Maharashtra News Today: तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिनाचे कार्यक्रम पार पडल्यानंतर आज तारखेनुसार राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. एकीकडे रायगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्याहस्ते विधिवत पूजा केली जात असताना दुसरीकडे पुण्यात लाल किल्ल्यामध्येही विविध संघटनांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यानिमित्ताने महाराष्ट्रभरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

Prakash Ambedkar news
महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचित हजेरी लावणार; ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “महत्त्वपूर्ण महासभा असूनही…”
Raj Thackeray on marathi bhasha din
“लोकांच्या बदलत्या आवडीनिवडी लक्षात घेऊन…”, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट!
rahul narvekar
राष्ट्रवादी पक्षफुटीच्या निर्णयावर राहुल नार्वेकरांचं महत्त्वाचं भाष्य; म्हणाले, “मी कोणाच्या…”
What Jayant Patil Said?
“आमचा पक्ष फुटला आहे, आता…”; जयंत पाटील यांचं महत्त्वाचं वक्तव्य
Live Updates

Maharashtra News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

18:23 (IST) 6 Jun 2023
दिव्यात विविध प्रकल्पांच्या उदघाटनांची जंत्री; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रकल्पांचे उदघाटन; शिंदेची शिवसेना करणार शक्तीप्रदर्शन

ठाणे: शहरातील बहुचर्चित समुह पुनर्विकास योजनाचा (क्लस्टर) शुभारंभापाठोपाठ आता शहराच्या वेशीवर असलेल्या दिवा परिसरातील विविध प्रकल्पांचे उदघाटन आज, बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.

सविस्तर वाचा...

18:23 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today: जितेंद्र आव्हाडांची ट्विटर पोस्ट व्हायरल!

वाचा पूर्ण पोस्ट...

मन सुन्न झालंय...

तीन हजार रुपयांसाठी गुंड सावकाराने मातंग बांधवाच्या डोळ्यात मिरची टाकून रॉडने मारत घडवले हत्याकांड... ातूर रेणापूर : अतिशय संतापजनक घटना आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे. गिरीरत्न तबकाले या मातंग गरीब बांधवाने गावातील सावकाराकडून तीन हजार रुपये 10% टक्याने व्याजाने घेतले. तीन हजारांच्या बदल्यात 20 हजार रुपये वसूल केले तरीही आणखी पैसे बाकीच आहे म्हणत भर बाजारात काठीने मारहाण केली. तबकाले रेणापूर पोलीस स्टेशनला गेला नेहमी प्रमाणे दलित असलेल्या पीडिताची तक्रार घेतली नाही उलट बाँडवर जखमी पीडिताचा जबाब घेऊन प्रकरण दडपून टाकले. हाताला गंभीर मार लागल्यामुळे तो हॉस्पिटलला गेला, पोलिसांनी कार्यवाही केली नाही त्यामुळे आरोपीचे बळ वाढले. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिरत्न तबकाले याच्या घरी त्याने सकाळी 6 वाजताच हल्ला चडवला.हल्ला अतिशय क्रूरपणे केला, आरोपी अन् त्याचा भाचा या दोघांनी मिरची पावडर डोळ्यात टाकून रॉडने हल्ला केला या हल्ल्यात मातंग बांधव मृत्यूमुखी पडला. दलित आहे आमचं काय करणार या मानसिकतेतून त्याची आर्थिक लुटमार केली आणि मस्ताडलेल्या हरामीने जणू पोलीस यंत्रणा खिश्यात घातली या मानसिकतेतून ही हत्या केली. राज्यात दलित सुरक्षीत नाहीत, नांदेडची घटना ताजी असताना ही अतिशय क्रूर घटना समोर आली जाहीर निषेध करत असून राज्य सरकारला प्रश्न विचारत आहे की मातंग समाजाचे हे हत्याकांड तुम्ही गंभीर घेणार आहेत की नाही?

https://twitter.com/Awhadspeaks/status/1666042911195123716

18:01 (IST) 6 Jun 2023
वाशिम: रात्री १ वाजता येणारी मुंबई एक्सप्रेस पोहचली ३ वाजता; प्रवाशांना मन:स्ताप

वाशिम: वाशिम वरून थेट मुंबई जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातच नव्याने सुरू झालेली नांदेड पूर्णा – वाशीम – अकोला – नाशिक – मुंबई लोकमान्य टिळक एक्सप्रेस सोईची होईल, अशी आशा प्रवाशांना होती. परंतु, अल्पावधीतच या रेल्वेची सेवा विस्कळित होत चालली असून रात्री तब्बल दोन तास विलंबाने ती धावली.

सविस्तर वाचा...

17:39 (IST) 6 Jun 2023
भंडारा: आता बाहेरचा पालकमंत्री दिला तर १०० टक्के विरोध; शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार भोंडेकर यांचा सरकारला इशारा

भंडारा : मला मंत्रिपद देत नसाल तर भाजप किंवा शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. मात्र, बाहेरचा पालकमंत्री दिल्यास त्याला १०० टक्के विरोध असेल, असा इशारा भंडाऱ्यातील शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिंदे - फडणवीस सरकारला दिला आहे.

सविस्तर वाचा

17:14 (IST) 6 Jun 2023
अमरावती: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फेकला विभागीय आयुक्तालयात कापूस

अमरावती: सध्या बाजारात कापसाचे दर घसरले असून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळेच हे संकट उद्भवले असून सरकारने कापसाला तेरा हजार रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात कापूस फेकला.

सविस्तर वाचा...

17:11 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today: नेते गप्प का बसतात, हे कळत नाही - रोहित पवार

शरद पवारांनी अनेक नेत्यांना मोठं केलं. मोठ्या नेत्यांनी पदं भूषवली. पण जेव्हा शरद पवारांवर असा कुठला नेता खालच्या पातळीवर बोलतो, तेव्हा फक्त कार्यकर्तेच लढतात. हे बघितल्यावर मलाही खंत वाटते. ज्या नेत्यांनी पदं भूषवली, ते नेते यावर काहीच बोलत नाहीत. अजित पवारच यावर बोलले, पण बाकीचे शांत राहिले. आम्ही बोलत राहू, पण नेते गप्प का बसतात हे काही कळत नाही - रोहित पवार

17:10 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today: ...मुनगंटीवारांकडून ही अपेक्षा नव्हती - रोहित पवार

काही नवीन नेते आज महाराष्ट्रात तयार झाले आहेत. खालच्या पातळीवर बोलून पदाची अपेक्षा त्यांच्या नेत्याकडून ते करत असावेत. भाजपाचे नवीन स्वघोषित नेते खालच्या पातळीवर बोलतात आणि वरचे नेते जेव्हा यावर गप्प बसतात तेव्हा त्याचा अर्थ या खालच्या पातळीवरच्या राजकारणाला मोठ्या नेत्यांचं पाठबळ आहे. मुनगंटीवारांकडून ही अपेक्षा नव्हती - रोहित पवार

17:03 (IST) 6 Jun 2023
आधी वाहतूक नियमांचे फलक, मगच कारवाई; बदलापुरात वाहतूक कारवाई तुर्तास स्थगित, पालिका लावणार फलक

बदलापूरः बदलापूर स्थानक परिसरात वाहतुकीचे कोणतेही फलक नसताना वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईच्या विरोधात स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर नुकतीच कुळगाव बदलापूर नगरपालिकेत याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सविस्तर वाचा

16:51 (IST) 6 Jun 2023
शिवमंदिर परिसर सुशोभीकरण दृष्टीपथात; अंबरनाथ नगरपालिकेकडून निविदा जाहीर; दीड वर्षात करणार सुशोभीकरण

अंबरनाथः अंबरनाथच्या शिलाहारकालीन शिवमंदिराच्या सुशोभीकरणाच्या प्रकल्पाला लवकरच प्रत्यक्षात सुरूवात होणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेने शिवमंदिराच्या परिसर सुशोभीकरणात प्रवेशद्वारापासून नंदी, वाहनतळ, प्रदर्शन केंद्र, अँम्पी थिएटर, भक्त निवास ते स्वच्छतागृहापर्यंतच्या विविध कामांसाठी नुकतीच निविदा जाहीर केली आहे.

सविस्तर वाचा...

16:24 (IST) 6 Jun 2023
डोंबिवलीत गृह प्रकल्पाच्या उद्वाहन खड्ड्यात पडून चालकाचा मृत्यू

डोंबिवली: कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील मानपाडा गावा जवळील रुणवाल माय सिटी गृहप्रकल्पाच्या समुह विकास प्रकल्पातील पाच क्रमांकाच्या संकुलातील उद्वाहन चालकाचा तेराव्या माळ्यावरुन उद्वाहनाच्या खड्ड्यात पडून गुरुवारी मृत्यू झाला.

सविस्तर वाचा...

16:14 (IST) 6 Jun 2023
नाशिक: खैराची तस्करी करणाऱ्यांची वन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; दोन संशयित ताब्यात

नाशिक: सुरगाणा तालुक्यातील उंबरठा वनपरीक्षेत्रात खैराची तस्करी करणाऱ्यांना वन कर्मचाऱ्यांनी हटकले असता धक्काबुक्की करण्यात आली. या प्रकरणी दोन संशयितांना वनविभागाने ताब्यात घेतले.

सविस्तर वाचा...

16:08 (IST) 6 Jun 2023
मुंबईसह कोकण किनारपट्टीला इशारा

मुंबई: अरबी समुद्रात खोलवर चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून गेल्या तीन तासांत चक्रीवादळाचा वेग ११ किलोमीटर प्रतितास इतका आहे. हे चक्रीवादळ उत्तरेच्या दिशेने पुढे सरकत असून.

सविस्तर वाचा

15:55 (IST) 6 Jun 2023
पुणे: प्रेमसंबंधांत अडथळा ठरणाऱ्या पित्याचा खून; २३० सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर ‘असा’ झाला गुन्हा उघड

पुणे: शिक्रापूर परिसरात संपूर्ण जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले असून प्रेमसंबंधास विरोध केल्याने एका महिलेने अल्पवयीन मुलगी आणि तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा निर्घृण खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

सविस्तर वाचा..,

15:52 (IST) 6 Jun 2023
शिक्षण क्षेत्रात खळबळ: लाचखोर अधिकारी, शिक्षकांबाबत शिक्षण आयुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले 'हे' पत्र

पुणे : लाच प्रकरणात अडकलेले शिक्षक, तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची उघड चौकशी करण्यात यावी, असे पत्र शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) दिले आहे.

सविस्तर वाचा

15:28 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today: राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन सोहळा पुढे ढकलला!

बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा निर्णय, ९ जून रोजीचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पुढे ढकलला!

https://twitter.com/NCPspeaks/status/1665992280556339200

15:02 (IST) 6 Jun 2023
नागपूर: आपत्ती व्यवस्थापनाची माहिती चित्ररथावर

नागपूर: पावसाळा सुरू होण्यापूर्वी शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी सर्व तयारी केली जाते. पूर नियंत्रण आणि तत्सम बाबींचे नियोजन केले जाते. त्याची माहिती लोकांपर्यत पोहचवली जाते.

सविस्तर वाचा...

15:00 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today: ते जे करू शकले नाहीत, ते आम्ही करून दाखवलंय - देवेंद्र फडणवीस

डीआयपीपीनं आकडेवारी जाहीर केली आहे. FDIमध्ये महाराष्ट्रच पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राला पुन्हा आपण पहिल्या क्रमांकावर आणलंय. त्यामुळे जे लोक आत्तापर्यंत उद्योग इकडे गेले, तिकडे गेले म्हणत होते, आता तरी त्यांनी त्यांची तोंंडं बंद केली पाहिजेत. ते जे करू शकले नाहीत, ते आम्ही करून दाखवलं आहे - देवेंद्र फडणवीस

14:56 (IST) 6 Jun 2023
डोंबिवलीत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई,एक लाख ४५ हजाराचा दंड वसूल

डोंबिवली- सात दिवसाच्या कालावधीनंतर डोंबिवलीत वाहतूक विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दिवसभर पुन्हा वाहन तपासणी मोहीम राबवली. वाहतूक नियम, मोटार वाहन कायद्यातील नियम न पाळणाऱ्या ६२ बेशिस्त रिक्षा चालक, दुचाकी, मोटार चालकांवर कारवाई करुन पथकाने एक लाख ४५ हजारांचा दंड वसूल केला.

सविस्तर वाचा

14:43 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today: ठाकरे गटाचा यूट्यूब शो, आवाज कुणाचा!

ठाकरे गट यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडणार भूमिका, प्रश्न आणि मुद्दे...!

https://twitter.com/ShivSenaUBT_/status/1665928572643717125

14:05 (IST) 6 Jun 2023
सावधान! भंडाऱ्यात चादर विक्रीच्या नावाखाली चोरट्यांची टोळी सक्रिय; घरोघरी पाळत ठेवतात अन् संधी मिळताच…

भंडारा: सध्या शहरात चोरांची एक टोळी सक्रिय झाली आहे. चादर विक्री करण्याच्या निमित्ताने ते घरोघरी जाऊन पाळत ठेवतात आणि संधी मिळताच चोरी करून पसार होतात.

सविस्तर वाचा...

13:56 (IST) 6 Jun 2023
पिंपरी: पालखी सोहळ्यामुळे उद्यापासून आळंदीत अवजड वाहने, चारचाकींना बंदी… जाणून घ्या वाहतुकीचे बदललेले मार्ग

पिंपरी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त ७ ते १२ जून दरम्यान आळंदीत औद्योगिक अवजड वाहन आणि चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी दिली.

सविस्तर वाचा

13:49 (IST) 6 Jun 2023
विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; या अभ्यासक्रमासाठी राज्य सरकारकडून परदेशी शिष्यवृत्ती!

पुणे: कांदळवन आणि सागरी जैवविविधता या विषयात पदव्युत्तर पदवी, पदवी आणि पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी परदेशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या २५ विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

सविस्तर वाचा...

13:39 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today: अजित पवार भडकले!

महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीने सांगून दाखवावं की मी कामं करण्यासाठी पैसे घेत होतो, तर मी राजकारण सोडेन. कृपाल तुमानेंनी आरोप सिद्ध करून दाखवावेत, नाहीतर उद्यापासून घरी बसावं - अजित पवारांचं आरोपांवर कृपाल तुमानेंवर टीकास्र. अजित पवार कामं करून देण्यासाठी उपमुख्यमंत्री असताना पैसे घ्यायचे असा आरोप कृपाल तुमानेंनी केला होता.

13:14 (IST) 6 Jun 2023
भंडारा : ड्रग्ज, गांजाचे सेवन आणि विक्री करणारी भिक्षेकरांची टोळी शहरात सक्रिय

शहरातील नगर परिषदेच्या क्रीडा मैदानावर भिक्षेकऱ्यांची एक टोळी मागील तीन महिन्यांपासून तळ ठोकून आहे. मुलांच्या खेळण्याच्या मैदानावर या टोळीने अतिक्रमण केले आहे. हे भिक्षेकरी परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करून किंवा धमकी देत भिक्षा मागत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.

सविस्तर वाचा

13:13 (IST) 6 Jun 2023
पुणे: परराज्यातील प्रवाशांना लुटणारी टोळी गजाआड

पुणे: कात्रज परिसरात परराज्याातील प्रवाशांना लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दुचाकी आणि कोयता जप्त करण्यात आला.

सविस्तर वाचा...

13:11 (IST) 6 Jun 2023
पुणे: सत्ता कोणासाठी, कशी वापरायची याचा छत्रपती शिवाजी महाराज हे वस्तुपाठ; शरद पवार यांचे गौरवोद्गार

पुणे : या देशात राजे अनेक होऊन गेले. त्यांनी घराण्याच्या नावाने राज्य केले. पण, हिंदवी स्वराज्याची स्थापना करून छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य घडविले. सत्ता कोणासाठी आणि कशी वापरायची याचा छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श वस्तुपाठ आहेत, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मंगळवारी काढले.

सविस्तर वाचा

13:01 (IST) 6 Jun 2023
वर्धा: बेरोजगारांसाठी खुशखबर… ४ हजार ६२५ पदांची भरती, सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा…

वर्धा : राज्य शासनाच्या महसूल विभागाने तब्बल ४ हजार ६२५ पदांची एकाचवेळी भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी छत्तीस जिल्हा केंद्रातून ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे.सरळ सेवा भरती पद्धतीने १७ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरदरम्यान या पदासाठी परीक्षा होणार आहे.

सविस्तर वाचा

13:01 (IST) 6 Jun 2023
डोंबिवली एमआयडीसीतील नाल्यात मातीचा भराव, पावसाळ्यात पुराचा धोका

डोंबिवली- डोंबिवली एमआयडीसी मधील एका नैसर्गिक नाल्यात मातीचा भराव लोटून नाल्याची एक बाजू बांधकामासाठी बंद करण्यात येत असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. गेल्या महिन्यापासून हे काम सुरू असुनही एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना नाल्यातील भराव दिसत नाही का, असे प्रश्न पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.

सविस्तर वाचा

13:00 (IST) 6 Jun 2023
मुंबई: राज्यभरातील ८८ गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी होणार रद्द

मुंबई : विविध कारणांमुळे कधीही पूर्ण न होऊ शकणाऱ्या आणि अव्यव्हार्य अशा राज्यातील ८८ गृहप्रकल्पांची महारेरा नोंदणी आता रद्द होणार आहे. या प्रकल्पांची यादी महारेराने आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

सविस्तर वाचा

13:00 (IST) 6 Jun 2023
मुंबई: व्यापाऱ्याचे ७६ लाख चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक

मुंबई: पायधुनी येथील व्यापाऱ्यांची फसवणूक करून ७६ लाख रूपये चोरणाऱ्या त्रिकुटाला पायधुनी पोलिसांनी अटक केली. इंदरा कुमार उकाराम चैहान (२४), भैरवसिंग जब्बारसिंग जोधा (२६), नरेंद्र सिंग मनोहर सिंग सोलंकी (२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव असून ते भाईंदर, कांदिवलीतील रहिवासी आहेत.

सविस्तर वाचा

12:59 (IST) 6 Jun 2023
वर्धा: देशात सर्वात लहान पण कमाईत अव्वल! जाणून घ्या कुठे आहे हा व्याघ्र प्रकल्प…

वर्धा : देशात सर्वात छोटा म्हणून नोंद असलेला बोर व्याघ्र प्रकल्प उत्पन्नात मात्र अव्वल ठरला आहे. देशात सर्वात छोटा पण विमानतळापासून सर्वात जवळचा म्हणून हा प्रकल्प वैशिष्ट्य राखून आहे.

सविस्तर वाचा

12:59 (IST) 6 Jun 2023
मुंबई: कीटकनाशक विभागातील पदे १५ जूनपर्यंत न भरल्यास कामगारांचा आंदोलनाचा इशारा

किटकनाशक विभागाच्या आस्थापनेवरील वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता, कीटक संकलक, प्रतिवेदन वाहक यांची रिक्त असलेली १२१ पदे पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावीत, याबाबत दि म्युनिसिपल युनियन सातत्याने पाठपुरावा करत आहोत.

सविस्तर वाचा

12:58 (IST) 6 Jun 2023
कल्याण: पर्यावरणदिनानिमित्त आदिवासी भागात मुलांकडून बिजारोपण

कल्याण- पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डोंबिवलीतील शबरी सेवा समितीच्या माध्यमातून आदिवासी, दुर्गम भागातील शाळकरी मुलांनी गाव परिसरातील डोंगर, माळरान, रस्त्यांच्याकडेला विविध झाडांच्या बियांचे रोपण केले.

सविस्तर वाचा

12:54 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today: खोके सरकार लवकरच दरीत पडणार - अमोल मिटकरी

खातेवाटपाचा फॉर्म्युला शिंदे गटातील अस्वस्थ नेत्यांना मान्य नाही - अमोल मिटकरी

https://twitter.com/amolmitkari22/status/1665970494645075968

12:51 (IST) 6 Jun 2023
गडचिरोली : बायकोच्या बदलीसाठी त्याने चक्क पाठवला गृहसचिवांच्या नावे बनावट आदेश; असे फुटले बिंग…

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना ९ मे २०२३ रोजी गृह विभागाच्या कार्यालयाचा पत्ता असलेला ई- मेल प्राप्त झाला होता. यात पोलीस मदत केंद्र धोडराज येथील हवालदार जमीलखान पठाण यांची पोलीस अधीक्षक कार्यालय, नक्षल सेल व पोलीस मदत केंद्र गट्टाजाभिया येथील अंमलदार मीनाक्षी पोरेड्डीवार यांची पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे तात्पुरती बदली केल्याचा उल्लेख होता.

सविस्तर वाचा

12:47 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today:

पर्यटनाची एकही संधी आपलं सरकार सोडणार नाही. त्यासाठी जे जे काही आवश्यक असेल, ते आपण करणार आहोत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सिंधुदुर्गात बोलताना विधान

12:46 (IST) 6 Jun 2023
अमरावती : पायावर थुंकी उडाल्‍याच्‍या कारणावरून तरुणाची हत्या

पायावर थुंकी उडाल्‍याच्‍या कारणावरून उद्भवलेल्या वादात एका तरुणाची हत्या करण्यात आली. ही घटना बडनेरा ठाण्याच्या हद्दीतील मिल चाळ परिसरात सोमवारी घडली. या प्रकरणी आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर वाचा

12:44 (IST) 6 Jun 2023
वर्धा नगरपालिकेला महापालिका करण्यास ग्रामपंचायतींचा कराडून विरोध

वर्धा: वर्धा नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसा प्राथमिक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. याची कुणकुण लागताच समाविष्ट होणाऱ्या २७ ग्रामपंचायतींमध्ये विरोधाचे वातावरण सुरू झाले आहे.

सविस्तर वाचा...

12:44 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today:

बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की नोकरी घेण्यापेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करा. कोकणात आपण योजनांच्या माध्यमातून असे अनेक हात निर्माण करू शकतो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

12:43 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today:

आपल्या सरकारने यापूर्वी कुणी दिला नसेल इतका निधी सिंधुदुर्गात दिला - एकनाथ शिंदे

12:20 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today: विलास लांडे अजूनही शिरूरमधून खासदारकीसाठी इच्छुक?

शरद पवारांनी जर काम करायची संधी दिली, तर काम करायला आवडेल. पण मी विरोध करायचा म्हणून करणार नाही. अमोल कोल्हे चांगले अभिनेते आहेत. ते छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडत आहेत. पण जर मला शरद पवारांनी कुठेही संधी दिली, तरी काम करायची तयारी आहे. त्यांनी संधी नाही दिली तरी काम करायची माझी तयारी आहे - विलास लांडे

12:19 (IST) 6 Jun 2023
नागपूर: युवकाचा विधवा महिलेवर बलात्कार

नागपूर: एका विधवा महिलेशी जवळीक साधून एका युवकाने बलात्कार केला. त्यातून ती पाच महिन्यांची गर्भवती झाली. विधवेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. गोपीचंद साठवणे (गारळा) असे आरोपी युवकाचे नाव आहे.

सविस्तर वाचा...

12:01 (IST) 6 Jun 2023
Maharashtra Live News Today: मंत्रिमंडळाच्या विस्ताराला मुहूर्त नाही - दानवे

मंत्रीमंडळ विस्तार होणार नाही हे मी सांगतोय. विस्ताराला कोणताही मुहुर्त लागणार नाही - अंबादास दानवे

11:55 (IST) 6 Jun 2023
आमच्या मर्जीने बिहारची मुले शिक्षणासाठी महाराष्ट्रात; कथित तस्करी प्रकरणात पालकांचा दावा

मनमाड: बिहारमधून मुलांच्या तस्करीप्रकरणी या मुलांचे पालक मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांचे जाब -जबाब नोंदविले जात आहेत. या मुलांना आम्ही आमच्या मर्जीने शिक्षणासाठी महाराष्ट्रात पाठवले.

सविस्तर वाचा...

11:49 (IST) 6 Jun 2023
जळगाव: वायू प्रदुषणाचा शेतीवर परिणाम; दीपनगर वीज निर्मिती केंद्रासमोर शेतकऱ्यांचे आंदोलन

जळगाव: दीपनगर वीज निर्मिती केंद्रामुळे भुसावळसह परिसरात जल आणि वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्याचा परिणाम शेतीवर होत आहे. त्यात आता भुसावळ तालुक्यात शेती परिसरात भरनियमन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे केळीबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

सविस्तर वाचा...

11:47 (IST) 6 Jun 2023
‘मान्सून’चा मुहूर्त हुकला! आगमनाबाबत साशंकता; प्रवेश लांबणीवर!

राज्यात नऊ जूनला मान्सूनचा प्रवेश होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, आता मान्सूनच्या आगमनाबाबत कोणतीही घोषणा हवामान खात्याने केली नाही. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाचा मुहूर्त हुकल्याच्या चर्चेला वेग आला आहे. भारतीय हवामान खात्याने केरळमध्ये देखील मान्सून दाखल होण्याच्या अंदाज सोमवारी दिला नाही.

सविस्तर वाचा

11:34 (IST) 6 Jun 2023
गोदाकाठी स्वच्छता मोहीम; प्लास्टिक संकलन, तपोवनात ३०० किलो कचरा जमा

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून तपोवन परिसरातील गोदावरी नदीच्या काठावर विशेष स्वच्छता आणि प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात आली. त्या अंतर्गत पर्यटकांनी फेकलेल्या प्लास्टिक बाटल्या व इतर प्लास्टिक कचरा तसेच नदीपात्रात वाहून आलेला व साठून राहिलेला कचरा संकलित करण्यात आला.

सविस्तर वाचा

11:33 (IST) 6 Jun 2023
जळगाव जिल्ह्यात ३० पेक्षा अधिक मंदिरांत आता वस्त्रसंहिता, पुढील आठवड्यापासून अंमलबजावणी

मंदिरांचे पावित्र्य, मांगल्य, शिष्टाचार, संस्कृती जपण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील अनेक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असून, यावल तालुक्यातील मनुदेवी मंदिर, पारोळा येथील बालाजी मंदिरांसह ३० हून अधिक मंदिरांत पुढील आठवड्यात ती लागू होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी दिली.

सविस्तर वाचा

11:21 (IST) 6 Jun 2023
Apple WWDC 2023 : अ‍ॅपलने Mixed Reality हेडसेट, iOS 17 सह लॉन्च केले ‘हे’ जबरदस्त प्रॉडक्ट्स

Apple वर्षातील सर्वात मोठा इव्हेंट Apple WWDC 2023 पार पडला. या इव्हेंटमध्ये कंपनीने आपली अनेक प्रॉडक्ट्स लॉन्च केली आहेत. इव्हेंटची सुरूवात सीईओ टीम कूक यांनी केली. Apple एअरपॉड्समध्ये वापरकर्त्यांना अ‍ॅडॉप्टिव्ह मोड मिळणार आहे. यामध्ये आजूबाजूच्या वातावरणानुसार व्हॉइस कॅन्सल लेव्हल सेट करणार आहे. जाणून घ्या सगळे अपडेट्स. वाचा सविस्तर बातमी

Maharashtra Live Blog

महाराष्ट् न्यूज

Maharashtra News Today: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर