बॉलिवूडचा पुढील जनरेशनचा सुपरस्टार म्हणून रणबीर कपूरकडे फार आशेने पाहिलं जातं. गेल्यावर्षी रणबीरचा ‘शमशेरा’ चांगलाच आपटला पण ‘ब्रह्मास्त्र’ने मात्र सगळं भरून काढलं. ‘ब्रह्मास्त्र’ सुपरहीट झाला आणि काहीच महिन्यात रणबीर आणि अलियाला कन्यारत्न झाल्याची बातमी समोर आली. रणबीर कपूर इतर बॉलिवूडमधील कलाकारांप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय नसतो. यावरच आता त्याने भाष्य केलं आहे.

रणबीर कपूर सध्या ‘तू झुटी मै मक्कार’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या प्रमोशन दरम्यान सोशल मीडियावर सक्रीय नसल्या मागचं कारण सांगितलं आहे. तो असं म्हणाला, “माझं हे म्हणणं आहे की सोशल मीडियावर असल्यावर तुम्हाला मनोरंजन करावे लागते आणि माझ्यात ती गोष्ट नाही. मला असं वाटतं आम्ही जाहिराती करतो, मार्केटिंग करतो, चित्रपट करतो कुठे ना कुठेतर लोक आम्हाला बघून कंटाळा असतील आणि ते म्हणत असतील आणखीन काहीतरी वेगळे बघुयात.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

कपिल शर्माचा ‘ज्विगाटो पाहून कोरियन प्रेक्षकांना अश्रू अनावर; अभिनेता म्हणाला, “मी विनोदी…”

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीवर येणाऱ्या बायोपिकमध्ये रणबीर सिंग झळकणार अशी चर्चा सुरु होती मात्र अभिनेता असं म्हणाला की “मला या चित्रपटाबद्दल विचारण्यात आलेले नाही. तो पुढे असंही म्हणाल की मी गेली ११ वर्ष किशोर कुमार यांच्या बायोपिक वर काम करत आहे. यावर काम सुरु आहे अनुराग बसू आणि मी आशा करतो की हा माझा पुढील बायोपिक असेल.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रणबीर-श्रद्धाचा हा चित्रपट ८ मार्च २०२३ म्हणजेच होळीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लव रंजन आणि अंकुर गर्ग ‘तू झूठी मैं मक्कार’ या चित्रपटाचे निर्माते असून याचं दिग्दर्शन लव रंजन यांनी केलं आहे.