News Flash

आयसोलेशनमध्ये असून करोनाची लागण कशी झाली? ‘आशिकी’ फेम राहुलचा सवाल

त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली..

गेल्या वर्ष भरापासून करोनाच संकट आपल्यावरून काही गेलेले नाही. आता तर करोना संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढतं आहे. तर, मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. अगदी सर्वसामान्य नागरिकांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वचजण करोनाच्या विळख्यात सापडत आहेत. आता ‘आशिकी’ या चित्रपटातून प्रकाश झोतात आलेला अभिनेता राहूल रॉयला करोनाची लागण झाली आहे. फक्त राहूलला नाही तर त्याची बहिण आणि मेहूण्याला पण करोनाची लागण झाली आहे.

राहुलने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून करोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. करोनाची लागण कशी झाली याची संपूर्ण कहाणी त्याने या पोस्टमध्ये सांगितली आहे. “आयसोलेशनचा १९ वा दिवस. माझी करोनाची गोष्ट, करोनाचा एक रूग्ण माझ्या फ्लोअरवर आढळल्याने २७ मार्च रोजी माझा फ्लोअर सील करण्यात आला. गेल्या १४ दिवसांपासून आम्ही होम क्वारंटाइन आहोत. मला आणि माझ्या कुटूंबाला ११ एप्रिल रोजी दिल्लीला जायचे होते, म्हणून आम्ही ७ एप्रिल रोजी मेट्रोपोलिस लॅबमधून आरटीपीसीआर चाचणी केली. तर १० एप्रिल रोजी माझ्या संपूर्ण कुटुंबाला करोनाची लागण झाल्याचे आम्हाला समजले,” असे राहुल म्हणाला.

पुढे राहुलने १० एप्रिल रोजी करोना चाचणीच्या अहवालाबद्दल सांगितले, “आम्हाला कोणतीही लक्षणे नव्हती, आणि त्याच दिवशी आम्हाला कळले की बीएमसीचे अधिकारी संपूर्ण सोसायटीची करोना चाचणी करत आहेत, म्हणून त्या दिवशी आम्ही पुन्हा एकदा करोना चाचणी करण्याचे ठरवले. आम्ही अॅन्टीजेन चाचणी केली. तर, आमच्या सगळ्यांची करोना चाचणी ही निगेटिव्ह आली. त्यानंतर पुन्हा आरटीपीसीआरची चाचणी करण्यात आली, ज्याचे नमुने हे उपनगरीय प्रयोगशाळेत देण्यात आले. मात्र, मला अद्यापही चाचणीचा अहवाल मिळालेला नाही.”

पुढे तो म्हणाला की,”पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मला आणि माझ्या कुटुंबियांना आयसोलेशन फॉर्मवर सही करण्यास भाग पाडलं, माझे घर सॅनिटाइज केले. डॉक्टर काहीही प्रश्न विचारत होते, आमचा कौटुंबिक व्यवसाय काय आहे? माझं ऑफिस कुठे आहे? त्याचा आणि याचा काय संबंध मला माहित नाही. मला रुग्णालयात क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला, तर मी म्हणालो आम्हाला कोणतीही लक्षण नाहीत. तर त्यांनी आम्हाला ऑक्सिजन लेव्हलचा चार्ट बनवायला सांगितला आणि काही औषध घेण्यास सांगितले, ब्रेन स्ट्रोकमुळे मी जेव्हा पासून रुग्णालयातून आलो तेव्हा पासून मी त्याच गोळ्या घेत आहे.”

राहुलने सगळ्यांना एक प्रश्न विचारला

“मला माहित आहे की करोना अजून आहे. परंतु मी आणि माझ्या कुटुंबीयांना घरातून बाहेर निघाल्या शिवाय, कोणाला न भेटता करोनाची लागण कशी झाली? मला याचं उत्तर कधी मिळणार नाही? माझी बहिण प्रियांका ही एक योगिनी आहे. तिने श्वास घेण्याच्या प्राचीन पद्धतींचा अभ्यास केला आहे. ती तर गेल्या ३ महिन्यांपासून घरातून बाहेर पडलेली नाही, तर तिचा अहवाल हा करोना पॉझिटिव्ह कसा आला,”असा प्रश्न राहुलने विचारला आहे.

दरम्यान, बॉलिवूडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेक कलाकारांना करोनाची लागण झाली होती. आलिया, रणबीर कपूर, आमिर खान, आर माधवन, विक्रांत मेसी, कार्तिक आर्यन, फातिमा सना शेख, अक्षय कुमार, गोविंदा यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 15, 2021 11:01 am

Web Title: rahul roy covid being positive and tested negative on second day big condusion post viral dcp 98
Next Stories
1 “सेम टू सेम”, मॅचिंग कपड्यांमध्ये दीपिका-रणवीर कुठे निघाले?
2 ‘या’ कारणामुळे लग्नानंतरही १२ वर्षे मंदिरा बेदी होऊ शकली नाही आई
3 विमानात प्रियांका चोप्राची कॉकटेल पार्टी, दारुच्या नशेत अखेर ती…
Just Now!
X