची, हा प्रश्न विचारला जात आहे. हा प्रश्न शरद पवारांना विचारला असताना ते म्हणाले, अजित पवार यांच्या जास्त जागा निवडून आल्या आहेत. हे मान्य करावे लागेल. पण राष्ट्रवादी काँग्रेसचा संस्थापक कोण आहे? हे सर्वांना माहीत आहे.

17:47 (IST) 24 Nov 2024
Sharad Pawar on Assembly Election Result: विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांची पहिली पत्रकार परिषद; लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत म्हणाले...

विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडली. यावेळी लाडकी बहीण योजनेवर त्यांनी भाष्य केले. या योजनेमुळे महिलांचे मतदान दोन ते तीन टक्क्याने वाढले, असे शरद पवार म्हणाले.

https://youtu.be/CZiO4_L0510

14:35 (IST) 24 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election Result: महायुतीच्या आमदारांची मुंबईकडे धाव; गटनेता निवडीपासून मुख्यमंत्री, मंत्रीपदावर होणार चर्चा

महायुतीच्या २३५ आमदारांचा विजय झाला. महायुतीचे सरकार स्थापन होणार असल्यामुळे आता आमदारांनी मुंबईची वाट धरली आहे. आपापल्या पक्षाचा गटनेता निवडणे आणि आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री होण्यासाठी आमदार प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने अजित पवार यांना गटनेतेपदी निवडले आहे.

13:07 (IST) 24 Nov 2024

MVA on Election Result: “महायुतीला राक्षसी बहुमत…”, मविआने न्यायालयात जाण्याची तयारी करावी, असिम सरोदेंची सूचना

विधानसभेचा निकाल हा पूर्णपणे अनाकलनीय आणि अविश्वसनीय असा आहे. एवढं राक्षसी बहुमत भाजपाला किंवा महायुतीला मिळेल, असं चित्र संपूर्ण राज्यात अजिबात नव्हतं. मविआचे जे उमेदवार पराभूत झाले आहेत, त्यांनी मला संपर्क साधून या निकालाला आव्हान देण्यास सांगितले आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र याचिका दाखल करणार आहोत, अशी प्रतिक्रिया वकील असीम सरोदे यांनी दिली.

12:21 (IST) 24 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Manoj Jarange Patil: मराठा समाजाला दगा देऊ नका, मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघापैकी सात ठिकाणी महायुतीचा पराभव झाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांचा प्रभाव पाहायला मिळाला नाही. यावर आता खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे फॅक्टर अपयशी ठरलेल्या लोकांवर त्यांनी टीका केली आहे. सविस्तर बातमी वाचा

10:48 (IST) 24 Nov 2024

Maharashtra Vidhan Sabha Election Vote Share: विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती मतदान मिळालं?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळाला. महाविकास आघाडीची मतदानाची टक्केवारी चांगलीच घटली. जाणून घ्या प्रत्येक पक्षाची आकडेवारी

09:52 (IST) 24 Nov 2024

Maharashtra Assembly Election Result: विधानसभेत कोणत्या पक्षाचा ‘स्ट्राइक रेट’ सरस

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून मोठा विजय मिळविला. महायुती आणि मविआपैकी सर्वाधिक स्ट्राइक रेट कुणाचा होता? यावर नजर टाकू. सविस्तर बातमी वाचा

09:51 (IST) 24 Nov 2024

VIDEO : कोल्हापुरात आमदाराच्या विजयी मिरवणुकीवेळी आगीचा भडका, गुलाल उधळताना दुर्घटना, काही महिला जखमी

चंदगडचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील यांच्या विजयी मिरवणुकीदरम्यान आगीचा भडका उडाल्याची घटना घडली आहे. शिवाजी पाटील या आगीपासून थोडक्यात बचावल्यांचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. मात्र आगीच्या भडक्यात काही महिला होरपळल्या आहेत. शिवाजी पाटलांच्या विजयी मिरवणुकीवेळी त्यांच्या अंगावर व कार्यकर्त्यांवर जेसीबीने गुलाल उधळला जात होता. याच वेळी तिथे काही महिला शिवाजी पाटलांचं औक्षण करण्यासाठी जमल्या होत्या. औक्षण करतेवेळी जेसीबीने गुलाल उधळळा जात होता. त्याचवेळी आगीचा भडका उडाला. या आगीपासून शिवाजी पाटील थोडक्यात बचावले. मात्र, काही महिला जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

सविवस्तर वाचा

06:31 (IST) 24 Nov 2024

Maharashtra Assembly Election Result: नालासोपाऱ्यात विजयानंतर भाजपाच्या राजन नाईकांना अश्रू अनावर

नालासोपरा येथील भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांचा विजय झाला आहे. राजन नाईक यांना १ लाख ६५ हजार ११३ मते मिळाली तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितीज हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला. मतदानाच्या आदल्या दिवशी विरारमध्ये भाजपा उमेदवार राजन नाईक आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांच्याबरोबर राडा झाला होता. तब्बल दोन तास या दोन्ही नेत्यांना क्षितिज ठाकूर यांच्या कार्यकर्त्यांनी घेरून धरले होते. या नाट्यमय घडामोडींनंतरही राजन नाईक यांचा विजय झाला आहे.

06:06 (IST) 24 Nov 2024

Maharashtra Assembly Election Result: महायुतीच्या निकालाची चौकशी करणार - नाना पटोले

महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेस पक्षातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी महायुतीच्या निकालाची चौकशी करणार असल्याचे काँग्रेसने सांगितले.

06:06 (IST) 24 Nov 2024

Maharashtra Assembly Election Result: डहाणू लोकसभा मतदारसंघातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एकमेव आमदार विजयी

विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती बाजी मारून महाविकास आघाडीला गारद केले असले तरी काही पक्षांचे आमदार या वावटळीतही तग धरून राहिले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते विनोद निकोले हे त्यापैकीच एक आहेत. डहाणू विधानसभा मतदारसंघात विनोद निकोले यांनी १ लाख ४ हजार ७०२ मते मिळवली. तर भाजपाच्या विनोद मेढा यांचा ५१३३ मतांनी पराभव झाला.

03:32 (IST) 24 Nov 2024

Maharashtra Assembly Election Result: आम्ही संघर्ष करू, बाळासाहेब थोरात यांनी मौन सोडले

काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात यांना संगमनेर मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला आहे. शिवसेनच्या अमोल खताळ यांनी थोरात यांचा तब्बल १०,५६० मतांनी पराभव केला. निकालानंतर थोरातांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, हा निकाल धक्कादायक तर आहेच. पण यामध्ये जनसामान्यांच्या मनात शंका येत आहेत. त्या नाकारता येणार नाहीत. महायुतीचा हा खरा विजय नसून त्यांनी ओढून ताणून मिळवेले यश आहे, अशी टीका थोरात यांनी केली.

02:07 (IST) 24 Nov 2024

Maharashtra Assembly Election Result: जोगेश्वरी पूर्व विधानसभेत रवींद्र वायकर यांच्या पत्नीचा पराभव

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे) पक्षाचे रवींद्र वायकर यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे अमोल किर्तीकर यांचा अवघ्या ४८ मतांनी पराभव केला होता. त्या पराभवाचा वचपा आता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने काढला आहे. जोगेश्वरी पूर्व विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या अनंत (बाळा) नर यांनी रवींद्र वायकरांच्या पत्नी मनीषा वायकर यांचा पराभव केला आहे.

01:33 (IST) 24 Nov 2024
Maharashtra Assembly Election Result: भाजपाने १४८ पैकी १३२ जागा जिंकल्याच कशा?

भाजपाने विधानसभा निवडणुकीत एवढा मोटा विजय कसा मिळविला, हा तपासाचा विषय आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. निवडणुकीच्या निकालाचे सखोल विश्लेषण करणार असल्याचे काँग्रेस म्हटले आहे.

https://twitter.com/Pawankhera/status/1860313510888055228

22:43 (IST) 23 Nov 2024
Maharashtra Assembly Election Result: महाराष्ट्रातील २८८ विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत

महायुतीमधील भाजपाने सर्वाधिक १३२ जागा जिंकल्या, शिवसेना (शिंदे) पक्षाने ५७, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४१ जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीमधील शिवेसना (ठाकरे) गटाने २०, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) १० जागा जिंकल्या. समाजवादी पार्टी आणि जन सुराज्य शक्तीने २ जागा जिंकल्या. अपक्ष २ आणि छोट्या पक्षांनी ६ जागा जिंकल्या.

21:04 (IST) 23 Nov 2024

ठाकरे कुटुंबातील पहिला पराभव; काकाच्या उमेदवारामुळे पुतण्याची संधी हुकली!

अमित ठाकरेंनी शिक्षण, आरोग्य, क्रीडा, पाणी व रहदारीशी संबंधित समस्या सोडविणे, जुन्या चाळी व इमारतींचा पुनर्विकास, छत्रपती शिवाजी महाराज पार्क धूळमुक्त आदी मूलभूत व पायाभूत सुविधा देण्याच्या मुद्द्यांवर भर दिला असून भविष्यात यासंबंधित विविध कामे करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यातून दिले होते. परंतु, तरीही अमित ठाकरेंची जादू चालली नाही. तर, उद्धव ठाकरे यांचा शिलेदार महेश सावंत विजयी ठरले आहेत. त्यामुळे ते जायंट किलर ठरलेत.

सविस्तर वाचा

20:55 (IST) 23 Nov 2024
PM Narendra Modi on maharashtra Assembly election Result: काँग्रेस आता परजीवी झाली असन ते स्वबळावर जिंकू शकत नाहीत - नरेंद्र मोदी

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस पूर्णपणे परजीवी झाल्याचे आता सिद्ध झाले आहे, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. काँग्रेस यापुढे कधीही स्वबळावर जिंकू शकत नाही. भारतातील सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

https://twitter.com/BJP4India/status/1860345684857323875

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates in Marathi

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४

Story img Loader