Maharashtra News Updates, 28 September 2022 : मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय तपास यंत्रणेनं ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेविरुद्ध मोठी कारवाई केली. गेल्या आठवड्यात ‘एनआयए’ने महाराष्ट्रासह देशात १५ ठिकाणी छापेमारी करत सुमारे १०६ ‘पीएफआय’ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मंगळवारी केलेल्या कारवाई एनआयएने आणखी १७० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईनंतर केंद्र सरकारने मोठं पाऊल उचचलं असून ‘पीएफआय’ संघटनेवर बंदी घातली आहे.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासोबतच केंद्र सरकारने रिहॅब इंडिया फाऊंडेशन, कॅम्पस फ्रण्ट ऑफ इंडिया, ऑल इंडिया इमाम्स काऊन्सिल, नॅशनल कॉनफ्रडेशन ऑफ ह्युमन राइट ऑर्गनायझेशन, नॅशनल वुमन्स फ्रण्ट, ज्युनियर फ्रण्ट, एम्पॉवर इंडिया फाऊंडेशन अँड रिहॅब फाऊंडेशन केरळ या संस्थांवरही बेकायदेशीर संस्था म्हणून बंदी घातली आहे.

jalgaon politics marathi news, bjp mla mangesh chavan marathi news
जळगावमध्ये भाजप-शिंदे गटात कुरघोड्या सुरूच
Mahesh Gaikwad
Maharashtra News : उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील जखमी महेश गायकवाड यांना डिस्चार्ज
What is the exact population of the Maratha community
मराठ्यांची लोकसंख्या नेमकी किती? वेगवेगळ्या आयोगाचे आकडे..
supreme court sukanta mujumdar latest news marathi
भाजपा खासदाराला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; लोकसभा विशेषाधिकार समितीच्या आदेशांना स्थगिती, नेमकं प्रकरण काय?

दुसरीकडे, भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात तर्क-वितर्क लावले जात आहेत. विरोधी पक्षातील नेत्यांसह भाजपाच्या नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया दिली जात आहे.

या घडामोडींसह राज्य, देश तसेच जगभरातील सर्व घडामोडींचा आढावा एका क्लिकवर

Live Updates

Maharashtra Breaking News Updates, 28 September 2022 : राज्यातील राजकारण, पाऊस अशा सर्वच घडामोडींचा एकाच ठिकाणी वेगवान आढावा.

19:31 (IST) 28 Sep 2022
इचलकरंजीच्या दूधगंगा पाणी योजनेचा राजकीय प्रवाह सुरूच; कागल आंदोलनाच्या नेतृत्वात बदल लक्षवेधी

नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत झाले तरी इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न आणि त्याच्या राजकीय प्रवाहाचा वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. कागल तालुक्यातील दूधगंगा नदीतून पाणी आणण्याच्या योजनेला अधिकृतपणे हिरवा कंदील दिलेला असला तरी इचलकरंजीतील लोकप्रतिनिधींकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही. दुसरीकडे कागल तालुक्यात विरोधाच्या राजकीय लाटा पुन्हा उसळल्या. सविस्तर वाचा…

18:39 (IST) 28 Sep 2022
आदिती तटकरे व तटकरे कुटुंबासह रायगडमधील सर्व पक्षीय नेत्यांचा राजकीय दांडिया 

देशभरात नवरात्रोत्सवाची धामधूम सध्या सुरु आहे. यानिमित्ताने ठिकठिकाणी दांडिया गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. करोना निर्बंध मुक्तीनंतर पहिल्यांदाच निर्बंधमुक्त परिस्थितीत साजरा होणाऱ्या या नवरात्रोत्सवावर यंदा राजकारणाचाही साज चढतांना दिसतो आहे. एरवी राजकारणाच्या मैदानावर आपले कसब दाखवणारे राजकारणी या निमित्ताने गरब्यावर ठेका धरतांना पहायला मिळत आहेत.

सविस्तर वाचा…

18:19 (IST) 28 Sep 2022
दांडिया खेळू देत नाही म्हणून हातोडा डोक्यात घालून हत्या ; आरोपीला अटक ; रबाळे एमआयडीसी भागातील घटना

दांडीया खेळण्यास मज्जाव केल्याचा राग मनात ठेवत त्याच रात्री त्या युवकाने हातोड्याने डोक्यावर, अंगावर घाव घातले. यात तीन जण जखमी असून त्यातील एकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे. यातील आरोपीचे नाव जितेंद्र बाबूलाल पटवा  असे आहे. तर आकाश जैस्वाल असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. सविस्तर वाचा…

18:03 (IST) 28 Sep 2022
ठाणे महापालिका मुख्यालयातून शिंदे सेनेची दसरा मेळाव्याची तयारी – माजी नगरसेवकांची पालिकेत पार पडली बैठक

शिवसेनेच्या ठाण्यातील गेल्या तीन दशकातील सत्तेचा केंद्र बिंदू राहिलेल्या पाचपाखडी येथील महापालिका मुख्यालयात बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थक नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी ठाण्यातून मोठी गर्दी जमाविण्याचे लक्ष्य यावेळी उपस्थितांना ठरवून देण्यात आले. सविस्तर वाचा…

18:01 (IST) 28 Sep 2022
`पीएफआय’ हे `सिमीʼचेच प्रतिरूप? बंदीबाबत महाराष्ट्र एटीएसही आग्रही होते!

‘पॅाप्युलर फ्रंट ॲाफ इंडिया’ ही संघटना ‘स्टुडन्ट्स इस्लामिक मुव्हमेंट ॲाफ इंडिया’ची (सिमी) प्रतिरूप असल्याचे दहशतवादविरोधी विभागाच्या तत्कालीन उच्चपदस्थ अधिकाऱ्याने (जे सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेत आहेत) सांगितले होते. त्यावेळेस तसा अहवालही केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविण्यात आला होता. तेव्हापासून `पीएफआयʼच्या कारवायांवर राज्याच्या दहशतवादविरोधी पथकासह गुप्तचर यंत्रणेकडूनही पाळत ठेवण्यात आली. त्यातूनच अलीकडे झालेल्या मोठ्या कारवाईनंतर बंदीचा निर्णय घेतल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा...

17:59 (IST) 28 Sep 2022
पुण्यातील कल्याणीनगर मेट्रो स्थानकाच्या कामानिमित्त आजपासून वाहतूकीत बदल

पुणे : मेट्रोकडून कल्याणीनगर स्थानकाचे काम सुरू करण्यात आले असून गुरुवारपासून (२९ सप्टेंबर) या भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. या भागातील वाहतूक व्यवस्थेतील बदल २७ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहेत. शिवाजीनगर न्यायालय ते नगर रस्त्यावरील रामवाडी दरम्यान मार्गिकेचे काम सुरू आहे. बातमी वाचा सविस्तर ...

17:14 (IST) 28 Sep 2022
वसई : वाकीपाडा  येथे कारखान्यात भीषण स्फोट ; तीन कामगारांचा मृत्यू तर सात जण जखमी

नायगाव पूर्वेच्या  वाकीपाडा येथे कॉस पावर  कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास ही घटना घडली यात तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर सात जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात नायगाव पूर्वेच्या जूचंद्र वाकीपाडा येथील भागात कॉस पावर नावाचा कारखाना आहे.  सविस्तर वाचा…

17:08 (IST) 28 Sep 2022
स्वामीनारायण मंदिर तीर्थयात्रींसाठी अध्यात्मिक आकर्षणाचे केंद्र ; मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे

नाशिक : बीएसपीएस स्वामीनारायण सांप्रदाय हा १५० पेक्षा अधिक सेवाभावी, विधायक उपक्रमांच्या माध्यमातून जगभर कार्यरत आहे. त्याग भावनेतून भारतीयांचे विचार आणि संस्कृतीला या सांप्रदायामुळे वैश्विक आयाम लाभला आहे. बातमी वाचा सविस्तर ...

16:26 (IST) 28 Sep 2022
ठाणे जिल्ह्यातील शासकीय बालगृह, निरीक्षण गृह आठ दिवसांपासून अंधारात

उल्हासनगर : जिल्हा महिला बालविकास विभागातर्फे उल्हासनगर येथे बालकांचे निरीक्षण गृह, अपंग बालकांचे बालगृह, मुलांचे वसतिगृह, महिलांसाठी आधारगृह चालविण्यात येते. यासर्व ठिकाणचे मागील काही महिन्यांचे सुमारे तीन लाख रुपयांहून अधिकचे विद्युत देयक थकल्याने महावितरणातर्फे यासर्व इमारतींचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे . बातमी वाचा सविस्तर ...

16:19 (IST) 28 Sep 2022
किंमत वाढविल्याने बाळकुममधील घराचा तिढा वाढणार ; निवासी दाखला मिळाल्यानंतरच घराची रक्कम भरण्याची विजेते, लाभार्थ्यांची भूमिका

‘म्हाडा’च्या कोकण मंडळाच्या २०१८ साली काढण्यात आलेल्या सोडतीतील घरांच्या किंमतीत १६ लाख रुपयांनी वाढ झाली असून घराची किंमत ४३ लाख रुपयांवरून थेट ५९ लाख रुपयांवर पोहोचली आहे. घराची किंमत कमी करण्यात यावी अशी मागणी वारंवार विजेत्यांकडून करण्यात येत आहे. सविस्तर वाचा…

16:07 (IST) 28 Sep 2022
क्रेडिट कार्डवरील खर्च मर्यादा वाढवून देतो सांगून डोंबिवलीत महिलेची फसवणूक

आपल्या क्रेडिट कार्ड वरील दोन लाख रुपयांची खर्च मर्यादा वाढून तुम्हाला नवीन क्रेंडिट कार्ड देतो असे सांगून डोंबिवलीतील एका नोकरदार महिलेची एका भामट्याने फसवणूक केली आहे. विष्णुनगर पोलीस ठाण्यात या महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वाचा…

15:57 (IST) 28 Sep 2022
“ते काय ‘स्पायडरमॅन’ आहेत का?”, नाना पटोलेंचा उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला

राज्य सरकारकडून राज्यभरातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक-दोन नाहीतर तब्बल सहा जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. यानतंर विरोधक टीका करत असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनीही अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर निशाणा साधला आहे. हा पालकमंत्री काय स्पायडरमॅन आहे का? असा टोला त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना लगावला आहे.

सविस्तर बातमी

15:40 (IST) 28 Sep 2022
पुणे : मद्यपी पतीच्या छळामुळे तरुणीची आत्महत्या ; पतीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा

मद्यपी पतीच्या छळामुळे तरुणीने इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना उत्तमनगर भागात घडली. माधुरी सुशांत वाघमारे (वय २३, रा. मुंजाबा वस्ती, धानोरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. सविस्तर वाचा…

15:13 (IST) 28 Sep 2022
नेरूळ पी.एफ. आय. कार्यालय बंद ; फलकही काढला

पाँप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी आणल्यानंतर नवी मुंबईतील नेरूळ येथील पी.एफ.आय च्या कार्यालयाचा बोर्ड स्थानिक पोलीस प्रशासनाने काढाण्यास लावला आहे. पी.एफ.आय चे नेरूळ प्रमुख शेख मोहम्मद आसिफ यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत स्थानिक पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही कार्यालयावरील बोर्ड काढला असल्याची माहिती दिलीय.

सविस्तर वाचा…

15:09 (IST) 28 Sep 2022
छगन भुजबळांच्या सरस्वतीवरील वक्तव्याने वाद, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "कुठलेही फोटो..."

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी “सर्व शाळांमध्ये महापुरुषांचे फोटो असावेत. फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची?” असं वक्तव्य केलं. यानंतर वाद निर्माण झाला. राज्यात भाजपाने आक्रमक होत ठिकठिकाणी भुजबळांचा निषेध केलाय. तसेच माफीची मागणी केली. अशातच आता यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली. ""कुठलेही फोटो काढले जाणार नाहीत. कुणाला काहीही वाटेल," असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं. ते बुधवारी (२८ सप्टेंबर) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

सविस्तर वाचा...

15:09 (IST) 28 Sep 2022
"...तर मोदीही मला संपवू शकत नाहीत", वादानंतर VIDEO पोस्ट करत पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. यानंतर भाजपासह विरोधकांनीही प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच पंकजा मुंडे नाराज असल्याचे तर्कवितर्क लावले गेले. मात्र, आता स्वतः पंकजा मुंडे यांनीच आपल्या संपूर्ण भाषणाच्या व्हिडीओची लिंक पोस्ट करत या वादावर प्रतिक्रिया दिली. यात त्यांनी 'सनसनीखेज' बातम्यांतून जमले, तर हेही पहा, असं मत व्यक्त केलं.

सविस्तर वाचा...

15:08 (IST) 28 Sep 2022
बच्चू कडू पुन्हा अडचणीत! पोलिसांसमोरच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली; Video झाला Viral

आमदार बच्चू कडू त्यांच्या आक्रमक कामाच्या पद्धतीसाठी ओळखले जातात. त्यामुळे ते लोकांमध्येही चर्चेचा विषय ठरतात. मात्र, त्यांच्या याच पद्धतीमुळे ते अनेकदा वादातही सापडले आहेत. असाच एक प्रकार अमरावतीतील जिल्ह्यात घडला आहे. अचलपूर तालुक्यातील गणोजा गावात बच्चू कडू एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी गेले. मात्र, तेथे रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्याने गदारोळ झाला आणि संतापलेल्या बच्चू कडूंनी थेट आपल्याच कार्यकर्त्याच्या कानशिलात लगावली. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यामुळे बच्चू कडूंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा...

15:07 (IST) 28 Sep 2022
जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना मोठं यश, जैश-ए-मोहम्मदचे दोन दहशतवादी ठार

जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दोन दहशतवादी मारले गेले. भारतीय सुरक्षा दलांनी मंगळवारी (२७ सप्टेंबर) कुलगाममधील अहवाटू या गावात ही कारवाई केली. मोहम्मद शफी गनी (बटपोरा, कुलगाम) आणि मोहम्मद आसिफ वानी उर्फ यावर (तकिया, कुलगाम) अशी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत.

सविस्तर बातमी...

15:07 (IST) 28 Sep 2022
"...म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे", एकनाथ शिंदेंचं नाशिकमध्ये वक्तव्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीपल्स फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेवरील कारवाईचं समर्थक केलं आहे. "पाकिस्तान जिंदाबाद या घोषणा देणारे देशासाठी धोकादायक आहेत. म्हणून अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे," असं मत व्यक्त केलं. ते बुधवारी (२८ सप्टेंबर) नाशिकमध्ये आले असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

सविस्तर वाचा ...

14:55 (IST) 28 Sep 2022
MPSC Recruitment 2023 : २०२३ च्या पदभरती परीक्षांचे वेळापत्रक ;  एमपीएससीकडून तीन महिने आधीच जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या विविध पदभरती परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. २०२३पासून भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असल्याने उमेदवारांना तयारीसाठी वेळ मिळण्याच्या दृष्टीने दरवर्षीपेक्षा तीन महिने आधीच वेळापत्रक जाहीर करण्यात आले.  सविस्तर वाचा…

14:30 (IST) 28 Sep 2022
आदिमाया रेणुका मातेच्या दर्शनासाठी तीर्थक्षेत्र माहूरगडावर भाविकांची अलोट गर्दी

यवतमाळ : विदर्भ- मराठवाड्याच्या सीमेवर नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यात असलेल्या माहूरगड येथे आई रेणुका मातेचा नवरात्रोत्सव उत्साहात प्रारंभ झाला. माहूर येथील आदिमाया रेणुका देवीचे हे तीर्थक्षेत्र साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिले आणि मूळ शक्तिपीठ आहे. बातमी वाचा सविस्तर ...

14:24 (IST) 28 Sep 2022
खोके आणि राजवस्त्रे मिळालीत म्हणून गाडगेबाबांची दशसूत्री मंत्रालयातून हटवली का? - काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांचा सवाल

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर  लावण्यात आलेली गाडगेबाबांची दशसूत्री काल-परवा शिंदे सरकारने काढून टाकली. सत्‍तेतील भुकेलेल्यांना खोके आणि उघड्या-नागड्यांना राजवस्त्रे मिळालीत म्हणून या दशसुत्रीचा उद्देशच संपुष्टात आला, असा समज यामागे आहे का, असा प्रश्‍न काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ॲड. दिलीप एडतकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केला आहे.

सविस्तर वाचा…

14:14 (IST) 28 Sep 2022
शव बदलल्याने नातेवाईकांची उडाली धावपळ

पनवेल : शवांची अदलाबदल झाल्यानंतर नातेवाईकांची कशी तारंबळ उडते याचा अनुभव पेझारी व सोमटणे येथील गावक-यांना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात मंगळवारी सायंकाळी आला. बातमी वाचा सविस्तर ...

14:10 (IST) 28 Sep 2022
मुंबई : खून करून पळणाऱ्या आरोपीला अटक

हार्बर मार्गावरील टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान जुलै २०२१ मध्ये एका व्यक्तीचा खून करून मृतदेह रेल्वे रुळावर फेकून देणारा मुख्य आरोपी विकास उर्फ आशाराम स्वामीदयाल पासवान याला वडाळा रेल्वे पोलिसांनी नुकतीच अटक केली .

सविस्तर वाचा

14:04 (IST) 28 Sep 2022
कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्यासह २२ शिवसैनिकांवर गुन्हे

पाच पेक्षा अधिका नागरिकांनी जमावाने एकत्र येऊ नये असा ठाणे पोलीस आयुक्तांचा मनाई आदेश असताना त्या आदेशाचा भंग केला म्हणून शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांच्यासह २२ शिवसेना पदाधिकाऱ्यांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले.

सविस्तर वाचा

13:53 (IST) 28 Sep 2022
कल्याण पूर्वेतील विजयनगर येथील कमानीमुळे वाहन चालक त्रस्त ; एक महिन्यापासून कमान रस्त्यावर

कल्याण पूर्वेतील विजयनगर भागातील मुख्य वर्दळी्च्या रस्त्यावर शिवसेना संजय गायकवाड प्रतिष्ठानतर्फे गणेशोत्सव काळात नागरिकांना शुभेच्छा देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा भव्य कमान उभारली आहे.

सविस्तर वाचा

13:50 (IST) 28 Sep 2022
जास्तीत जास्त कंपन्यांना प्रक्रियायुक्त पाणी देणार

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने शहरातील मलनिःसारण केंद्रामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करुन शुद्ध केलेले पाणी समुद्रात सोडले जात होते कोट्यावधी रुपये खर्च करुन प्रक्रिया केलेले वापरायोग्य पाणी समुद्रात सोडण्याची वेळ महापालिकेवर दोन हजार नऊ पासून आली होती. बातमी वाचा सविस्तर ...

13:46 (IST) 28 Sep 2022
पुणे : संगीत विशारद तरुणाकडून वाहन चोरीचे गुन्हे ; तीन दुचाकी, रिक्षा जप्त

शहर परिसरातून दुचाकी तसेच रिक्षा चोरणाऱ्या एका तरुणाला गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून तीन दुचाकी आणि एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

13:38 (IST) 28 Sep 2022
केंद्र सरकारची पीएफआय संघटनेवर बंदी, मनसेकडून लाडू वाटून जल्लोष

पुणे : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेच्या विरोधात देशभरात १५ ठिकाणी छापेमारी करत एनआयएने आणखी १७० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. त्याच दरम्यान देशविरोधी कारवाया आणि घोषणाबाजी केल्यामुळे पीएफआयवर केंद्र सरकारने पाच वर्षांकरिता बंदी घातली आहे. बातमी वाचा सविस्तर ...

13:28 (IST) 28 Sep 2022
नवरात्रोत्सवातील नऊ दिवस व्यसनमुक्ती अभियान ; डोंबिवलीतील डाॅक्टरचा उपक्रम

सामाजिक जागृतीच्या दृष्टीने नियमित विविध प्रकारचे उपक्रम राबविणाऱ्या डोंबिवलीतील एका महिला डाॅक्टरने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून डोंबिवली शहर परिसरात नऊ दिवस व्यसन मुक्ती अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा

13:13 (IST) 28 Sep 2022
बदलापूर : केंद्रीय मंत्र्यांच्या बनावट फेसबुक खात्यावरून पैशांची मागणी ; मंत्री कपिल पाटील यांच्यातर्फे नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार

केंद्रीय मंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कपिल पाटील यांच्या नावे फेसबुकवर बनावट खाते उघडून त्याद्वारे अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून पैशांची मागणी केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

सविस्तर वाचा

13:04 (IST) 28 Sep 2022
डोंबिवली जवळील २७ गावांमधील २७ विकासकांवर फौजदारी गुन्हे दाखल

डोंबिवली जवळील २७ गावांमधील विकासकांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्यांची बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाची (महारेरा) दिशाभूल करुन त्यांच्याकडून या बेकायदा बांधकामांना रेराची मान्यता असल्याचे दाखवून ग्राहक आणि कल्याण डोंबिवली पालिकेची फसवणूक करणाऱ्या २७ गावांमधील २७ विकासकांविरुध्द बुधवारी रात्री फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.

सविस्तर वाचा

12:45 (IST) 28 Sep 2022
समुद्रात येणाऱ्या लाखो टन कचऱ्यामुळे निर्माण होतेय जलप्रदूषणची गंभीर समस्या

उरण : समुद्रात टाकण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या लाखो टन कचऱ्यामुळे सागरी उदर सध्या कचराभूमीचे आगर बनू लागलं आहे. त्यामुळे समुद्रात जल प्रदूषण निर्माण होऊ लागले आहे. या कचऱ्या बरोबरच समुद्रातून चालणाऱ्या महाकाय जहाजांतून गळती होणाऱ्या तेलामुळे ही जलप्रदूषण वाढू लागले आहे. बातमी वाचा सविस्तर ...

12:44 (IST) 28 Sep 2022
मुलासह आझम खान फरार; न्यायालयात अनुपस्थित राहिल्यावर पोलिसांची माहिती, पिता-पुत्रांनी राज्य सरकारची सुरक्षाही नाकारली

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशातील माजी मंत्री आझम खान मुलासह फरार आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. रामपूरचे आमदार आझम खान आणि त्यांचे पुत्र आमदार अब्दुल्ला खान काही काळापासून न्यायालयात हजर होण्यास टाळाटाळ करत आहेत, असे पोलिसांनी सांगितले आहे.

सविस्तर वाचा...

12:43 (IST) 28 Sep 2022
पीएफआय ‘सायलंट किलर’, बंदीनंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, संघटनेबाबत केला मोठा खुलासा

केंद्रीय तपास यंत्रणांच्या छापेमारीनंतर ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर (पीएफआय) केंद्र सरकारने बंदी घातली आहे. पीएफआयच्या माध्यमातून देशात दुष्प्रचार सुरू होता. या संघटनेच्या निशाण्यावर काही लोक होते, देशात हल्ले करण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती या कारवाईनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पीएफआय ‘सायलंट किलर’ असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत.

सविस्तर वाचा...

12:24 (IST) 28 Sep 2022
पैशाच्या वादातून मित्राच्या कानशिलावर पिस्तूल ताणली अन गोळी झाडली पण...

नागपूर : पैशाच्या वादातून एकाने मित्राच्या कानशिलावर पिस्तूल ताणली आणि गोळी झाडली. परंतु, ती गोळी पिस्तुलाच्या नळीत फसल्याने दैव बलवत्तर असलेल्या युवकाचा जीव वाचला. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोखारा येथे घडली. बातमी वाचा सविस्तर ...

12:24 (IST) 28 Sep 2022
पालिकेच्या शाळांमध्ये लवकरच सेमी इंग्रजीचा प्रयोग ; अंबरनाथ पालिकेला प्रस्ताव देण्याच्या आमदार डॉ. किणीकरांच्या सूचना

दुरावस्था झालेल्या पालिका शाळांना दुरुस्तीची प्रतीक्षा असतानाच या शाळांचा दर्जा सुधारून या शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर सेमी इंग्रजी शिक्षण सुरू करण्याच्या हालचाली अंबरनाथ नगरपालिकेने सुरू केल्या आहेत. नुकतीच पालिका शाळांच्याबाबत पालिका शाळांचे मुख्याध्यापक आणि कक्ष समन्वयकांची बैठक पार पडली.

सविस्तर वाचा

12:03 (IST) 28 Sep 2022
मुंबई : गोराईत साकारणार सिंगापूरच्या धर्तीवरील कांदळवन उद्यान ; देशातील पहिले कांदळवन उद्यान मार्च २०२३ पर्यंत खुले होणार

सिंगापूरच्या धर्तीवर साकारण्यात येणारे भारतातील पहिले कांदळवन उद्यान बोरिवलीमधील गोराई खाडीलगत आकाराला येणार असून मार्च २०२३ पर्यंत या उद्यानाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचा दावा वन विभागाने केला आहे.

सविस्तर वाचा

11:53 (IST) 28 Sep 2022
स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी नागपूर कराराची होळी

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने बुधवारी शहरातील जगनाडे चौकात ‘जा रे मारबत…. विदर्भ वेगळा झाला पाहिजे’ अशा घोषणा देत कालबाह्य झालेल्या नागपूर कराराची होळी करण्यात आली. बातमी वाचा सविस्तर ...

11:53 (IST) 28 Sep 2022
गडचिरोलीमध्ये लोहखनिज वाहतूक जिवावर उठली

गडचिरोली : दक्षिण गडचिरोलीतील नागरिक सध्या सूरजागड लोहखाणीमुळे प्रचंड अडचणीत सापडले आहे. मंगळवारी प्रकल्पातील भरधाव ट्रकने धडक दिल्याने एका महिलेला जीव गमवावा लागला. त्यानंतर संतप्त नागरिकांनी जवळपास १० ट्रक पेटवून दिले. बातमी वाचा सविस्तर ...

11:26 (IST) 28 Sep 2022
‘…तर मोदीही मला संपवू शकत नाहीत’, पंकजा मुंडेंच्या विधानावर मुनगंटीवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “पात्रता नसताना…”

राज्यात सध्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या विधानाची चर्चा रंगली आहे. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यादरम्यान, भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पंकजा मुंडेंच्या विधानावर भाष्य केलं आहे.

सविस्तर बातमी

11:25 (IST) 28 Sep 2022
VIDEO: चोर दुचाकी घेऊन पळून जात असतानाच गेटवरील सुरक्षारक्षकाने पाहिलं, गेट बंद करण्यासाठी धावला अन् तितक्यात…

महापालिका अधिकारी असल्याचं सांगत दुचाकी चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरांना एका सुरक्षारक्षकाने जन्माची अद्दल घडवली आहे. हे चोर एका डिलिव्हरी एजंटची दुचाकी चोरुन पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. पण सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान दाखवत गेट बंद केला आणि त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. दिल्लीमधील ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सविस्तर बातमी

11:17 (IST) 28 Sep 2022
Uttarakhand Resort Murder: राहुल गांधींचा गंभीर आरोप, भाजपा आणि RSS चा उल्लेख करत म्हणाले “तिच्या मृत्यूचं एकमेव…”

उत्तराखंडमध्ये १९ वर्षीय अंकिता भंडारीच्या खूनानंतर राज्यासह संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली आहे. अंकिता भंडारीचा मृतदेह सापडल्यानंतर स्थानिकांनी ती ज्या ठिकाणी कामाला होती त्या ‘रिसॉर्ट’ला आग लावली. अंकिताच्या खुनाचा आरोप असलेल्या पुलकित आर्य याच्या मालकीचे हे ‘रिसॉर्ट’ आहे. भाजपाचे माजी मंत्री विनोद आर्य यांचा मुलगा पुलकितच्या मालकीचं हे रिसॉर्ट आहे. दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लक्ष्य केलं आहे. केरळमध्ये ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान सभेत ते बोलत होते.

सविस्तर बातमी

10:54 (IST) 28 Sep 2022
देशात संस्कृत बोलणाऱ्यांची संख्या पाहून बसेल धक्का; टक्का आणखी घसरला

देशातील प्राचीन भाषा संस्कृतविषयी एक नवी माहिती समोर आली आहे. भारतात संस्कृत केवळ २४ हजार ८२१ लोक बोलतात, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाच्या जनगणना आयुक्त कार्यालयाच्या भाषा विभागाने दिली आहे.

सविस्तर वाचा...

10:52 (IST) 28 Sep 2022
Anti Hijab Protest: गायिकेनं चक्क स्टेजवर कापले केस; कारण जाणून आश्चर्य वाटेल, पाहा व्हिडीओ

तुर्की गायिका मेलेक मोस्सोने इराणमधील हिजाबविरोधी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या आंदोलनाच्या समर्थनार्थ एका स्टेज शो दरम्यान मेलेकने केस कापले आहेत. तिच्या या कृतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जगभर व्हायरल झाला आहे.

सविस्तर वाचा...

10:39 (IST) 28 Sep 2022
संतोष बांगर समर्थकाने शिवीगाळ केल्यानंतर महिला पदाधिकाऱ्याची तक्रार, ठाकरे म्हणाले “एक काम कर…”

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर सध्या काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर संतोष बांगर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. पण आता संतोष बांगर आपल्या एका समर्थकामुळे चर्चेत असून, वादात अडकण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेतली असून महिला पदाधिकाऱ्याची विचारपूस केली आहे.

सविस्तर बातमी

10:24 (IST) 28 Sep 2022
“पंकजा मुंडेंनी मोदींना आव्हान देण्याची भाषा केली असेल तर…” एकनाथ खडसेंचं मोठं विधान!

भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेलं विधान सध्या खूपच चर्चेत आहे. ‘मी जनतेच्या मनावर राज्य केलं, तर मोदीही मला संपवू शकत नाहीत,’ असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये केलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून, अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. यादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर बातमी

10:23 (IST) 28 Sep 2022
“सर्वांना मिटवून टाका…” पीएफआयवरील बंदीनंतर अन्य एका संघटनेचा उल्लेख करत नितेश राणेंचं विधान

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेला केंद्र सरकारने बेकायदेशीर संघटना घोषित केलं आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही संघटना आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना हा निर्णय लागू असेल असं केंद्राने म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर बातमी

10:22 (IST) 28 Sep 2022
गिरीश महाजनांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल? नेत्याने स्वत:च दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. पण गिरीश महाजनांवर खरंच असा गुन्हा दाखल केला आहे का? याबाबतचं स्पष्टीकरण गिरीश महाजनांनी स्वत: दिलं आहे. सविस्तर बातमी

10:21 (IST) 28 Sep 2022
महत्त्वाची बातमी! ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’विरोधात केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय; पुढील पाच वर्षांसाठी…

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेला केंद्र सरकारने बेकायदेशीर संघटना घोषित केलं आहे. पुढील पाच वर्षांसाठी ही संघटना आणि त्यांच्याशी संलग्न संस्थांना हा निर्णय लागू असेल असं केंद्राने म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने पीएफआयची स्थापना करणारे काही सदस्य हे स्टूडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया म्हणजेच ‘सीमी’चे सदस्य असल्याची माहिती दिली आहे. या संघटनेचे जमात-उल-मुजाहिद्दीन बांगलादेश (जेएमबी) या संघटनेशी संबंध असल्याची माहितीही समोर आली आहे. या दोन्ही बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटना आहेत. सविस्तर बातमी

PFI Declared as Unlawful Association

केंद्र सरकारने पीएफआय संघटनेसह इतर सलग्न संघटनांवर पाच वर्षांसाठी बंदी घातली आहे.