अपेंडिसाइटिस ही सामान्य समस्या असली तरी, त्रास वाढल्यास ती जीवावर बेतू शकते. ओटीपोटात दुखणे, मळमळ, ताप आणि उलट्या हे अपेंडिसाइटिसची काही प्रमुख लक्षणं असून याकडे दुर्लक्ष करणं जीवावर बेतू शकतं. कारण अपेंडिक्सचं वेळीच निदान व उपचार न झाल्यास अपेंडिक्स फुटण्याची शक्यता अधिक असते. यामुळे इफेक्शन होऊन रूग्णाला प्राण गमवावा लागू शकतो. अपेंडिसाइटिस ही अपेंडिक्सची जळजळ आहे, जी पोटाच्या उजव्या खालच्या भागात मोठ्या आतड्याची एक लहान थैलीसारखी रचना आहे. ओटीपोटात वेदना होण्याचे हे सर्वात सामान्य कारणांपैकी एक असून हा याचा जास्त त्रास झाल्यास शस्त्रक्रियेद्वारे अपेंडिक्स काढून टाकणं हा एकमेव उपाय ठरतो.

अनेकांना अपेंडिक्सचा त्रास असतो, मात्र त्यांना तो लवकर ओळखता येत नाही. ज्यामुळे त्याचा त्रास जास्त उद्भवतो. पण या आजाराचे निदान वेळेवर निदान झाले तर त्यावर उपचार करणं सोपं जातं. त्यामुळे आपणाला हा त्रास आहे ते कसे ओळखायचे ? त्याची लक्षणं काय ? आणि हा त्रास कमी करण्याचे काही घरगुती उपाय याबाबत आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.

Mongoose attack on lions animal fight wildlife video viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! मुंगूसानं दिली सिंहांना टक्कर; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
pm narendra modi bill gates
Video: करोना काळात थाळ्या वाजवायला का सांगितलं? पंतप्रधान मोदी बिल गेट्सना म्हणाले, “..तेव्हा आमच्या देशात याची मस्करी झाली होती!”
Fatty Liver,
फॅटी लिव्हर असेल तर आहार कसा असावा? पहा संपूर्ण यादी
अपेंडिसायटिस

हेही वाचा- काकडी खाल्याने खरंच सर्दी होते ? हिवाळ्यात काकडी खाणे कितपत योग्य? जाणून घ्या

सध्या सर्व वयोगटांमध्ये अपेंडिसाइटिसची प्रकरणे झपाट्याने वाढताना दिसून येत आहेत. याचं वेळीच निदान झाल्यास उपचार करणं सहज शक्य आहे. परंतु, बहुतांश लोक याकडे दुर्लक्ष करतात. तर काहींना या आजाराच्या लक्षणांबद्दल पुरेशी माहिती नसते. त्यामुळे अपेंडिसाइटिस बाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं खूप गरजेचं असल्याचं डॉ. पंकज गांधी यांनी म्हटलं आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जठरांत्रीय आजारांमध्ये आवश्यक असलेल्या शस्त्रक्रियेपैकी ३-५ टक्के तीव्र अपेंडिसाइटिसचा समावेश होतो. लहान मुल, वृद्ध आणि गरोदर महिलांमध्येही ही समस्या दिसून येते. मुख्यतः ही समस्या १५ ते ३० वर्ष वयोगटात प्रामुख्याने आढळते. अपेंडिक्सच्या अस्तरात अडथळा निर्माण होऊन संसर्ग होऊ शकतो हे अपेंडिसाइटिसचे बहुधा कारण आहे.

हेही वाचा- सेक्स करताना पायात गोळे येतायत? मोक्याच्या क्षणी येणाऱ्या Muscle क्रॅम्पवर उपाय काय?

अपेंडिक्सची लक्षणे –

हेल्थलाइनच्या मते, नाभीभोवती वेदना होणे ओटीपोटाच्या खालच्या उजव्या बाजूला वेदना.

  • भूक न लागणे
  • ओटीपोटात वेदना सुरू झाल्यानंतर मळमळ आणि उलट्या.
  • ओटीपोटात सूज
  • १०० ते १०१ डिग्री ताप येणे
  • पोटात गॅससह बद्धकोष्ठता आणि अतिसार
  • गॅस बाहेर काढण्यास अडचण ही या आजाराचे मुख्य लक्षण आहेत.

हेही वाचा- वजन कमी करायचंय पण सतत भूक लागते? ‘हे’ ५ सुपरफूड खाल्ल्याने भूक आणि लठ्ठपणा नियंत्रणात ठेवता येईल

जेव्हा लक्षणे दिसतात असा करा बचाव –

अपेंडिक्सच्या आजाराची लक्षणे दिसताच तुमच्या आहारात बदल करा, आहारात तंतुमय भाज्यांचा समावेश करा. फायबर असलेले अन्न मल मोकळे करेल आणि तुमच्या पोटातून घाण बाहेर काढण्यास मदत करेल. अपेंडिक्स टाळण्यासाठी आहारात तंतुमय भाज्या खाव्यात. संपूर्ण धान्य, कडधान्ये, बटाटे, कोशिंबीर, ताजी फळे आणि भाज्या शरीराला पोषक तत्त्वे देतात आणि शरीरातून न पचलेले अन्न बाहेर काढण्यास मदत करतात. अपेंडिसायटिसवर अँटिबायोटिक्सच्या मदतीने वेळीच उपचार केले तर तो शस्त्रक्रियेशिवाय बरा होऊ शकतो.

अपेंडिक्ससाठी घरगुती उपाय –

अपेंडिक्सचा त्रास जाणवू लागल्यास मेथीचे सेवन करा. मेथीमुळे वेदना आणि सूज येण्यापासून आराम मिळतो. एक लिटर पाण्यात दोन चमचे मेथीचे दाणे अर्धा तास उकळवा आणि ते पाणी गाळून ते पाणी प्या. अपेंडिक्समुळे ज्या ठिकाणी वेदना होतात त्या बदामाच्या तेलाने मसाज करा. बदाम तेल जळजळ आणि वेदना कमी करण्यास मदत करेल. भाज्यांचा ज्यूस प्या, गाजर, काकडी, अशा फळांचा ज्यूस वेदना आणि सूज दूर करण्यास मदत करेल.