Air pollution: मुंबई, दिल्लीसारख्या शहरांमध्ये वायू प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत असल्याने आपल्या पाळीव प्राण्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची वेळ आली आहे. थंडीच्या दिवसात ही समस्या आणखी वाढते, त्यामुळे अनेक जण घराबाहेर पडताना मास्क लावतात. अनेक जण आपल्या प्राण्यांना वॉकला घेऊन जाताना त्यांनादेखील मास्क लावतात. परंतु, हा मास्क पाळीव प्राण्यांनाही लावणे योग्य आहे का?

डीसीसी हॉस्पिटलचे पशुवैद्य डॉ. विनोद शर्मा म्हणाले की, पाळीव प्राण्यांना मास्कची गरज नाही. “मला वाटत नाही की आपण पाळीव प्राण्यांवर – एन९५ किंवा इतरांवर कोणताही मास्क लावावा. त्यांना अनेकदा घरातच ठेवावे आणि एअर प्युरिफायर चालू ठेवावे,” असे डॉ. शर्मा म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, श्वान तोंड उघडे ठेवून श्वास घेतात, जिभेवरील रक्तवाहिन्या त्यांच्या शरीराचे तापमान नियंत्रित करतात. मानवांप्रमाणे त्यांना गुदमरल्यासारखे वाटल्यास ते मास्क काढू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना श्वसनाच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे त्यांना त्वरित वैद्यकीय सेवेची आवश्यकता असू शकते.

डॉ. शर्मा यांच्या मते, श्वानांना निरोगी राहण्यासाठी रक्तातील ९४ टक्क्यांहून अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते. ही पातळी पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास त्यांना हायपोक्सियाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे अंतर्गत अवयव खराब होतात आणि ते निकामी होतात.

डॉ. शर्मा यांनी सांगितले की, “भारतात कोणतेही चांगले डिझाइन केलेले मास्क नाहीत” आणि “पाळीव प्राण्यांवर मास्क घालण्याच्या वैज्ञानिक पद्धतीबद्दल फारसे माहिती नाही, या वस्तुस्थितीबद्दल खेद व्यक्त केला. “पग आणि बुलडॉगसारख्या पाळीव प्राण्यांसाठी मास्क योग्यरित्या डिझाइन केलेले नाहीत. ते लहान मुलांप्रमाणेच त्यांच्या चेहऱ्यावर मास्क बांधलेले सहन करू शकत नाहीत, ” असे डॉ. शर्मा म्हणाले.

डॉ. शर्मा यांनी सांगितले की, मास्क वापरण्याऐवजी पाळीव श्वानांना फिरायला जाताना आवश्यक सावधगिरी बाळगा, जसे की संध्याकाळी उशिरा आणि पहाटे घराबाहेर घेऊन जाणे टाळणे आणि आवश्यक आहार आणि स्वच्छता पद्धतींचे पालन करणे.

हेही वाचा: दिवसेंदिवस वाढणाऱ्या वायू प्रदूषणात तुमच्या पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्याल? तज्ज्ञांचे मत वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ज्या पाळीव प्राण्यांना हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी किंवा ब्राँकायटिससारख्या पूर्व अस्तित्वात असलेल्या समस्या आणि जे वृद्ध आहेत, अशा प्राण्यांच्या मालकांनी “अतिरिक्त सावधगिरी बाळगणे” आणि नियमित तपासणीसाठी जाणे आवश्यक आहे. “मी अनेक प्रकरणे पाहत आहे, जिथे पाळीव प्राण्यांचे मालक तक्रार करतात की, त्यांच्या पाळीव श्वानांना श्वास घेता येत नाही. अशा स्थितीत घरामध्ये राहणे आणि शक्य तितके एअर प्युरिफायर वापरणे महत्त्वाचे आहे,” असे डॉ. शर्मा यांनी सांगितले.