scorecardresearch

“म्हणून तुझे चित्रपट…” भर कार्यक्रमात मित्राला लाथ मारल्याने रणवीर सिंग झाला ट्रोल; व्हिडीओ व्हायरल

मुंबईत एका कार्यक्रमात रणवीर सिंगने अशी कृति केली

ranveer 1
फोटो सौजन्य : लोकसत्ता ग्राफिक टीम

बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग चित्रपटापेक्षा त्याच्या अतरंगी फॅशन आणि कृतींमुळे चर्चेत येत असतो. पत्नी दीपिका पदुकोणसोबत तो कायमच असतो. मात्र सध्या एक कार्यक्रमात केलेल्या एका कृतीमुळे त्याला ट्रोल करण्यात येत आहे. रणवीरसिंगचा एका उद्धाटनाच्या कार्यक्रम्यादरम्यान एक अशी कृती केली, ज्यावरुन चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट करायला सुरुवात केली आहे.

सर्कस चित्रपटाच्या अपयशानंतर रणवीर फारसा माध्यमांच्या समोर आलेला नाही. नुकताच तो एक कार्यक्रमाला उपस्थित होता. तेव्हा त्याचा एक मित्रदेखील या कार्यक्रमास हजर होता. त्यावेळी रणवीरने आपल्या मित्राला लाथ मारली. त्याच्या या कृतीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. रणवीर सिंग काल एका सलूनच्या उद्धाटनाला पोहोचला होता. यावेळी त्याने राखाडी रंगाची पँट आणि काळ्या टी-शर्ट परिधान केला होता. याशिवाय त्याच्या डोळ्यांवर काळा चष्मा होता.

“मला प्रोजेक्टमधून काढून टाकलं…” सुबोध भावेने सांगितली खऱ्या आयुष्यातील फुलराणीची ‘ती’ आठवण

रणवीरचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी कमेंट्स करण्यास सुरवात केली आहे. एकाने लिहले आहे, “म्हणूनच याच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळत नाही अशी कृति केली तर कस होणार” तर दुसऱ्याने लिहले आहे, “याला आदर नाही.” आणखीन एकाने लिहिलं आहे “किती ओव्हर ॲक्टिंग करत आहे.”

रणवीर सिंग लवकरच आता करण जोहरच्या आगामी रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे सध्या चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर आलिया भट्टदेखील दिसणार आहे. करण जोहर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-03-2023 at 16:02 IST

संबंधित बातम्या