Maharashtra Breaking News Live Update: लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच सत्ताधारी व विरोधी पक्षांकडून एकमेकांवर परखड शब्दांत टीका-टिप्पणी केली जात आहे. त्यातच जागावाटप व त्यानिमित्ताने दोन्ही बाजूंना निर्माण होणाऱ्या नाराजीवर सर्वपक्षीय चर्चा-बैठकांमधून तोडगा काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
Maharashtra Live News Updates 15 April 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर!
राजकारणात गुप्त तडजोडी, करार, सहमती होणे स्वाभाविक आहे. मात्र, बुलढाण्यात आज वेगळंच घडलं.
जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी शहरात सोमवारी दुपारी एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे चार चिमुकल्यांसह नऊ जण गंभीर जखमी झाले.
‘रेडिओ कॉलर’ गळून पडल्याने वाघिणीचे लोकेशन एकाच जागी दाखवित होते. वनविभागाने पाहणी केली असता, ‘कॉलर’ दिसून आले.
पुणे : कोथरुड भागात आयपीएल क्रिकेट सामन्यावर सट्टा घेणाऱ्या सट्टेबाजांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पकडले. उजवी भुसारी कॉलनी परिससरातील एका इमारतीत ही कारवाई करण्यात आली. सट्टेबाजांकडून मोबाइल संच, लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.
वसतिगृहाचे चारही मजले मागील १० दिवसांपासून अंधारात आहेत.
प्रशासन व सुरक्षा व्यवस्थेने पुढील हालचाली सुरू करण्यापूर्वी सभास्थळावरील मोदींचे भाषण होणाऱ्या व्यासपिठाच्या जागेचे पूजन करण्याचे निश्चित झाले.
सांगली : जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपचा राजीनामा देत लोकसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांचा प्रचार ताकदीने करण्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत सोमवारी जाहीर केला.
कोपरखैरणे पोलीस पथकाने पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले व गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारी पुनः तपासणे सुरू केले.
अलिबाग : नावात काय आहे असे म्हणतात. पण निवडणुकीच्या राजकारणात मतपत्रिकेवरील नावेच महत्वपुर्ण ठरतात. कारण चर्चेतल्या नावांचे भांडवल करून निवडणुका लढल्या जातात. रायगडकरांना सध्या याचाच प्रत्यय येतोय. अनंत गीते नावाचे तीन उमेदवार रायगड मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
जिल्ह्यातील मुरबाड शहरात सर्वाधिक ४३.२ तर बदलापूर शहरात सर्वाधिक ४२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नव्या इमारतीत सोमवारी वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे दिवसभर वकिलांना आणि पक्षकारांना नाहक त्रास सहन करावा लागला.
पुणे : बारामतील तालुक्यातील लाटे गावात एका ज्येष्ठ शेतकऱ्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी प्रसारित केलेल्या चित्रफितीत पाटबंधारे, महावितरण विभाग, तसेच पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे म्हटले.
हाच काय काँग्रेसचा सामाजिक न्याय व हीच का भाजपची सामाजिक समरसता, असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल रहमान यांनी येथे उपस्थित केला.
कराड : माढा मतदारसंघात मोहिते-पाटील कुटुंबापाठोपाठ फलटणच्या रामराजे निंबाळकर गटानेही भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकरांच्या विरोधात उघड पवित्रा घेतल्याने भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहिल्याचे स्पष्ट झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘अब की बार गोळीबार सरकार’ असा टोला राज्यातील भाजप सरकारला लगावला होता.
वसई: कुठल्याही निवडणुकीत वसईतील ख्रिस्ती मते निर्णायक ठरत असतात. त्यामुळे या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा सर्वच पक्षांचा प्रयत्न असतो. पालघर लोकसभात मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांनी रविवारी वसईच्या पश्चिमेच्या ख्रिस्ती बहुल भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी आवार्जू चर्चमध्ये भेटी देत ख्रिस्ती मतदारांना साद घातली आहे.
पुणे : यंदा एक जून ते ३० सप्टेंबर, या चार महिन्यांत देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्यूंजय महापात्रा म्हणाले, जगभरातील स्थिती मोसमी पावसाला पोषक आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के मोसमी पावसाचा अंदाज आहे.
अमित शाहांना मला सांगायचंय की तुमच्या पुत्रप्रेमामुळे भारत अंतिम सामना हरलेला आहे. तुमच्यासारखं पुत्रप्रेम मी दाखवलेलं नाही. अमित शाह जेव्हा काही गोष्टी बोलतात, तेव्हा त्यांच्या चेलेचपाट्यांमध्ये एकवाक्यता असायला हवी हे त्यांनी पाहायला हवं. कारण काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो. त्यामुळे तुमची लाज तुमचे चेलेचपाटे काढत आहेत - उद्धव ठाकरे</p>
शिवसेना पुत्रप्रेमामुळे तर राष्ट्रवादी पुत्रीप्रेमामुळे फुटली - अशी टीका अमित शाह यांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ठाणे / कल्याण : ठाणे आणि कल्याण शहरामध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रात बिघाड झाल्याने ३ ते ४ दिवस अशुद्ध पाण्याचा पुरवठा होणार असल्याचे संदेश गृहसंकुलाच्या व्हाॅट्सॲप समुहात प्रसारित होत आहेत. परंतु जलशुद्धीकरण केंद्रात कोणताही बिघाड झालेला नसल्यामुळे ही केवळ अफवा असल्याचे ठाणे आणि कल्याण पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. यामुळे अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे चिंतेत पडलेल्या नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.
दोनशे रुपये दिले नाही म्हणून पतीने पत्नीची कुऱ्हाडीने हत्या केली होती. याप्रकरणी आरोपी पतीला सत्र न्यायालयाने मे २००७ मध्ये जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
ठाणे : काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे. डाॅक्टर म्हणून माझा सल्ला आहे की, त्यांनी लवकरात लवकर त्यांनी चांगला डॉक्टर बघावा आणि बिघडलेले मानसिक संतुलन ठीक करावे. त्यांच्या उपचाराचा खर्च आम्ही आमच्या वैद्यकीय कक्षातून करू असा टोला खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील २५ लाख मतदार माझे नातेवाईक आहेत. ही देशाची निवडणूक असून नात्यागोत्यावर, भावनिक मुद्यावर होणार नसल्याचे सांगतानाच समोरच्या उमेदवाराचे किती आव्हान असेल यावर बोलताना समोर कोण उमेदवार आहे माहिती नाही, असे म्हणत महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांचे कोणतेही आव्हान नसल्याचे सांगितले.
चालकाने ट्रकमधून सहा कोटी रुपयांच्या मालाची चोरी केल्याची तक्रार ट्रक मालकाने केली. याप्रकरणी पोलिसांनी चालकावर गुन्हा नोंदविला आणि प्रकरण न्यायालयात गेले.
हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे म्हणले जात असले तरी त्याचा सर्वांत मोठा परिणाम हा हिंदू समाजावर होणार आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड हे एकीकडे उमेदवारी अर्ज भरत असताना दुसरीकडे या पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी जिल्हाध्यक्षपदासह पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे पक्षाला धक्का बसला आहे.
कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने इंडिया आघाडीसमाेर कामगारांचा १५ कलमी करारनामा ठेवला आहे.
उपनगर पोलीस ठाण्याबाहेर बेकायदेशीररित्या जमा झालेल्या हजारोंच्या जमावाकडून पाकिस्तान झिंदाबाद यासारख्या देशविरोधी घोषणा दिल्या गेल्याची तक्रार भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केली आहे.
काँग्रेसचे तथाकथिक हायकमांड इतके सुस्त झाले आहेत की शिवसेनेमुळे पीडित मुंबई काँग्रेसचे नेते जेव्हा दिल्लीला त्यांची व्यथा मांडण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना उलट्या पावली माघारी पाठवण्यात आलं. लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच ३०० हून कमी जागांवर निवडणूक लढवणारी काँग्रेस जर त्यांच्या स्वत:च्या नेत्यांना न्याय देऊ शकत नाही, तर जनतेला काय न्याय मिळवून देणार? इंडिया आघाडी वास्तवात कसं काम करतंय याचा अंदाज सहज लागेल - संजय निरुपम
https://twitter.com/sanjaynirupam/status/1779792676403220864
कोल्हापूर : कडक उन्हाचा मारा असतानाही सोमवारी संजय मंडलिक व धैर्यशील माने या दोन्ही उमेदवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापुरात उमेदवारी अर्ज दाखल केला. या निमित्ताने महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपल्या ताकतीची चुणूक दाखवली.
Maharashtra Live News Updates 15 April 2024: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर!