News Flash

चुलत बहिण शनाया कपूरला डेब्यूसाठी मदत करणार नाही अर्जुन कपूर

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार शनाया कपूर. तिला तिच्या डेब्यूसाठी मदत करणर नसल्याचा खुलासा चुलत भाऊ अर्जुन कपूरने केलाय.

संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूर ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय स्टार किड्स पैकी एक आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी ही अभिनेत्री तयार झाली आहे. शनाया कपूरच्या पहिल्या चित्रपटाचं दिग्दर्शन शशांक खेतान हे करणार आहेत. तसंच तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेता लक्ष्य लालवानी आणि गुरफतेह पीरजादा देखील झळकणार आहेत. अशात शनाया कपूरचा चुलत भाऊ अभिनेता अर्जून कपूरने तिच्या डेब्यूसंदर्भात नवा खुलासा केलाय. बॉलिवूडमध्ये डेब्यू करताना तिला मार्गदर्शन करण्याचा कोणताच विचार नाही, असं अर्जून कपूर म्हणाला.

एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा खुलासा केलाय. शनायाला तो कोणत्याच टिप्स देत नाही, असं सागंत असतानाच अर्जुन कपूर म्हणाला, “प्रत्येक व्यक्तीचा आपआपला एक प्रवास असतो आणि त्याला आपली पसंती स्वतः निवडता आली पाहीजे. शनायाला तिच्या कुटुंबाचा कायम पाठिंबा मिळणारच आहे.” यापुढे बोलताना अर्जुन कपूर म्हणाला, “माझी अशी इच्छा आहे की तिने पुढे जाऊन खूपच चांगलं काम करावं आणि तिची आवड-निवड स्वतःच ओळखावी. कधी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे तिच्याशी बोलत असताना तिला मार्गदर्शन करू शकतो, याची खात्री आहेच, पण जेव्हा ती मला काही शंका विचारते त्यावर मी तिला कोणतंच मार्गदर्शन करत नाही. तिला मार्गदर्शन करून ठराविक मत तयार करणारे विचार तिच्या मनात भरवण्याचा माझा उद्देश नाही.”

करण जोहरच्या चित्रपटातून करणार डेब्यू

अर्जून कपूरची चुलत बहिण शनाया कपूर ही लवकरच करण जोहर याच्या धर्मा प्रोडक्शनसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. शनायाने धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सी जॉईन केली आहे. याची माहिती स्वतः करण जोहरने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. करणने पोस्ट शेअर केल्यानंतर शनायाने सुद्धा एक पोस्ट लिहिली. यात तिने लिहिलं, “आजच्या दिवसाची सुरवात खूप चांगली झाली. धर्मा कॉर्नरस्टोन एजन्सीसोबत नवा प्रवास सुरू करतेय. स्वतःच्या पहिल्या चित्रपटात काम करण्यासाठी उत्सुक आहे. यंदाचा जुलै महिना धर्मा मुव्हीसोबत.” यासोबतच तिने #DCASquad हा हॅशटॅग देखील वापरलाय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

या मुलाखती दरम्यान अर्जुन कपूरने बॉलिवूडमधला आपला अनुभव देखील शेअर केला. सोबत त्याने यापूर्वी काम केलेल्या काही लोकप्रिय चित्रपटांची नावं देखील सांगितली. ‘इश्कजादे’, ‘2 स्टेट्स’ आणि ‘गुंडे’ या चित्रपटा दरम्यान त्याला अनेक गोष्टींचा सामना करावा लागला असल्याचं देखील त्याने सांगितलं. “मला खात्री आहे की शनाया सुद्धा या सर्व गोष्टींचा सामना करेल आणि एक भाऊ या नात्याने माझा तिला कायम पाठिंबा असेल, असं देखील यावेळी अर्जुन म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 11, 2021 10:20 am

Web Title: arjun kapoor speak on shanaya kapoor debut says my intent is not to guide her prp 93
Next Stories
1 अनुष्का शर्माचा ‘थ्री इडियट्स’च्या ऑडिशनचा व्हिडीओ व्हायरल; व्हिडीओ पाहून आमिर खान थक्क
2 ‘खतरों के खिलाडी’मध्ये मोठा ट्विस्ट; एक नाही, दोन नाही तर पाच स्पर्धकांना शोमधून केलं आऊट
3 डिंको सिंग यांच्यावर बायोपिक बनवणार होता शाहिद कपूर; प्रोडक्शनची घेतली होती जबाबदारी
Just Now!
X