News Flash

रघू आणि स्वातीच्या आयुष्यात येणार माया नावाचं वादळ

रघू आणि स्वातीच्या आयुष्यात येणार माया नावाचं वादळ, 'तुझ्या इश्काचा नादखुळा' मालिकेत नवे वळण

कुलकर्णी कुटुंबात येण्यामागे मायाचं नेमकं कोणतं षडयंत्र आहे?

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. आता या मालिकेत धमाकेदार ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. रघु आणि स्वातीच्या आयुष्यात माया नावाचं वादळ येणार आहे. खरतरं रघु आणि स्वातीचं नातं आता कुठे खुलायला लागलं होतं. मात्र माया या पात्रामुळे तुझ्या इश्क्काचा नादखुळा ही मालिका अतिशय नाट्यमय वळणावर येऊन पोहोचली आहे.

आणखी वाचा : जेनेलियासोबत वेळ घालवत असलेल्या रितेशला जेव्हा कळले की…

अभिनेत्री प्रतिक्षा जाधव माया ही भूमिका साकारणार आहे. प्रतिक्षाला याआधी बऱ्याच मालिकांमध्ये प्रेक्षकांनी पाहिलं आहे. स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ आणि ‘मोलकरीण बाई’ या मालिकेत तिने लक्षवेधी भूमिका साकारली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Star Pravah (@star_pravah)

आणखी वाचा : आलियाने शेअर केलं बेडरूम सिक्रेट; सेक्स पोजीशनबद्दल केलं भाष्य

खरंतर माया तिच्या नावा सारखीच मायावी आहे. स्वतःचा खरा चेहेरा समोरच्याला कधीही कळू न देण्यात सराईत. कुलकर्णी कुटुंबात येण्यामागे मायाचं नेमकं कोणतं षडयंत्र आहे? मायाच्या एण्ट्रीने रघू आणि स्वातीच्या आयुष्यात नेमकी काय उलथापालथ होणार आहे. हे मालिकेच्या पुढील भागांमधे आपल्याला पाहायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरु नका ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 7:25 pm

Web Title: tujhya ishkacha naad khula serial latest updates and twist in the marathi serial dcp 98
Next Stories
1 ‘इंदौरी इश्क’ वेब सीरिज प्रदर्शित!
2 जेनेलियासोबत वेळ घालवत असलेल्या रितेशला जेव्हा कळाले की…
3 अभिनेत्री होण्यापूर्वी परिणिती चोप्रा अनुष्का शर्मासाठी करायची हे काम
Just Now!
X