Marathi News Today: धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची धुळवड पाहायला मिळत आहे. लोकसभा निवडणुकांवरून राज्यात महायुती व महाविकास आघाडी यांच्यातील अंतिम जागावाटप अद्याप स्पष्ट झालेलं नसताना शीर्षस्थ नेतृत्वाकडून महाराष्ट्रातील काही जागांवर उमेदवारांची नावं जाहीर केली जात आहेत. त्यामुळे नेमकं महायुती व महाविकास आघाडीचं ठरलंय काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

devendra Fadnavis uddhav thackeray (1)
“उद्धव ठाकरे म्हणाले, मी यू टर्न घेतोय, शिवसैनिकांसमोर आमची अब्रू…”, फडणवीसांनी सांगितला ‘मातोश्री’वरील घटनाक्रम
Lok sabha Election 2024 Narendra Modi Raj Thackeray Sabha
Maharashtra News : शिवतीर्थवरून नरेंद्र मोदींचं शरद पवारांना सावरकरांच्या मुद्द्यावरून आव्हान; म्हणाले “राहुल गांधींकडून…”
manoj jarange Dhananjay Munde Pankaja Munde
“गुंडगिरी सहन करणार नाही”, मनोज जरांगेंचा धनंजय आणि पंकजा मुंडेंना इशारा; म्हणाले, “तुम्हाला महाराष्ट्रात…”
Raj Thackeray
राज ठाकरेंचं पुन्हा ‘लाव रे तो व्हिडीओ’, सुषमा अंधारेंची क्लिप दाखवत उद्धव ठाकरेंवर टीका
Suhas kande on Chhagan Bhujbal Lok sabha Election 2024
‘छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार’, शिंदे गटाच्या आमदाराकडून गंभीर आरोप, राजीनाम्याची केली मागणी
Ajit Pawar Could Have been CM of Maharashtra If Lakshmi Darshan Was Done Rohit Pawar Blames
“अजितदादा त्यावेळी लक्ष्मी दर्शन घडवलं असतं..”, रोहित पवारांनी काकांना सुनावलं; म्हणाले, “तुम्ही राष्ट्रवादीची एकहाती.. “
Raj Thackeray Daily Schedule
राज ठाकरे सकाळी किती वाजता उठतात? दुपारी उठण्याच्या टीकेवर उत्तर; म्हणाले, “मी रोज… “
Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra Politics News
Maharashtra News : “यंदाची निवडणूक शेवटची ठरू नये”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, “ज्यांच्या हाती…”
Live Updates

Maharashtra News Live Updates 25 March 2024: महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोपांची राजकीय धुळवड!

20:29 (IST) 25 Mar 2024
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे-मिरज दरम्यान अनेक गाड्या रद्द

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून लोहमार्ग दुहेरीकरण आणि इतर अभियांत्रिकी कामासाठी पुणे ते सातारा मार्गावर जरंडेश्वर ते सातारा या स्थानकांदरम्यान २९ मार्चला ब्लॉक घेण्यात येणार आहे.

सविस्तर वाचा...

20:16 (IST) 25 Mar 2024
शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांची खेळी! उद्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये प्रवेश

पुणे : शिवसेनेचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मंगळवारी (२६ मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आढळराव राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील, यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

सविस्तर वाचा...

19:11 (IST) 25 Mar 2024
नागपूर : गुन्हेगारांकडे आढळळे ५ पिस्तूल आणि ९ काडतूस, विशेष मोहिमेत पोलिसांची कारवाई

नागपूर : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर पोलीस आयुक्तांनी आठवडाभर विशेष मोहिम राबवून भारतीय शस्त्र अधिनियम कायद्याअंतर्गत ४६ शस्त्र जप्त केली. यामध्ये ५ पिस्तूल आणि ९ जिवंत काडतुसाचा समावेश आहे.

सविस्तर वाचा...

18:46 (IST) 25 Mar 2024
पुण्यात घरांची खरेदी जोरात! जाणून घ्या पुणेकरांची पसंती कशाला…

पुणे : पुणे जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात १७ हजार ५७० घरांच्या खरेदीचे व्यवहार झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात २३ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. या व्यवहारातून सरकारला ६२० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले असून, त्यातही गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के वाढ झाली आहे.

सविस्तर वाचा...

18:30 (IST) 25 Mar 2024
गैरप्रकार केलेल्या वीस शाळांची सीबीएसईकडून संलग्नता रद्द; राज्यातील दोन शाळांचा समावेश

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) राज्यातील दोन शाळांसह देशभरातील वीस शाळांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गैरप्रकारांसंदर्भात केलेल्या पडताळणीनंतर सीबीएसईने कारवाईचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा...

18:01 (IST) 25 Mar 2024
चेंबूरमध्ये घराची भिंत कोसळून महिला जखमी

मुंबई: चेंबूर कॉलनी येथे सोमवारी सकाळी एका घराची भिंत कोसळून महिला गंभीर जखमी झाली. सध्या या महिलेवर गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू असून चेंबूर पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

सविस्तर वाचा...

18:00 (IST) 25 Mar 2024
पिंपरी : आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे आणि घोषणाबाजी… परखड चर्चेमुळे चिंचवडला रंगला मावळचा रणसंग्राम

पिंपरी : बारामती लोकसभेत विजय शिवतारे यांनी घेतलेल्या भूमिकेचे मावळ लोकसभेत उमटलेले पडसाद, राष्ट्रवादी आणि भाजपने मावळ मतदारसंघावर केलेला दावा, विकासाचे दावे-प्रतिदावे, आरोप-प्रत्यारोप, गुगली प्रश्नांना दिलेली सफाईदार उत्तरे आणि एकूणातच खुसखुशीत व परखड चर्चेमुळे मावळ लोकसभेचा रणसंग्राम चांगलाच रंगला.

सविस्तर वाचा...

17:54 (IST) 25 Mar 2024
Maharashtra News Live Updates: राज ठाकरेंबाबतच्या प्रस्तावाच्या चर्चेवर शहाजीबापू पाटील म्हणाले...

राज ठाकरेंकडे शिंदे गटाच्या शिवसेनेची सूत्रं सोपवली जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यासंदर्भात राज ठाकरेंकडे प्रस्तावही ठेवण्यात आल्याचं बोललं जात आहे. याबाबत शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी याला विरोध असल्याचं सांगितलं आहे. “आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेच राहायला हवेत. त्यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. असं काही असेल तर आम्ही त्याला स्पष्ट नकार देऊ”, असं ते म्हणाले आहेत.

17:39 (IST) 25 Mar 2024
पुणे : ‘रिंगरोडचे भूसंपादन करताना तक्रारी आल्यास…’ जिल्हाधिकाऱ्यांची तंबी

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) प्रस्तावित वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात तब्बल दहा हजार ५१९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी भूसंपादनासाठी देण्यात आला असल्याने पूर्व मार्गाच्या भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सविस्तर वाचा...

17:04 (IST) 25 Mar 2024
राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, पुणे वर्तुळाकार रस्ता आणि नांदेड-जालना द्रुतगती महामार्ग अशा तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या आर्थिक निविदा उघडण्यास काहीसा विलंब होणार आहे.

सविस्तर वाचा...

17:02 (IST) 25 Mar 2024
साहेब, जागा वाचवा… – नाशिकच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

नाशिक – भाजप, राष्ट्रवादीचे दावे आणि आरोप-प्रत्यारोपांमुळे वादात सापडलेल्या नाशिक लोकसभेच्या जागेवर शक्य तितक्या लवकर आपला उमेदवार जाहीर करावा, यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाणे येथे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या देत शक्ती प्रदर्शन केले.

सविस्तर वाचा...

16:24 (IST) 25 Mar 2024
नवी मुंबई : ५२ लाख १३ हजारांची फसवणूक…… कमी वेळात जास्त परताव्याचे आमिष पडले महागात

नवी मुंबई : सट्टा बाजारात गुंतवणूक आमच्या मार्गदर्शनाखाली करा आणि भरघोस परतावा आणि तेही कमी वेळात अशा आशयाच्या जाहिरातीला बळी पडून एका व्यक्तीने तब्बल ५२ लाख १३ हजार ४३३ रुपये गमावले आहेत.

सविस्तर वाचा...

16:07 (IST) 25 Mar 2024
वीज चोरी करणाऱ्या 24 वीज ग्राहकांवर कारवाई

पनवेल : पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागातील विविध गावांमध्ये वीज मीटरची तपासणी करुन विजचोरी करणाऱ्या २४ वीज ग्राहकांविरोधात वीज महावितरण कंपनीने वीज चोरी केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

मागील अनेक दिवस आर्थिव वर्षाच्या शेवटी महावितरण कंपनीच्यावतीने वीज चोरी करणाऱ्यांविरोधात अशी कारवाई केली जाते. महावितरण कंपनीने तालुक्यातील खेरणे, चिंध्रण, वावंजे,शिरवली, आंबे, कोलवाडी आणि मोहोदर या गावांमध्ये केली आहे. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमध्ये ३१ हजार ५२५ युनीटची विजचोरी पकडल्याचा दावा केला आहे.

16:02 (IST) 25 Mar 2024
राज्यात तापमानवाढीचा इशारा, उष्णतेच्या झळा आणखी तीव्र होणार

नागपूर : राज्याच्या बहुतांश भागात उष्णतेच्या झळा तीव्र होत आहेत. कोरड्या हवामानामुळे त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसाने राज्यात विश्रांती घेतली आहे. साधारणपणे होळीनंतर तापमानात वाढ होण्यास सुरुवात होते.

सविस्तर वाचा...

15:42 (IST) 25 Mar 2024
काँग्रेसच्या ‘राजीनामावीरां’नी गाठले नागपूर! प्रांताध्यक्षसोबत चर्चा ; पटोले म्हणाले, गडबड करू नका…

बुलढाणा: बुलढाणा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यात यावा या मागणीसाठी पदाचे राजीनामे देणाऱ्या काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी नागपूर गाठले! प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या समवेत सविस्तर चर्चा केली.

सविस्तर वाचा...

15:23 (IST) 25 Mar 2024
अहमदनगर : पत्नी, दोन लहान मुलींना कोंडून घर पेटवले; तिघींचा होरपळून मृत्यू

नगरः पत्नी व दोन लहान मुलींना घरात कोंडून नंतर घर पेटवून देऊन, तिघींना जिवंत जाळण्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे आज, सोमवारी सकाळी घडली. पिंपळगाव लांडगा गाव नगर-पाथर्डी रस्त्यावर १५ किमी अंतरावर आहे.

सविस्तर वाचा..

15:18 (IST) 25 Mar 2024
अनाथ मुले व तृतियपंथींसोबत पोलीसांची अनोखी रंगपंचमी

पनवेल : नवी मुंबई पोलिस दलातील खांदेश्वर पोलीसांनी यंदा सामाजिक संदेश देत अनाथ आश्रमातील मुले आणि तृतीयपंथी यांच्यासोबत नैसर्गिक रंग लावून रंगपंचमी साजरी केली. खांदेश्वर वसाहतीमधील बाल ग्राम आश्रमातील मुलांसोबत आणि नवी मुंबई शहरातील तृतीयपंथी यांच्या सोबत रंगपंचमीच्या रंगांची उधळण करत रंगपंचमी साजरी केली.

सविस्तर वाचा...

14:44 (IST) 25 Mar 2024
मोदी सरकार अन् कमळाचे चिन्ह यांची विना परवाना जाहीरात करणाऱ्यांविरोधात कामोठेत गुन्हा दाखल

पनवेल : लोकसभा निवडणूकीमुळे राज्यात सर्वत्र आचारसंहिता लागू आहे. विना परवानगी कोणत्याही राजकीय पक्षांनी जाहिराती करु नये असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाचे असताना सुद्धा कामोठे येथे राजकीय संदेश देणाऱ्या भिंती रंगविण्यात आल्या होत्या. नागरिकांनी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या अ‍ॅपवर केलेल्या तक्रारीनंतर ही बाब रविवारी उजेडात आली.

सविस्तर वाचा...

14:29 (IST) 25 Mar 2024
देवेंद्र फडणवीसांच्या अखत्यारीत येणाऱ्या महावितरणविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार, जाणून घ्या कारण…

नागपूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जा खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या महावितरण कंपनीने आचारसंहिता लागू झाल्यानंतर राज्यातील अंदाजे २.७५ कोटीहून अधिक वीज ग्राहकांना आचारसंहिता भंग करणारी वीजबिले वितरीत करण्यास सुरुवात केली आहे.

वाचा सविस्तर...

14:17 (IST) 25 Mar 2024
यवतमाळ : माहिती अधिकारातून खोटारडेपणा उघड! जल आयोगाच्या मान्यतेशिवाय निम्न पैनगंगा प्रकल्पासाठी…

यवतमाळ : प्रकल्पाचा अद्ययावत अहवाल सादर करून केंद्रीय जल आयोगाची अंतिम मान्यता घेण्यापूर्वीच निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या कामासाठी कार्यारंभ आदेश काढल्याची गंभीर बाब, माहिती अधिकारातून पुढे आली आहे. पैनगंगा प्रकल्पाच्या नव्यानेच काढलेल्या टिपणीतून हे स्पष्ट झाले. या संदर्भात नऊ आक्षेपांची तक्रार विभागीय आयुक्तांकडे करून तातडीच्या सुनावणीची मागणी करण्यात आली आहे.

वाचा सविस्तर...

13:35 (IST) 25 Mar 2024
बुलढाणा : होळीवरून लहान मुलांचा वाद अन ‘पेटले’ वडीलधारी! लाठ्याकाठ्यांनी दोन गटात…

बुलढाणा : मेहकर तालुक्यातील विठ्ठलवाडी या गावात होळीचा वाद वाढत जाऊन तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटांनी लाठ्याकाठ्यांनी एकमेकांवर हल्ले केल्याने किमान १७ गावकरी जखमी झाले. यापैकी ५ गंभीर जखमींना बुलढाण्यात हलविण्यात आले आहे. गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

वाचा सविस्तर...

13:30 (IST) 25 Mar 2024
शाहू महाराजांनी घेतली काडसिद्धेश्वर स्वामींची भेट; स्वामीनी दिल्या विजयाच्या शुभेच्छा

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांनी कणेरी मठाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी मठाचे अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांची भेट घेतली.

सविस्तर वाचा...

13:11 (IST) 25 Mar 2024
Maharashtra News Live Updates: राज ठाकरेंबाबतच्या प्रस्तावावर शहाजीबापू पाटील म्हणाले...

राज ठाकरेंकडे शिंदे गटाच्या शिवसेनेची सूत्रं सोपवली जाणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यासंदर्भात राज ठाकरेंकडे प्रस्तावही ठेवण्यात आल्याचं बोललं जात आहे. याबाबत शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी याला विरोध असल्याचं सांगितलं आहे. "आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेच राहायला हवेत. त्यासाठी आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. असं काही असेल तर आम्ही त्याला स्पष्ट नकार देऊ", असं ते म्हणाले आहेत.

13:02 (IST) 25 Mar 2024
तुतारीवाल्यांची झाली पंचाईत!

छत्रपती संभाजीनगर : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेसह सर्व राजकीय पक्षांच्या व्यासपीठावर वाजणारी तुतारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक चिन्ह झाले आणि प्रचारात तुतारी वाजविणाऱ्यांची पंचाईत झाली. अगदी कोणाच्याही व्यासपीठावर जाऊन प्रत्येकी दीड ते दोन हजार रुपये मिळणाऱ्या तुतारीवाल्यांना आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीशिवाय कोणी आधार राहिलेला नाही.

वाचा सविस्तर...

12:42 (IST) 25 Mar 2024
“संघर्ष केल्याशिवाय मोठे होता येत नाही…” काय म्हणाल्या प्रतीभा धानोरकर

नागपूर: चंद्रपूरची निवडणूक सोपी नाही, संघर्ष केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही, असे मत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केले. त्या नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होत्या.

वाचा सविस्तर...

12:39 (IST) 25 Mar 2024
जालन्यातील मतदारयाद्यांमध्ये तरुण-तरुणींमध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत

जालना : लोकसभा निवडणुकीसाठी १ जानेवारी २०२४ च्या अर्हता दिनांकाच्या आधारावर जालना जिल्ह्यातील १८ आणि १९ वर्षे वयोगटातील मतदारांत स्त्री-पुरुष संख्येत फार मोठी तफावत समोर आली आहे. या तरुण वयाच्या गटात पुरुष मतदारांचे प्रमाण ६४.७५ टक्के आहे. परंतु त्या तुलनेत स्त्री मतदारांचे प्रमाण ३५.२५ टक्के एवढे कमी आहे

वाचा सविस्तर...

12:33 (IST) 25 Mar 2024
मोदींनी कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य जनता यांची फसवणूक - आमदार सतेज पाटील

कोल्हापूर : कामगारासह देशभरातील कोणताही घटक मोदी सरकारच्या कारभारावर समाधानी नाही. एकाधिकारपणा आणि हुकूमशाही मोडून कामगार आणि सर्वसामान्यांचं राज्य आणायचे असेल तर, हिच संधी आहे. मोदी विरोधातील ही लढाई संघटीत होवून लढूया, असे आवाहन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी ते बोलत होते.

इंडीया आघाडीमधील घटक पक्षातील कामगार श्रमिक संघटनांची बैठक कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये झाली. आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या विविध पक्षातील कामगार श्रमिक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. यावेळी बोलतांना आमदार सतेज पाटील यांनी, 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये मोदींनी मोठी आश्वासने दिली. मात्र कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य जनता यांची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला.

11:43 (IST) 25 Mar 2024
मोहिते-पाटलांचे संभाव्य बंड फसले?

सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना पुनःश्च उमेदवारी दिल्यामुळे प्रचंड नाराज झालेले धैर्यशील मोहिते-पाटील यांनी निंबाळकर यांची उमेदवारी बदलण्यासाठी संपूर्ण मतदारसंघात गावभेटीच्या नावाखाली दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला होता. पण अचानक त्यांची गावभेट थांबली आहे. यातून मोहिते-पाटील टोकाची भूमिका घेणार नाहीत हे जवळपास स्पष्ट झाले आहे.

वाचा सविस्तर...

11:42 (IST) 25 Mar 2024
शिरुरमध्ये अमोल कोल्हे – आढळराव पाटील यांच्यात पुन्हा लढत

पिंपरी : पुणे ग्रामीण, शहर आणि पिंपरी-चिंचवडचा समावेश असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित असून त्यांनी प्रचाराचा प्रारंभ केला आहे. तर, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत मंगळवारी प्रवेश करणार असून महायुतीत राष्ट्रवादीकडून ते लढणार आहेत.

वाचा सविस्तर...

11:42 (IST) 25 Mar 2024
‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत डाव्यांचा दबदबा कायम, ३० वर्षांनंतर दलित अध्यक्ष

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेच्या (जेएनयू स्टुडंट युनियन) चार वर्षानंतर झालेल्या निवडणुकीत डाव्या विद्यार्थी संघटनांच्या संयुक्त आघाडीने संघ-भाजपशी सलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पराभव करत दबदबा कायम राखला. डाव्या विद्यार्थी संघटनांच्या विजयानंतर रविवारी रात्री ‘जेएनयू’मध्ये जल्लोषाचे वातावरण होते. ‘जय भीम’, ‘लाल सलाम’च्या घोषणांनी विद्यापीठ दणाणून गेले होते.

वाचा सविस्तर...

11:41 (IST) 25 Mar 2024
डॉक्टरची एक कोटींची फसवणूक! परदेशातील कुरिअरमध्ये अमली पदार्थ सापडल्याची बतावणी

पुणे : पोलिसी कारवाईची भिती दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. परदेशातून पाठविलेल्या कुरिअरच्या पाकिटात अमली पदार्थ, परदेशी चलन सापडल्याची बतावणी करुन नागरिकांकडून पैसे उकळले जात आहेत. बाणेर भागातील एका डॉक्टरची सायबर चोरट्यांनी एक कोटी एक लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला.

वाचा सविस्तर...

11:22 (IST) 25 Mar 2024
Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीतील दोन पक्षांची बैठक

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील जागावाटपावर चर्चा करण्यासाठी आज ठाकरे गट व शरद पवार गटाची महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. आजच्या बैठकीत महाविकास आघाडीतील जागावाटपाबाबत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, काही जागांवर असणाऱ्या तिढ्यावरही तोडगा काढला जाण्याची शक्यता आहे.

Mumbai Maharashtra News Live in Marathi

महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज लाइव्ह टुडे

Maharashtra News Live Updates 25 March 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर!