News Flash

‘फॅमिली मॅन २’बद्दल निर्मात्यांची मोठी घोषणा

प्रदर्शनासंदर्भातल्या अफवांवर दिलं स्पष्टीकरण

सौजन्यः ऍमेझॉन प्राईम व्हिडिओ

मनोज वाजपेयीची प्रमुख भूमिका असलेली ‘फॅमिली मॅन’ ही वेबसीरीज प्रचंड गाजली. काही दिवसांनी याच्या निर्मात्यांनी या वेबसीरीजच्या दुसऱ्या भागाचीही घोषणा केली होती. हा दुसरा भाग 12 फेब्रुवारीला रिलीज होणार होता. मात्र, नंतर त्याचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. यावर अनेक अफवा ऐकायला येत होत्या पण त्यावर या वेबसीरीजच्या निर्मात्यांनी एक खुलासा केला आहे.

‘फॅमिली मॅन २’चं प्रदर्शन रद्द होणार असल्याची चर्चा सुरु होती पण अभिनेता मनोज वाजपेयी आणि दिग्दर्शक राज आणि डिके यांनी या निव्वळ अफवा असल्याचं सांगितलं आहे. तसंच त्यांनी कठोर शब्दात याबद्दल भाष्यही केलं आहे. वेब कन्टेन्टवर लावलेल्या नव्या निर्बंधांमुळं ‘फॅमिली मॅन २’ प्रदर्शित होणार नाही अशी चर्चा सुरु होती. चाहतेही याबद्दल काळजीत होते आणि निर्मात्यांना विचारत होते.

या प्रमुख भूमिकेत दिसणारा मनोज वाजपेयी यानेही या चर्चांना कसलाही आधार नसल्याचं म्हटलं आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शकांनीही या वृत्तांना खोडून काढलं आहे.

या वेबसीरीजमध्ये मनोज वाजपेयी, समंथा अक्किनेनी, प्रियामणी, शरिब हाश्मी, सीमा बिस्वास, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शाहब अली, वेदांत सिन्हा, मेहेक ठाकूर हे कलाकार दिसणार आहेत.

ही वेबसीरीज 12 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होती पण नंतर त्याचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. या बद्दल राज आणि डीके यांनी एक स्टेटमेंट रिलीज केलं होतं. यात ते म्हणतात की, “आम्ही तुमच्यासाठी एक भन्नाट सीझन आणण्यासाठी फार प्रयत्न करत आहोत. आणि आम्हाला विश्वास आहे की तुम्हाला हा सीझनही नक्की आवडेल.”

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2021 1:02 pm

Web Title: the family man is to be released soon clarified manoj bajpeyee and directors raj and dk vsk 98
Next Stories
1 ‘गंगुबाई काठियावाडी’च्या अडचणीत वाढ, कॉंग्रेस आमदाराने चित्रपटाचे शीर्षक बदलण्याची केली मागणी
2 कोण आहेत जान्हवी कपूरचे ‘खास’ पाहुणे?
3 आमिर खानचा असा अंदाज कधी पाहिलाय का?, पहा ‘हरफनमौला’ गाण्याचा टीझर
Just Now!
X